ईरा शॉर्टफिल्म लघुकथा लेखन स्पर्धा जुलै-२०२६
“ मला नकार द्यायचा असेल तर आत्ताच सगळ्यांसमोर द्या. उगाच फॉर्मलिटी नको.” संगीता थोडे दबक्या आवाजात म्हणाली.
रोहन आश्चर्यचकित झाला.
“ म्हणजे? मी का म्हणून नकार देऊ तुम्हाला?”
“ म्हणजे? मी का म्हणून नकार देऊ तुम्हाला?”
“ खरं सांगू? आजकालची आपली पिढी लग्नसंस्थेवर विश्वास ठेवू शकतच नाही.” संगीता आता थोडे मोकळे होऊन बोलू लागली.
“ का?”
“ का म्हणजे? आपण जेंझी पिढी आहोत. आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करणारा जोडीदार हवाय. राईट?”
“ हो.बरोबर..” रोहन म्हणाला.
“ मग साहजिकच तुम्हाला तुमच्या आईसारखी वागणारी बायको हवी असणार!”
“ हम्म .. आणि तुम्हाला तुमच्या वडिलांसारखा वागणारा नवरा हवाय..” रोहन
“ नो वे.. माझे वडील कधीही आईला पार्टनर म्हणून समजून घेऊ शकले नाही. त्यांनी केवळ तिला त्यांच्या संसारातील एक ऐकणारा नोकर म्हणून वागणूक दिली आणि मी ते लहानापासून पाहत आले आहे. म्हणजे बघ ना, आला गेला पाहुणा, आमचे चिल्यापिल्यांचे खाणे, अभ्यास, शाळेतील नाचगाणी शिवाय घरातील मोठ्यांना काय हवं नको ते तिनेच पाहायचं अगदी आजारी असली तरीही. ती साऱ्यांसाठी उपलब्ध पण तिच्यासाठी मात्र कोणीही वेळेवर उपलब्ध नाही.”
“ हम्म.. मी सुद्धा तेच पाहिलंय माझ्या घरात. म्हणूनच मलाही वडिलांना जशी समजून घेणारी पार्टनर मिळाली तशी पार्टनर नको आहे.”
“ म्हणजे?”
“ हो. अगदी बेधडक, बिनधास्त हवी आहे मला ती. म्हणजे इतकीही माथेफिरु नाही की ती मला त्या सिया गोयलने जसं केतन अग्रवालला लोहगड वरून ढकलून दिलं तसं मृत्यूच्या दाढेत लोटेल.”
“ ए, मी काय अशी वाटले का तुला?”
तेवढ्यात कोणीतरी रूमचे दार वाजवले.
“ बोला तुम्ही दोघे. आम्ही जरा यांचे घर बघतोय.”
“ (आवाजाच्या दिशेने बघत) हो आई…( आता पुन्हा संगीताकडे बघत) कुठे होतो आपण?” रोहन म्हणाला.
“ लोहगड प्रकरणावर..” संगीता नाखुश होत म्हणाली.
“ सॉरी पण मी माझ्या अपेक्षा सांगतोय. तू तशी आहेस असं मला अजिबात म्हणायचं नाही.”
“ हो हो. आमच्यातली एखादी तशी निघाली म्हणून काय आम्ही सगळ्याच वाईट नाही बरं.. तुम्ही पुरुष तरी कुठे कमी आहात म्हणा? कलकत्त्याच्या महिला डॉक्टरवर त्या माथेफिरु तरुणाने अमानूष अत्याचार करून निर्घृण हत्या केली, बदलापूर येथील शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला.”
“ मला वाटतं आपलं बोलणं आता डिबेट मध्ये कन्व्हर्ट झालंय.” रोहन उपहासाने म्हणाला.
“ हो. मलाही तेच वाटतंय. त्यापेक्षा तू सरळ नकार दे मला बाहेर जाऊन. लगेचच.. म्हणजे मी मोकळी आणि तू ही मोकळा.” संगीता बेधडकपणे बोलली.
“ पण माझा होकार असेल तर?” रोहन अजूनही ठाम होता.
“ हे बघ. मी अजून यासाठी तयार नाही. माझ्या मित्र-मैत्रिणींचे घटस्फोट देखील होत आहेत.”
“का होत आहेत? माहित आहे तुला? इगो प्रॉब्लेम.. ज्या अर्थी तू आपल्या पहिल्याच भेटीत मला खरेपणाने सगळं सांगत आहेस त्या अर्थी तू मला कधीही फसवणार नाहीस, माझ्याशी खरेपणाने वागशील अशी मला खात्री वाटते. शिवाय आपण तुम्ही-आम्ही वरून थेट आरेकरेवर लवकरच पोहोचलो. राहिला प्रश्न तुझ्या आईसारख्या आयुष्याचा.. खरं सांगू? तुला लग्नानंतर पूर्णपणे स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार असणार आहे.” रोहन समजुतीच्या सुरात म्हणाला.
“ पण मला याच्यात पडायचंच नाहीये. आई-बाबांनी
मला यासाठी तगादा लावला म्हणून मी तुमच्या फोटोला होकार देऊन तुम्हाला बघण्यासाठी बोलवले पण आता माझा नकार आहे. दुसरी भेटेल की तुम्हाला एखादी..”
मला यासाठी तगादा लावला म्हणून मी तुमच्या फोटोला होकार देऊन तुम्हाला बघण्यासाठी बोलवले पण आता माझा नकार आहे. दुसरी भेटेल की तुम्हाला एखादी..”
“तुला काय वाटतं? आम्हा मुलांना देखील मनात भीती असते. पार्टनर फसवेगिरी करणारा निघाला तर? लग्नानंतर काही महिन्यातच घटस्फोट घ्यावा लागला तर? मी तर अशीही उदाहरणे पाहिली आहेत की बाळाला जन्म देऊन बायका सरळ माहेरी राहून नवऱ्याची पोटगी खातात.”
“तरीही लग्न करायचे आहे?”
“ हो; कारण माझा स्वतःवर विश्वास आहे. माझ्या आयुष्यात येणाऱ्या मुलीचा विश्वास मी जिंकणार आणि तिला आपलंसंही करणार. फक्त तिचा माझ्यावर विश्वास असावा, मग एकदा मने जुळली की विश्वासाला
कधीही तडा जाणार नाही हे मी माझ्या आई-बाबांवरून सांगतो.” रोहन अत्यंत सकारात्मकतेणे बोलला.
कधीही तडा जाणार नाही हे मी माझ्या आई-बाबांवरून सांगतो.” रोहन अत्यंत सकारात्मकतेणे बोलला.
तिकडे संगीताची आई मात्र मनातल्या मनात प्रार्थना करत होती,
‘देवा संगीताला हा मुलगा पसंत पडू दे. अगदी सुसंस्कृत घर आहे. तिला हवा असणारा जोडीदार हाच असू दे..’
‘देवा संगीताला हा मुलगा पसंत पडू दे. अगदी सुसंस्कृत घर आहे. तिला हवा असणारा जोडीदार हाच असू दे..’
तेवढ्यात रोहन आणि संगीता रूम मधून बाहेर आले.
संगीता म्हणाली,
“माझा निर्णय झालाय.”
“माझा निर्णय झालाय.”
संगीताचे वडील अवाक झाले.
ते मध्येच म्हणाले,
“आजकालची मुलं फार फास्ट आहेत. आम्ही कळवतो निर्णय नंतर.”
ते मध्येच म्हणाले,
“आजकालची मुलं फार फास्ट आहेत. आम्ही कळवतो निर्णय नंतर.”
रोहन म्हणाला,
“बाबा, आम्ही फास्ट असलो तरी इतका वेळ एकमेकांशी बोलून एकमेकांना बरंच ओळखू लागलो आहे. त्यामुळे संगीताचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल.”
“बाबा, आम्ही फास्ट असलो तरी इतका वेळ एकमेकांशी बोलून एकमेकांना बरंच ओळखू लागलो आहे. त्यामुळे संगीताचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल.”
संगीताने रोहनकडे एक कटाक्ष टाकला.
“ माझा या लग्नाला..”
“ माझा या लग्नाला..”
संगीताचे आई-वडील तसेच रोहनचे आई-वडील स्तब्ध झाले. रोहन मात्र शांत होता.
“होकार आहे.”
संगीताच्या आईने सुटकेचा निःश्वास सोडला.
तिकडे रोहनच्याही आई-वडिलांना सर्व पसंत असल्याने आनंद झाला.
संगीताच्या आईने सुटकेचा निःश्वास सोडला.
तिकडे रोहनच्याही आई-वडिलांना सर्व पसंत असल्याने आनंद झाला.
रोहनच्या आईने रोहनकडे पाहिले.
रोहनला आपल्या निवडीबाबत पूर्णपणे खात्री होती त्यामुळे संगीताला ओळखून त्याने आपली मान डोलवून थोडेसे लाजतच होकार दिला.
“शाबास! शेवटी प्रत्येकालाच किशोरवयीन अवस्थेच्या उंबरठ्यावर एक नवा अध्याय सुरू करायचा असतोच.” रोहनचे बाबा आनंदाने म्हणाले.
वाचकहो, आजकालची लग्नसंस्था फारच व्यावहारिक झालेली आहे. एकमेकांची मने समजून घेऊन, थोडीशी तडजोड करून, एकमेकांची स्वप्न आपलीच स्वप्न आहेत असे मानून सहकार्य केले, मदत केली तर निश्चितच आजकालच्या जेंझी तरुण मुला-मुलींचा हा लग्नाबाबतचा तिढा नक्कीच सुटेल आणि घटस्फोटासारखी भेडसावणारी समस्या समुळ नष्ट होईल. हो ना?
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
