Login

नीटनेटकेपणा-1

नणंदा सुट्ट्यांमध्ये येऊन सगळं घर अस्ताव्यस्त करत, पण याचे परिणाम त्यांनाच भोवले
चेतनाच्या दोन्ही नणंदांनी सुट्टीत येऊन नुसता हैदोस घातला होता. एक वस्तू जागेवर सापडेना. थोरली नणंद तिच्या दोन आगाऊ मुलांना घेऊन आलेली, आली तर आली पूर्ण किचनओटा बरबटून ठेवला होता. धाकलीचं अजून लग्न झालं नव्हतं पण शिकायला ती दुसऱ्या शहरात होस्टेलवर राहत होती. सुट्टी असल्याने घरी आलेली.

चेतनाला नीटनेटकेपणा आवडे. किचनमध्ये जाऊन एखादा पदार्थ करायचा म्हणजे चटकन ती वस्तू सापडली पाहिजे अश्या पद्धतीने तिने तिचा किचन रचला होता. हॉलमध्येसुद्धा सोफ्यावरची कव्हर अगदी चापूनचुपुन दाबलेली आणि टेबलवर फुलदाणीशिवाय दुसरी वस्तू नको असा आग्रह. दाराजवळ चप्पल बूट रॅकवर नीट रचलेली आणि अंगण स्वच्छ धुवून, सडा रांगोळी करून नीट ठेवलेलं. खरं तर घरात कोणालाच या नीटनेटकेपणाची सवय नव्हती पण चेतनाने हळूहळू सर्वांना या सवयी लावल्या. नणंदा बाहेर होत्या नाहीतर त्यांनाही चांगल्या सवयी लावल्याच असत्या.

दोन्ही नणंदा घरी येताच घर अगदी अस्ताव्यस्त होऊन गेलेलं. चेतनाने समजून घेतलं, की माहेरी आल्या आहेत..इथे स्वातंत्र्य अनुभवू देऊ..पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की त्यांना हीच सवय आहे. किचनओट्यावर मुलांसाठी काही बनवलं की सगळं तसंच टाकून पळायचं, एकाच्या जागी चार-चार भांडी बरबटून ठेवायची, चपला दारातच भिरकावून द्यायच्या, सोफ्याची कव्हर तर जमीनदोस्त करायची आणि अंगणात सगळा कचरा करून ठेवायचा..त्यांनी पसारा घातला की चेतना एकेक आवरून ठेवत असे. तिला वाटे की जाऊद्या आज केलाय पसारा, उद्या नाही करणार..किंवा किमान आवरून तरी ठेवतील. पण कसलं काय..

एकदा अचानक घरी पाहुणे आले, दोन्ही नणंदा त्यांच्या त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या. चेतना पाहुण्यांना पाणी द्यायला जाणार पण ग्लास ठिकाणावर नव्हते, ट्रे जागेवर नव्हता. पाहिलं तर सगळे ग्लास सिंकमध्ये धुवायला. तिने चार ग्लास धुतले, ट्रे शोधला तर अगदी कपाटावर जाऊन बसलेला. तिने घाईघाईने पाणी दिलं. पोहे करायला घेतले तरी तेच, पोहे, शेंगदाणे काहीच सापडेना..सगळे डबे इकडचे तिकडे..कहर म्हणजे मिठाचा डबाही रिकामा, मीठ एका ताटात पसरून ठेवलेलं..मुलांना काहीतरी प्रयोग करायचा होता म्हणून नणंदबाईंनी केलेला हा उद्योग. चेतनाने वैतागतच पोहे बनवले आणि पाहुण्यांना दिले, त्यानंतर पसारा आवरण्यात तिचा चांगला तासभर गेला, ती चांगलीच दमली...पाहुणे गेल्यानंतर मात्र तिने सर्वांना...

क्रमशः

पुढील भाग खालील लिंकवर

https://irablogging.com/blog/nitnetkepana2_49181

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →