मेघा.... उद्या सकाळी माझा मावस भाऊ विशाल आणि त्याची सर्व फॅमिली आपल्याकडे येणार आहेत तेव्हा त्यांची सर्व व्यवस्था नीट झाली पाहिजे. मी उद्या ऑफिस वरून लवकर घरी येईल.
मेघा चिडलेल्या स्वरात बोलते...अरे राहुल अगोदर तरी सांगायचं ना!
अगं त्याचा मला चार दिवसांपूर्वीच फोन आला होता पण, मीच विसरलो सांगायला...
हे सर्व ऐकल्यानंतर मेघाला टेन्शनच येत. राहुल ! असे आयत्यावेळी कोणते पाहुणे येणार असतील तर मला काही सुचत नाही. आता सकाळी उठल्यानंतर मी कोणती कोणती तयारी करू. घर आवरून की स्वयंपाक करू.
राहुल मेघाच्या खांद्यावर सर्व जबाबदारी टाकत . बोलतो करशील गं माझी राणी तू सगळं मॅनेज . शेवटी माझी बायको सुपर वुमन आहे. मला माहितीये तू पाहुण्यांचा पाहुचार खूप चांगल्या पद्धतीने करशील.
तू तुझ्या सासरच्या सर्व पाहुण्यांची इतकी मनापासून काळजी घेतेस, म्हणून तर सर्व पाहुणे आपल्याकडे एवढ्या आपुलकीने यायला मागतात. जर तू त्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने केलाच नसता तर कोणीही आपल्याकडे आलेच नसते. खरचं तुझा हा स्वभाव मला खूप आवडतो.
तू तुझ्या सासरच्या सर्व पाहुण्यांची इतकी मनापासून काळजी घेतेस, म्हणून तर सर्व पाहुणे आपल्याकडे एवढ्या आपुलकीने यायला मागतात. जर तू त्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने केलाच नसता तर कोणीही आपल्याकडे आलेच नसते. खरचं तुझा हा स्वभाव मला खूप आवडतो.
नवऱ्याचे दोन कौतुकाचे शब्द ऐकल्यानंतर मेघाला भारीच जोश येतो. ती लगबगिने सकाळी उठल्यानंतर सर्व काम करण्यासाठी सज्ज होते. पनीरची, भाजी मसालेभात, अळूवड्या, वरण , पापड, लोणचं ,कोशिंबीर असे सर्व पदार्थ बनवून तयार ठेवते.
पाहुणे सकाळी 11 वाजता येतात. अकरा वाजेपर्यंत मेघाचा सर्वच स्वयंपाक झालेला असतो.
मेघा आलेल्या पाहुण्यांचं कोल्ड्रिंक देऊन स्वागत करते.
अर्धा तास त्यांच्याशी छान गप्पा मारून, नंतर सर्वांना जेवण वाढते.मेघाने बनवलेल्या स्वयंपाकाचा स्वाद इतका अप्रतिम असतो की सगळे पाहुणेमंडळी अगदी खुश होऊन जातात. पाहुण्यांचे जेवण होईपर्यंत राहुल देखील ऑफिस वरून घरी येतो . तो येताना सर्व पाहुण्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतो.
मेघा सर्वांना आईस्क्रीम देते . सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत आईस्क्रीम खाऊ लागतात.
राहुलचा मावस भाऊ विशाल म्हणतो, राहुल तू खरचं नशीबवान आहेस . एवढी छान सुगरण बायको तुला मिळाली.
त्यांनी केलेल कौतुक ऐकून मेघाला फार छान वाटतं.
विशाल ची बायको म्हणते.... आजकाल काही लोकांच्याकडे चहा सुद्धा विचारत नाहीत. जेवण करणं तर खूप दूरची गोष्ट. पण वहिनी मी प्रत्येक वेळेस तुमच्याकडे आलो की तुम्ही, आमचं नेहमी हसतच स्वागत करता. खरंच तुमचा हा स्वभाव आम्हाला खूप आवडतो.
सर्व पाहुणे गेल्यानंतर राहुल देखील मेघाच कौतुक करतो. मेघा आणि राहुल झोपायला जाणार तितक्यात मेघाला तिच्या भावाचा फोन येतो.
हॅलो मेघा मी जय बोलतोय... आम्ही चार तारखेला दिल्लीला जाणार आहोत. खूप दिवस झाले दाजींची भेट झाली नाही. त्यांना भेटण्यासाठी आम्ही तुझ्याकडे येणार आहोत. पण मला लगेच निघावं लागेल त्यामुळे दाजींना त्यादिवशी सुट्टीच घ्यायला सांग.
हो हो चालेल... असे बोलून मेघा मनातच विचार करते. मी माझ्या सासरकडच्या सर्व पाहुणेमंडळीचा मनापासून मान सन्मान ठेवते, पण राहूल माझ्या माहेरच्या कोणत्याच कार्यक्रमाला कधीच आला नाही . आता माझा दादा इतक्या दिवसांनी घरी येणार आहे, तर राहुल दादासाठी वेळ काढेल का?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा