भाग २
अनिरुद्धच्या अंत्ययात्रेला अवघे काही तास झाले होते.
श्मशानातून उठलेला धूर अजूनही जणू हवेतच तरंगत होता. घरात सर्वत्र अगरबत्तीचा मंद, जड वास दरवळत होता. हॉलच्या मधल्या भिंतीवर अनिरुद्धचा मोठा फोटो लावला होता. गळ्यात ताज्या पांढऱ्या फुलांचा हार होता, आणि फोटोतला तो नेहमीसारखाच हसत होता.
जणू काही सांगत होता, “मी आहे…”
पण वास्तव फार वेगळे होते. तो होता, पण कुणासाठीच नव्हता.

अनिरुद्ध वरून हे सगळे पाहत होता. आता त्याला काळ, वेळ, अंतर, कशाचंच भान उरले नव्हते. फक्त स्वतःचं घर दिसत होते आणि त्या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या आत्म्याला जाळत होती.
घरात लोकांची सतत ये-जा सुरू होती. कोणी डोळे पुसत येत होते, कोणी स्वराला धीर देत होते, कोणी शरदरावांच्या खांद्यावर हात ठेवून शांत बसले होते, कोणी मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत होते, तर काही डोळ्यांत अश्रू कमी आणि प्रश्न जास्त होते.
हॉलच्या एका कोपऱ्यात स्वरा शांत बसली होती. शांत की पूर्णपणे सुन्न, हेच ओळखता येत नव्हते. तिचे केस विस्कटलेले होते. कपाळावरचे कुंकू कधीच पुसले गेले होते. हातातल्या हिरव्या बांगड्या फुटून तुकडे झाल्या होत्या. डोळे रडून लाल झाले होते, पण आता अश्रूही जणू संपले होते.
तिच्या मांडीवर लहान मुलगी गाढ झोपली होती. रडता रडता दमून ती तशीच झोपून गेली होती. मोठा मुलगा तिच्या खांद्याला बिलगून बसला होता.
त्याच्या डोळ्यांत एकच प्रश्न होता,
“आता बाबा खरंच परत येणार नाहीत?”
त्याच्या डोळ्यांत एकच प्रश्न होता,
“आता बाबा खरंच परत येणार नाहीत?”
तो काही बोलत नव्हता, पण त्याची नजर सारखी दाराकडे जात होती. जणू आत्ताच बाबा येतील, दार उघडतील आणि म्हणतील, “अरे, मी आलो.”
तेवढ्यात दोन बायका घरात आल्या. एकीने चेहऱ्यावर पदर धरला होता. दुसरी आजूबाजूला बघत कुजबुजली,
“काय उपयोग आता रडून…”
“काय उपयोग आता रडून…”
पहिली लगेच म्हणाली,
“हो ना… पुरुष उगाच आत्महत्या करत नाहीत…”
“हो ना… पुरुष उगाच आत्महत्या करत नाहीत…”
दोघींचे शब्द हळू होते पण स्वराच्या कानापर्यंत अगदी स्पष्ट पोहोचले होते. ती हलकीशी दचकली. क्षणभर तिची मान खाली गेली.
काही वेळाने एक नातेवाईक काकू हळूहळू स्वराजवळ येऊन बसली. तिने स्वराच्या डोक्यावरून हात फिरवला. आवाजात सहानुभूती होती, पण नजरेत कुतूहल.
“बाई…” ती हळू आवाजात म्हणाली, “खरं सांग… काही भांडण झालं होतं का?”
स्वराने हळूच वर पाहिले.
तिच्या डोळ्यांत अविश्वास होता.
“काय?”
तिच्या डोळ्यांत अविश्वास होता.
“काय?”
काकू अजून जवळ सरकली.
“म्हणजे… काही कारण तर असेल ना? एवढा शिकलेला माणूस, उगाच असा निर्णय घेत नाही.”
“म्हणजे… काही कारण तर असेल ना? एवढा शिकलेला माणूस, उगाच असा निर्णय घेत नाही.”
स्वराने काही उत्तर दिले नाही. ती फक्त दोन्ही मुलांना अजून घट्ट जवळ घेत बसली. तिच्या हातांची पकड घट्ट झाली. इतकी घट्ट की मुलगाही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.
ते बघून अनिरुद्धचे हृदय चिरले.
“स्वरा…” तो हळू आवाजात म्हणाला.
“बोल ना…”
“सांग त्यांना…”
“तू दोषी नाहीस…”
“बोल ना…”
“सांग त्यांना…”
“तू दोषी नाहीस…”
पण…
ती एकटीच होती, पूर्ण एकटी.
ती एकटीच होती, पूर्ण एकटी.
दुपार सरत आली. घरात थोडी शांतता पसरली होती.
लोकांचे आवाज कमी झाले होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून जोरात रडण्याचा आवाज आला. अनिरुद्धने घाबरून तिकडे पाहिले, सुमित्रा, त्याची आई, त्या रडत होत्या. पण त्या रडण्यात फक्त दु:ख नव्हते, रागही मिसळला होता.
लोकांचे आवाज कमी झाले होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून जोरात रडण्याचा आवाज आला. अनिरुद्धने घाबरून तिकडे पाहिले, सुमित्रा, त्याची आई, त्या रडत होत्या. पण त्या रडण्यात फक्त दु:ख नव्हते, रागही मिसळला होता.
त्या रडता रडता बोलत होत्या,
“माझा मुलगा सुखात होता…”
“माझा मुलगा सुखात होता…”
त्यांचा आवाज थरथरत होता.
“पण काही लोकांना मोठं घर हवं, फ्लॅट हवा…”
“कार हवी…”
“स्टेटस हवं…”
त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
आणि पुढचे वाक्य त्यांनी अक्षरशः किंचाळत म्हटले, “आणि शेवटी माझा मुलगाच गेला…!”
“पण काही लोकांना मोठं घर हवं, फ्लॅट हवा…”
“कार हवी…”
“स्टेटस हवं…”
त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
आणि पुढचे वाक्य त्यांनी अक्षरशः किंचाळत म्हटले, “आणि शेवटी माझा मुलगाच गेला…!”
क्षणात संपूर्ण घर शांत झाले. जणू वेळच थांबली.
प्रत्येक शब्द स्वराच्या छातीत खंजीरासारखा घुसत होता.
प्रत्येक शब्द स्वराच्या छातीत खंजीरासारखा घुसत होता.
ते सगळे ऐकून अनिरुद्ध हादरला.
“आई…!”
“तसं नाही आहे…”
“तिचे असे काही नव्हते, माझे सुद्धा स्वप्न होते.. आपल्या सर्वांची स्वप्नं मला पूर्ण करायची होती.. सगळे व्यवहार, कर्तव्य पार पाडायचे होते, ती दोषी नाहीये…”
तो आक्रोश करत होता. पण त्याची आई, त्याला ऐकू शकत नव्हती.

स्वराने हळूहळू डोळे वर केले. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्याहून जास्त वेदना होती. ती सावकाश उठली. एक एक पाऊल टाकत स्वयंपाकघरात गेली. घरात बसलेले सगळे लोक आता तिच्याकडे पाहत होते. ती सुमित्राबाईंसमोर येऊन थांबली. हळूच हात जोडले. आवाज पूर्ण तुटलेला होता, पण शब्द स्पष्ट होते.
“आई…”
सुमित्राबाईंनी रागाने तिच्याकडे पाहिले.
सुमित्राबाईंनी रागाने तिच्याकडे पाहिले.
स्वरा पुढे म्हणाली—
“हो…”
“मी कधीतरी म्हणाले होते…”
तिचा आवाज भरून आला.
“आपलं घर असावं, आनंदी, चांगलं सुखी आयुष्य असावं…”
क्षणभर ती थांबली. ओठ थरथरले. डोळ्यांतले अश्रू आता आवरणे अशक्य झाले.
“हो…”
“मी कधीतरी म्हणाले होते…”
तिचा आवाज भरून आला.
“आपलं घर असावं, आनंदी, चांगलं सुखी आयुष्य असावं…”
क्षणभर ती थांबली. ओठ थरथरले. डोळ्यांतले अश्रू आता आवरणे अशक्य झाले.
आणि ती पुढे म्हणाली,
“पण…”
“त्यासाठी तुमचा मुलगा हवा होता, तुमच्या मुलात माझे आयुष्याचे सगळे सुख होते..”
तिचा आवाज पूर्ण तुटला होता.
“त्याचा मृत्यू नाही…”
“पण…”
“त्यासाठी तुमचा मुलगा हवा होता, तुमच्या मुलात माझे आयुष्याचे सगळे सुख होते..”
तिचा आवाज पूर्ण तुटला होता.
“त्याचा मृत्यू नाही…”
क्षणात संपूर्ण घर स्तब्ध झाले. कोणी हलले नाही. कोणी बोलले नाही. सगळे नुसते तिच्याकडे पाहत राहिले.
वरून अनिरुद्धच्या डोळ्यांत अश्रू आले.
वरून अनिरुद्धच्या डोळ्यांत अश्रू आले.
पहिल्यांदा, त्याला स्वतःची लाज वाटली. जिच्याबद्दल तो अभिमानाने म्हणायचा, “ती माझी ताकद आहे…”
त्याच ताकदीला, तो एकटे सोडून गेला होता.
त्याच ताकदीला, तो एकटे सोडून गेला होता.
रात्र झाली. हळूहळू सगळे पाहुणे निघून गेले. घर पुन्हा शांत झाले. भिंतीवरच्या घड्याळाचा टिक-टिक आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मुलं रडता रडता झोपून गेली होती.
आई-वडील थकून त्यांच्या खोलीत गेले होते.
आणि त्या शांततेत, स्वरा पहिल्यांदा पूर्णपणे कोसळली. ती हळूहळू उठली. अनिरुद्धच्या फोटोजवळ जाऊन बसली. फोटो हातात घेतला. काही क्षण ती फक्त त्याच्याकडे बघत राहिली. आणि मग तिच्या आत साचलेलं सगळं दु:ख फुटून बाहेर आले.

“का केलत हे…?” तिचा आवाज थरथरत होता.
“एकदा तरी सांगितलं असतंस…”
“मी सोबत उभी राहिले नसते का?” तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.
“कर्ज होतं?”
“ताण होता?”
“अपमान झाला होता?”
“काहीही असो…”
तिने फोटो छातीशी घट्ट धरला आणि अक्षरशः हुंदके देत म्हणाली, “मी होते ना…”
क्षणभर ती शांत झाली. मग तिने डोळे बंद केले आणि शेवटचा प्रश्न विचारला,
“ तुम्ही मरताना…”
“एकदाही आमचा विचार केला नाही का…?”

वरून अनिरुद्ध गुडघ्यावर कोसळला. त्याच्या डोळ्यांत पश्चात्ताप होता. पहिल्यांदाच त्याला पूर्णपणे जाणवले तो मेला होता पण शिक्षा जिवंत लोक भोगत होते.
पण…
अजून हे फक्त सुरुवात होती.
अजून हे फक्त सुरुवात होती.