लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६
विषय:- एकतर्फी प्रेम
विषय:- एकतर्फी प्रेम
एकतर्फी नाते
योगिता लहानपासूनच सुंदर व गोड स्वभावाची मुलगी होती तिच्या घराच्या शेजारीच कुमुद बाई राहात होत्या त्यांना एक मुलगा होता सर्वेश तो योगिता पेक्षा चार वर्षानी मोठा होता पण तरी दोघांची चांगली मैत्री होती. दोघेही सोबत अभ्यास करायचे खेळ खेळायचे.
कुमुद चे पती सर्वेश लहान असताना वारले होते घरात ते दोघेच असायचे...
कुमुद ला योगिता खूप आवडायची तिची सोबत तिचे हसू, तिचे बोलणे यात तिचा दिवस कसा जायचा ते तिलाही कळायचे नाही.
ती तर तिला सतत त्यांची सून करणार असच म्हणायच्या लहानपणापासून योगिता ही त्यांच्या घरी अगदी हक्काने ये जा करायची...
जसजसे ते दोघे मोठे होत होते तसतसे योगिता च्या मनात सर्वेश बद्दल एक वेगळीच भावना...ओढ..
प्रेमाची भावना निर्माण होत होती...
जसजसे ते दोघे मोठे होत होते तसतसे योगिता च्या मनात सर्वेश बद्दल एक वेगळीच भावना...ओढ..
प्रेमाची भावना निर्माण होत होती...
तो मात्र त्याच पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर गावी निघून गेला होता.. अन तो जसा गेला तसा तो तिकडचाच होऊन गेला.
पण इकडे ती तिचे शिक्षण तिचा अभ्यास पूर्ण करत कुमुद ची ही सारी काम तिची सेवा करायची अगदी ती त्या घरची सून असल्यासारखी...
पण तिला हे माहीत नव्हते कि ती जे स्वप्न बघतेय ते तर कधीच पूर्ण होणार नव्हती .
कारण सर्वेश ने कधी तिच्याबद्दल तसा विचारच केला नव्हता... ती तिच्या मनात तिच्या नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत होती, तो त्याच शिक्षण पूर्ण करून येईल अन त्या दोघांना संसार सुरू होईल...
पण तिला हे माहीत नव्हते कि ती जे स्वप्न बघतेय ते तर कधीच पूर्ण होणार नव्हती .
कारण सर्वेश ने कधी तिच्याबद्दल तसा विचारच केला नव्हता... ती तिच्या मनात तिच्या नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत होती, तो त्याच शिक्षण पूर्ण करून येईल अन त्या दोघांना संसार सुरू होईल...
असेच काही वर्षे गेली पण तो तर गावाकडे फिरकला ही नाही, असाच कधीतरी यायचा व लगेच निघून जायचा. त्याने त्याच शिक्षण पूर्ण केले व त्याला तिथेच नोकरी ही लागली तो त्याची पगार ही त्याच्या आईला पाठवून देत होता पण तो मात्र कधी इकडे यायचे नाव घेत नव्हता . कुमुद ने त्याला गावी येण्याचे ही बरेच वेळा बोलून दाखवले पण त्याने काहीतरी कारण सांगून गावी यायचे नाकारले...
योगिता मात्र त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती...
तिचे आईवडिल तिच्या लग्नाचा विचार करू लागले पण ती होती कि त्यांना नकार देत होती... कारण तिचे तर सर्वेश वर प्रेम होते...
तिचे आईवडिल तिच्या लग्नाचा विचार करू लागले पण ती होती कि त्यांना नकार देत होती... कारण तिचे तर सर्वेश वर प्रेम होते...
अशेच आणखी एक वर्ष गेले, कुमुद ची तब्येत पण साथ देत नव्हती त्यामुळे योगिताला त्यांच्या सोबत तिथेच त्यांच्या घरी राहावे लागायचे... गावात यामुळे अनेक जण काहीही बोलू लागले..
ते ऐकून एका दिवशी तिच्या वडिलांनी कुमुद शी तिच्या व सर्वेशच्या लग्नासंबंधी बोलणी केली.. त्या तर आधीच तयार होत्या पण ज्याला लग्न करायचे होते तो मात्र कधीच त्या नात्यात नव्हता..
