तुझं स्वप्न तूच पूर्ण करणार.”
मंदा हसली.
“या वयात?”
मंदा हसली.
“या वयात?”
“स्वप्नांना वय नसतं.”
मंदा काही बोलली नाही.
मंदा काही बोलली नाही.
लग्न झालं.
सई सासरी गेली.
पहिले काही महिने तिचा फोन फक्त घरच्या गप्पांसाठी असायचा.
सई सासरी गेली.
पहिले काही महिने तिचा फोन फक्त घरच्या गप्पांसाठी असायचा.
एके दिवशी तिने आईला फोन केला.
“आई, तू चित्र काढतेस का अजून?”
पलीकडून बराच वेळ शांतता होती.
“नाही गं.”
“का?”
“आई, तू चित्र काढतेस का अजून?”
पलीकडून बराच वेळ शांतता होती.
“नाही गं.”
“का?”
पुढे....
भाग 2
घरात वेळ कुठे मिळतो?”
सईने फोन ठेवला.
सईने फोन ठेवला.
दोन दिवसांनी कुरिअरने मंदाच्या घरी एक मोठं पॅकेट आलं.
त्यात कॅनव्हास, रंग आणि ब्रश होते.
सोबत एक चिठ्ठी होती—
त्यात कॅनव्हास, रंग आणि ब्रश होते.
सोबत एक चिठ्ठी होती—
“आई, घर सांभाळताना तू तुझं स्वप्न पदराआड लपवलंस. आता तो पदर थोडा बाजूला कर. मला तुझं पहिलं चित्र पाहायचं आहे.”
मंदाच्या डोळ्यांत पाणी आलं.
त्या रात्री घरातले सगळे झोपल्यानंतर तिने पहिल्यांदा मोठ्या कॅनव्हाससमोर ब्रश उचलला.
त्या रात्री घरातले सगळे झोपल्यानंतर तिने पहिल्यांदा मोठ्या कॅनव्हाससमोर ब्रश उचलला.
पण हात थरथरत होता.
ती बराच वेळ कॅनव्हास कडे पाहत राहिली.
ती बराच वेळ कॅनव्हास कडे पाहत राहिली.
मग पहिली रेषा ओढली.
दुसरी.
तिसरी.
चौथी
हळूहळू कॅनव्हासवर एक स्त्री उमटू लागली.
नऊवारी साडी.
डोक्यावर पदर.
नऊवारी साडी.
डोक्यावर पदर.
पण चेहरा मात्र पूर्णपणे प्रकाशात आकाशाकडे पाहणारा.
चित्र पूर्ण झाल्यावर मंदा बराच वेळ त्याकडे पाहत राहिली.
चित्र पूर्ण झाल्यावर मंदा बराच वेळ त्याकडे पाहत राहिली.
खाली तिने लिहिलं -
“पदराआडचं स्वप्न.”
काही महिन्यांनी सई माहेरी आली.
तिने आईच्या खोलीत ते चित्र पाहिलं.
तिने आईच्या खोलीत ते चित्र पाहिलं.
“आई… हे तू काढलं?”
मंदा हसली.
“हो.”
मंदा हसली.
“हो.”
“खूप सुंदर आहे.”
“माहितीय का, ही बाई कोण आहे?”
“माहितीय का, ही बाई कोण आहे?”
सईने चित्राकडे पाहिलं.
मंदा म्हणाली,
“मी.”
सईने आईला मिठी मारली.
मंदा म्हणाली,
“मी.”
सईने आईला मिठी मारली.
“आई, तू खूप उशिरा का का होईना, पण स्वतःला शोधलंस.”
मंदा हसत म्हणाली,
“नाही गं… मी स्वतःला कधी हरवलंच नव्हतं.”
मंदा हसत म्हणाली,
“नाही गं… मी स्वतःला कधी हरवलंच नव्हतं.”
ती चित्राकडे पाहत म्हणाली,
“फक्त इतकी वर्षं पदराआड ठेवले होत.
“फक्त इतकी वर्षं पदराआड ठेवले होत.
त्या दिवशी सईला एक गोष्ट समजली—
घरासाठी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवणाऱ्या प्रत्येक स्त्रीने ती स्वप्नं मारलेली नसतात.
घरासाठी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवणाऱ्या प्रत्येक स्त्रीने ती स्वप्नं मारलेली नसतात.
कधी कधी ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात.
आणि त्या स्वप्नांना पुन्हा उजेडात आणण्यासाठी मोठ्या क्रांतीची गरज नसते.
आणि त्या स्वप्नांना पुन्हा उजेडात आणण्यासाठी मोठ्या क्रांतीची गरज नसते.
कधी कधी…
फक्त कोणीतरी एवढंच म्हणावं लागतं—
आम्ही आहोत,
,आता तुझी वेळ आहे.”
फक्त कोणीतरी एवढंच म्हणावं लागतं—
आम्ही आहोत,
,आता तुझी वेळ आहे.”
नोट.
प्रत्येकाच्यात काहीतरी कलागुण असतात, पण ते हळू हळू धूसर होत जातात कारण काहीही असेल कामामुळे किंवा वेळेमुळे तरीही वेळात वेळ कडून आपल्या कलांना वाव द्या त्यांना बहारु द्या.
प्रत्येकाच्यात काहीतरी कलागुण असतात, पण ते हळू हळू धूसर होत जातात कारण काहीही असेल कामामुळे किंवा वेळेमुळे तरीही वेळात वेळ कडून आपल्या कलांना वाव द्या त्यांना बहारु द्या.