पाणी कुठेतरी मुरतेय….
“ नशीब काढले हो पोरी, अशी छान सासू मिळाली आहे सांगू… संसाराचे सोने होईल बघ..”
“अहो, त्यांच्यासारखी सासू मिळाली तर आयुष्य धन्य!”
उंबरठा ओलांडून मीनल घरात आली आणि जो तो तिला हेच म्हणत होता.
घरात नवीन सून आली की आयाबाया सुनेचे कौतुक करतात, गोड आहे, लक्ष्मीनारायणाचा जोडा, छान आणली हो सुनबाई, असे शब्द ऐकायला येतात तर इकडे वेगळेच सुरू होते, सून राहिली बिचारी बाजूला सगळ्या आयाबाया येऊन तिला सासूबद्दलच बोलत होते. सगळेच त्यांची फारच स्तुती करत होते. अन् तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली “ पाणी कुठेतरी मुरतेय..”
अगदी मोठे नाही पण छान प्रशस्त , तीस एक वर्षापूर्वी बांधलेले दुमजली घर होते. बाहेर बगीचा सदृश छोटासा परिसर. घरात तीन मुले आणि तीन सुना , मुग्धा, रश्मी आणि आता नुकतीच लग्न होऊन आलेली धाकटी सून मीनल आणि यांना सगळ्यांना सांभाळणाऱ्या सासूबाई सरस्वती बाई, त्यांच्या चेहऱ्यावर भारी तेज होते.
मीनलने आतापर्यंत तरी काहीच दोष नसलेली सासू बघितली वा ऐकली नव्हती. घरात आल्या दिवसापासून तिचे सतत निरीक्षण सुरू होते.
“आपल्या आईसारखी सासू कुणाला मिळाली असेल का? इतक्या समजूतदार, इतक्या प्रेमळ!”, एक दिवस सकाळी चहा घेताना तिघीही सुना एकत्र बसून गप्पा करत असताना मुग्धा म्हणाली.
“खरंच! मला तर कधीच सासू-सुनेचा ताण जाणवलाच नाही. आईने आम्हाला मुलीसारखं सांभाळलं.”रश्मी.
मीनल हे सगळं शांतपणे ऐकत होती.
तिच्या मनात विचार आला,
“इतकं परफेक्ट कुणी असू शकतं का? काहीतरी वेगळं आहे… पाणी कुठेतरी मुरतंय.” पण ती काही बोलली नाही.
तिच्या मनात विचार आला,
“इतकं परफेक्ट कुणी असू शकतं का? काहीतरी वेगळं आहे… पाणी कुठेतरी मुरतंय.” पण ती काही बोलली नाही.
******
एक दिवस मीनल स्वयंपाकघरात भाजी करत होती. तेव्हा सरस्वतीबाई आत आल्या.
“मीनल, काय करतेस गं?
“आई, भाजी करते आहे.” तिने हात उत्तर दिले.
“अगं, इतकी घाई नको. आरामात कर. काही मदत हवी का? दे मी भाजी चिरते..” म्हणत त्यांनी भाजी चिरायला घेतली.
“अहो नको, मी करते.”
“करू दे ग, तेवढेच कामं लवकर आटोपातील..” त्या हसत म्हणाल्या.
कविताला ते ऐकून बरं वाटलं. पण तिच्या मनात अजूनही शंका होती.
थोड्या वेळाने मुग्धा स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली,
“अगं मीनल, आई किती छान आहेत ना? आम्हाला कधीच काही सांगत नाहीत.”
“अगं मीनल, आई किती छान आहेत ना? आम्हाला कधीच काही सांगत नाहीत.”
“हो… छान आहेत.”मीनल हलकंसं हसली.
पण मनात ती विचार करत होती, “काहीतरी जास्तच छान आहे…”
पण मनात ती विचार करत होती, “काहीतरी जास्तच छान आहे…”
****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा