अंक दुसरा:
दहा मिनिटांच्या मध्यंतरानंतर दुसरा अंक सुरू होण्या अगोदर भारदस्त आवाजात उद्घोषणा होते.
"नमस्कार रसिकहो! नाट्यलंकार सादर करत आहे दोन अंकी नाटक "औट घटकेची राणी". यातील भूमिका आणि कलाकार
नंदिनी : विलासिनी थत्ते
आई. : केतकी सावंत
सविता : अलका गोळे
आणि निरजच्या भूमिकेत अविनाश महिपती.
आई. : केतकी सावंत
सविता : अलका गोळे
आणि निरजच्या भूमिकेत अविनाश महिपती.
पडदा हळूहळू वर जातो. रंगमंचावर आई आणि नंदिनीच्या गप्पा रंगात आलेल्या असतात. इतक्यात पुन्हा टिंग टाँग बेल वाजते. आई आणि नंदिनी दोघीच असताना आता कोणी डिस्टर्ब करायला नको असं त्यांना वाटतं. दार उघडल्यावर जबरदस्ती शेजारची सविता घरात शिरते.
सविता (लोचटपणे) : अरे व्वा नंदू आई दुपारी दुपारी तुझ्यासाठी खाऊ घेऊन आली म्हणजे काय गोड बातमी आहे का?
नंदिनी (रागावून): सविता गोड बातमी असेल तर लपल्याशिवाय राहणार आहे का. जरा कोणाच्या लग्नाला दोन तीन वर्ष झाली की दगड मारून पहायला सुरुवात.
सविता : नाही गं. तू माझी मैत्रीण म्हणून उत्सुकता बाकी काही नाही.
नंदिनी : सविता हल्ली प्रत्येक जोडपं ठरवतं मूल कधी होऊ द्यायचं ते. खरं तर ह्या अशा नसत्या चौकशा पूर्वीच्या काळी म्हाताऱ्या बायका करायच्या. आता तुझ्यासारख्या इतरांच्या गोष्टीत नाक खुपसणाऱ्या करतात.
सविता : काय हे नंदू मी तुझी मैत्रीण आणि तू मला काहीही बोलतेस. आई तुम्हीच सांगा हे वागणं हिला शोभत का?
नंदिनी : सविता आपण संध्याकाळी बोलूया का. माझ्या आईला घरी जायची घाई आहे आणि आम्हाला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तो विषय पण मी तुला सांगेन.
सविता : बरं बाई मी निघते आता. बा ssss य
आई : नंदू या अशा बायका असल्या की नवरे तरी काय करणार. काही नवरे खूप चांगले अगदी सरळमार्गी असतात. त्यांच्या बायका बिलंदर असतात. तू त्या रिनाचे एव्हढे कौतुक करतेस. ती आणि तिचं नवरा एकदा तुझ्याबरोबरच आपल्या घरी आले होते.
त्या दिवशी आपल्या घराजवळच्या मॉल मध्ये मी त्याला एक दुसऱ्या बाईबरोबर पाहिले. मला बघून तो दुसरीकडे पसार झाला. आणि ती शलाका, तिचा नवरा तुझा मावसभाऊ सतिशच्या ऑफिसमध्ये आहे. रोज घरी बायकोला ऑफिसमध्ये जास्त काम आहे सांगून मित्रांबरोबर बारमध्ये पार्टी करायला जातो. अगं ह्यांच्या पुरुषांना माहिती आहे बायकाना महागाच्या गिफ्ट्सचे अमिष दाखवले की हे त्यांना हवे तसे वागायला मोकळे. अर्थात सगळेच पुरुष असे नसतात बरं!
त्या दिवशी आपल्या घराजवळच्या मॉल मध्ये मी त्याला एक दुसऱ्या बाईबरोबर पाहिले. मला बघून तो दुसरीकडे पसार झाला. आणि ती शलाका, तिचा नवरा तुझा मावसभाऊ सतिशच्या ऑफिसमध्ये आहे. रोज घरी बायकोला ऑफिसमध्ये जास्त काम आहे सांगून मित्रांबरोबर बारमध्ये पार्टी करायला जातो. अगं ह्यांच्या पुरुषांना माहिती आहे बायकाना महागाच्या गिफ्ट्सचे अमिष दाखवले की हे त्यांना हवे तसे वागायला मोकळे. अर्थात सगळेच पुरुष असे नसतात बरं!
नंदिनी (आश्चर्याने) : काय म्हणतेस आई. बापरे हे खूपच भयानक आहे. त्यांना माहित पण नसतील आपल्या नवऱ्याच्या भानगडी.
आई : मला सांग नंदू आपल्या नीरजमध्ये काय खोट काढू शकतेस का तू. तुझ्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. सध्या हे लोनचे हप्ते जरा फिटू देत. मग बघ कसा मोकळ्या हाताने खर्च करेल. बरं तो इतका स्वाभिमानी आहे त्याचे अण्णा किंवा तुझे बाबा मदत देऊ करत होते तर ती पण नम्रपणे नाकारली.
नंदिनी (समजूतदारपणे) : आई मी आता अगदी अभिमानाने महिला मंडळात जाईन आणि महिला दिन केवळ एक दिवसासाठी नसून तो ३६५ दिवसांसाठी असला पाहिजे असं सर्वांना ठणकावून सांगेन. आता नीरज आल्यावर मी आधी त्याची माफी मागेन.
आई (घाईघाईने) : बरं नंदू मी निघते आता. तुझे बाबा माझ्या हातच्या चहासाठी थांबले असतील.
नंदिनी : आई तू बाबांना लाडावून ठेवलं आहेस. घेतील करून स्वतःच्या हाताने.
आई : अगं मी जर उशिरा घरी येणार असले तर करतातच ते. आणि नंदू तुला एक सांगू का ते असे माझ्या चहासाठी थांबून राहतात ते मला पण खूप आवडतं. अगं त्यात पण प्रेमाची एक वेगळीच लज्जत आहे.
(नंदिनीला बाय करून आई निघून जाते.)
रंगमंचावर हलका अंधार होऊन नंदिनी
नीरजच्या आवडीचे कपडे घालून प्रफुल्लित चेहऱ्याने बाहेर येते. ती दोघांच्या आवडीचे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील
नीरजच्या आवडीचे कपडे घालून प्रफुल्लित चेहऱ्याने बाहेर येते. ती दोघांच्या आवडीचे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील
"हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र यावी"
हे गाणं लावते. आज नंदिनीला नीरज आल्यावर स्वतः दार उघडायचं असतं पण नीरज नंदिनीला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून स्वतःजवळच्या चावीने नेहमी दार उघडतो. आजही तो तसाच आत येतो आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहून खुश होतो.
नीरज (नंदिनीच्या जवळ जात): मला वाटलं होतं माझा अर्धा तास तुला मनवण्यात जाईल की काय. बहुतेक तुझी प्रिय व्यक्ती तुला भेटून गेलेली दिसते.
नंदिनी: फक्त माझीच नाही तर तुझीही आवडती व्यक्ती आली होती. माझी आई. थांब मी तुझ्यासाठी चहा आणते आणि त्याबरोबर आईने आणलेली खुसखुशीत थालीपीठ. चहा घेता घेता आपण बोलूया.
नीरज सोफ्यावर बसतो आणि नंदिनी एक हातात चहा आणि दुसऱ्या हातात थालीपीठ घेऊन येते.
नंदिनी (समजूतदारपणे): नीरज मला माफ कर मी वेड्यासारखे तुझ्याकडे हट्ट करत होते. मी आता आठ मार्चला ऐटीत जाईन आणि कोणी काय विचारलं तर त्यांना सांगेन मला "औट घटकेची राणी" बनायचं नाही. माझा नवरा मला ३६५ दिवस राजाच्या राणीसारखं ठेवतो. अगं आपल्याला घरातल्या पुरुषांनी कायमच प्रेम, आदर दिला पाहिजे. अशा विशेष दिवशी आपल्याला पाहिजे तसं वागलं म्हणजे झालं नाही. आपण आजुबाजूला पाहतो आठ मार्चला महिलांसाठी विविध योजना दिसतात. एखादा राजकीय पक्ष आपल्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवतो, एखाद्या हॉटेलमध्ये मोफत जेवण असतं, कोणी एखाद्या सिनेमाचा मोफत शो ठेवतात, कुठे साड्यांच्या दुकानात महासेल असतो. घरातील पुरुष पण आपल्या घरातल्या स्त्रियांना किचन पासून सुट्टी म्हणून सगळेच बाहेर जेवायला जातात. हे सारं फक्त एकाच दिवसासाठी मर्यादित असतं. आपण इतक्या अल्पसंतुष्ट आहोत का?
नीरज (कौतुकाने) : अरे व्वा माझ्या नंदूला आता चांगलंच कळलं आहे. अगं तुला खरं सांगू का आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करतो. आणि हे मार्केटिंग वाले बरोबर सर्वांना वेठीस धरतात. फेब्रुवारीत व्हॅलेंटाईन वीक असतो. तेव्हा तर पैशाची चांगलीच उधळपट्टी होते. आपल्याकडे काही पुरुष स्त्रीला अगदी नगण्य वागणूक देतात. पण काही त्यांचा किती आदर करतात. मला एक सांग तुला हे सगळं आधीपासूनच माहित आहे ना!
नंदू (स्वतःभोवती एक गिरकी घेत): कॉलेजमध्ये असताना मी अभ्यास केला आहे. सर्वप्रथम ८ मार्च १९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये महिला कामगारांनी कामाचे तास कमी करणे, चांगला पगार यासाठी संप केला होता आणि ८ मार्च १९१७ रोजी रशियन महिलांनी केलेल्या संपानंतर हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
नीरज (कौतुकाने टाळ्या वाजवत): इतकं सगळं माहित असलेली माझी बायको इतर बायकांशी तुलना करण्यासाठी आपल्या नवऱ्याकडे महागडे गिफ्ट मागते हे काही पटत नाही.
नंदिनी (लाडात येऊन) आता कुठे मागते. माझ्यासाठी मला माझ्या राजाच्या मनात कायम रहायचं आहे. नको हे औट घटकेचे राणीपद.
दुसरा अंक संपतो. सर्व कलाकार रंगमंचावर येऊन प्रेक्षकांना अभिवादन करतात. प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतो. पुरुष प्रेक्षक खुशीत जरा जास्तच जोरात टाळ्या वाजवतात.