कुमुद व योगिताचे नाते अगदी सासू सुनेचे होते पूर्ण गावाला हे समजत होते पण ज्याला ते जाणून घ्यायची खरच गरज होती तो मात्र ते पाहण्यासाठी ही तयार नव्हता.
कुमुद व योगिताचे नाते अगदी सासू सुनेचे होते पूर्ण गावाला हे समजत होते पण ज्याला ते जाणून घ्यायची खरच गरज होती तो मात्र ते पाहण्यासाठी ही तयार नव्हता.
शेवटी एका दिवशी योगिता नेच त्याला एसटिडी बूथ वरून फोन केला... तेव्हा पलीकडून एका मुलीने तो फोन उचलला..
"हॅलो... कोण बोलतेय... ?"ती पलीकडची मुलगी बोलू लागली..
"मला सर्वेश ला बोलायचचे आहे..."योगिता बोलली.
"सर्वेश...!! ओके तुम्ही कोण...? "ती पलीकडची मुलगी बोलली..
"मी.... मी त्याची... " तिला तर लाज वाटत होति कि मी त्याची होणारी बायको आहे हे सांगायची..ती बोलत होतीच कि तिच्या कानावर काहीतरी आवाज आला व तिच्या तोंडातले शब्द तोंडातच राहिले..
"सर्वेश... काय करतोयस सोड ना... जा तु आवरून घे तुझ, नाही तर तुला लेट होईल... परत मलाच बोलशील तू..अन हे काय अस सकाळी सकाळी..."म्हणत ती हसतच लाजून बोलत होती...
"काय म्हणजे... मी काय कोणा दुसऱ्या च्या बायकोला हग करतोय का माझ्या हक्काच्या बायकोला हग करतोय..." तो ही हसतच बोलला...
ते शब्द ऐकून तर योगिता च्या पायातले अवसानच गळून गेले.... तिच्या हातातला फोन कधी तिच्या हातातून गळुन पडला हे तर तिचे तिलाही कळले नाही.... ति तशीच काही क्षण अगदीच शांत बसून राहिली...तिला तिने जे ऐकले त्यावर तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता....
पण नंतर ती स्वतः च उभी राहत परत घरी निघून आली.... तिने ती गोष्ट कधीच कोणाला सांगितली नाही, पण ती मात्र मनातून पूर्ण पणे तुटली होती...
ती अगोदर जशी कुमुद ची सेवा करायची तशीच ती आता ही करत होती.. पण मनात एक दु:खद धगधगता अंगार घेऊन ती त्या घरात वावरत होती... तिच्या मनातील सल तिला आतून पोखरत होती अन ती त्या दु:खात कमकुवत बनत जात होती. ना तिचे जेवनाकडे लक्ष होते ना तिच्या आरोग्याकडे, तिची सारी स्वप्न सजण्या आधीच मोडली होती.
एका दिवशी अचानक तिला चक्कर आली व ती कुमुद च्या घराच्या दारातच चालता चालता पडली...
कुमुद तिला आवाज देत उठवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या ने तिला उठवता ही येत नव्हते.. तेवढ्यात दारात एक गाडी येऊन थांबली व त्यातून सर्वेश व त्याची बायको मीना दोघीही घरात यायला निघाले....
"सर्वेश.. तू आलास बर झाल अरे हे बघ ना हिला काय झाले, अचानक अस कस पडली....उचल हिला चल घरात घेऊन डॉक्टर ला बोलव.. "कुमुद काळजीने बोलत होत्या.. तसा तोही पुढे झाला व त्याने तिला आवाज दिला...
"योगिता... योगिता... काय झाले....? "तसे तिने काही क्षणासाठी डोळे उघडले... त्याच्याकडे डोळे भरून पाहिले......
"सर्वेश......"तिच्या त्या आवाजात व तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम भरून येत होते. तिने तिची एक नजर त्या मुली वर टाकली व लगेच काही क्षणात तिने डोळे मिटले तेही कायमचे....
✍️स्वागंधरा
✍️स्वागंधरा
