एक दिवस दुपारी शेजारच्या काकू आल्या. घरात सगळ्या सुना बसल्या होत्या. गप्पा रंगल्या होत्या. आणि अगदीच नेहमीच्या गप्पा, कुणाची सासू कशी तर कुणाची सून कशी.
“अगं मीनल तुला माहितीये का , तुमची सासू तर गावात आदर्श सासू म्हणून प्रसिद्ध आहे. अगदी आम्हा सर्वांची आदर्श! ” काकू नवीन सुनबाईला माहिती पुरवू लागल्या. ते ऐकून मीनल ची भुवया उंच झाल्यात.
“हो ना काकू, आम्ही खूप नशीबवान आहोत.” मुग्धा अभिमानाने म्हणाली.
“आई कधीच रागावत नाहीत. कधी आवाजही चढवत नाहीत.” रश्मीने दुजोरा दिला.
मीनल शांत बसून ऐकत होती.
“इतकी चांगली माणसं असतात का खरंच?” तिच्या मनात येऊन गेले.
“इतकी चांगली माणसं असतात का खरंच?” तिच्या मनात येऊन गेले.
******
मीनल च्या लग्नाला आता जवळ जवळ वर्ष होत आले होते. पण तिला सरस्वतीबाईंच्या विरोधात असे काहीच सापडले नाही. एवढ्या दिवसात मोठ्या दोन सुनानी सुद्धा तिला वावगे वाटावे असे सांगितले नाही की त्यांना तसे काही बोलतांना ऐकले नाही. मुग्धा आणि रश्मीच्या माहेरच्यांचे सुद्धा घरात छान स्वागत व्हायचे, त्यांच्या कडून सुद्धा तिला काही ऐकू आले नाही.
*********
दुपारी मीनल बाहेर बगीच्यात असलेल्या पाळण्यावर बसत पुस्तक वाचत होती, पण कुठेतरी हरवलेली दिसत होती. सरस्वती बाई काहीतरी बागकाम करत होत्या , तर त्यांचे लक्ष तिच्याकडे गेले.
“काय गं मीनल, काही विचार करतेस? काही टेन्शन आहे का?” त्यांनी विचारले.
“अ.. काही नाही.” ती हातातील पुस्तक बाजूला ठेवत म्हणाली.
“काय वाचत होती?”
“असेच आपले काहीतरी, कथा होत्या..”
“तुला छानच वाचनाची आवड दिसतेय..”
“हो, कथा वाचल्या की छान फ्रेश वाटते..” ती स्मित करत म्हणाली.
“काही झालेय का मीनल? मला सांगून बघ. ते काय असतं, मुलांना शाळेत शिकवतात .. हा शेअरिंग इज केरिंग .” त्यांनी स्मित केले.
“तसे काही नाही, मघाशी मैत्रिणीशी फोनवर बोलत होते, तर तेच असेच म्हणजे… घरातील वाद.. “
त्यावर त्या हसल्या.. “ सासू सुनेचे… “
मीनलने मान हलवली.
“ऐकून घेत जा तिचे, जास्ती काही सल्ले देऊ नको.. कारण कधी कधी त्सल्ले नकोच असतात, आपले मन मोकळं करायला, आपले बोलणे ऐकायला कुणीतरी हवे असते..
दुसरे म्हणजे प्रत्येकाची आपली आपली बाजू असते, त्यामुळे आपण कुणा एकाचे ऐकून कोण चूक, कोण बरोबर , नाही ठरवू शकत..” सरस्वतीबाई.
दुसरे म्हणजे प्रत्येकाची आपली आपली बाजू असते, त्यामुळे आपण कुणा एकाचे ऐकून कोण चूक, कोण बरोबर , नाही ठरवू शकत..” सरस्वतीबाई.
मीनल त्यावर हसली. खूप विचार करत शेवटी ती म्हणाली..
“आई… एक विचारू?”
“आई… एक विचारू?”
“नक्की विचार.”
“सगळे म्हणतात तुम्ही खूप चांगल्या सासू आहात… पण इतकं परफेक्ट कुणी असू शकतं का? कधी राग येत नाही का तुम्हाला?”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा