निशिगंधा भाग 11 अंतिम
तुला समजून घेतांना...
तुला समजून घेतांना...
©️®️शिल्पा सुतार
रेखाताईंच्या स्वभावाला शरद दोन दिवसात कंटाळला होता. निशिगंधा इतक्या वर्षा पासुन त्यांच करत होती. खरच तिच्यात खूप सहनशक्ती होती. ती समजूतदार आहे आता शरदला समजलं होतं. पुढे...
दुसर्या दिवशी शरद रेखाताईंना घेवून डॉक्टरकडे गेला. त्यांची तब्येत ठीक होती. नेहमीचे औषध घेवून ते घरी आले.
" निशिगंधा, आई एकदम ठीक आहे. आपण ट्रीपला जावू शकतो." तो मोठ्याने म्हणाला.
" तुम्ही कुठे जाताय? " रेखाताई विचारत होत्या.
" मी आणि निशिगंधा एक आठवडा ट्रीप साठी जातो आहोत." शरद म्हणाला.
" माझं काय? हे बर आहे आईला वार्यावर सोडायच स्वतः मजा करायची." रेखाताई कडवट पणे म्हणाल्या.
" वार्यावर कश्याला आई, तू नेहाकडे जा."
" मला जमणार नाही." त्यांनी नकार दिला.
"माझं नेहाशी बोलणं झालं आहे. मी तुला संध्याकाळी तिकडे सोडून येतो. थोडे दिवस तिकडे रहा आई. आम्हाला मुलांकडे ही जायचं आहे." शरदने सांगितलं.
"मला माहिती आहे निशिगंधाने तुला सांगितलं ना. तिला सुरुवाती पासून माझं काही करायचं नव्हतं. " रेखाताई चिडल्या होत्या.
" बघितला निशिगंधा, तु हीच एवढं करून ही काही उपयोग नाही. शेवटी तुला काय ऐकायला मिळालं." शरद म्हणाला.
"बरोबर आहे सुनेच्या हाताला यश नसतं. हा थँक्सलेस जॉब आहे. त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. आता मला त्या भानगडीत पडायचं नाही. " निशिगंधा बॅग भरत म्हणाली.
रेखाताई नेहाकडे गेल्या. त्या नाराज होत्या.
शरद आणि निशिगंधा ट्रीपला गेले. खूप मजा येत होती. निसर्गाच्या सानिध्यात दोघं खुलले होते. अगदी हातात हात घेऊन सगळीकडे फिरत होते. त्यांनी खूप गप्पा मारल्या. मनातल्या सगळया गोष्टी तिने शरद ला सांगितल्या. " इथे किती शांत आणि छान वाटतं ना. मनःशांती आहे. इथे निसर्ग ही किती छान आहे. किती दुर्मिळ फुल आहेत, झाडं आहेत."
"हो. खरच छान वाटत आहे. आपण नेहमीच असं येत जावू." शरद म्हणाला.
दुसर्या दिवशी ते तिकडे फिरायला गेले. खूप खरेदी केली. निशिगंधा अगदी मनमोकळी सगळीकडे बागडत होती. शरद तिच्याकडे बघून खुश होता.
" आयुष्याच्या या संध्याकाळी मला हवं तसं प्रेम आपुलकी मिळाली. अहो मी खुश आहे. असा निवांत पणा मला आवडतो. जिवनात चढ उतार चालू असतात. वेळोवेळी एकमेकांना माफ करून पुढे जायला हवं. आहे ते आयुष्य एन्जॉय करायला हव ना शरद."
"हो निशिगंधा तेच धरून ठेवल तर कस होईल? समोरचा हात देत असेल तर तो प्रेमाने स्विकारायला हवा. "
किती तरी विषयावर ते बोलत होते. मनमोकळ. अगदी छान. फ्रेश होवून ते परत आले.
पुढच्या आठवड्यात ते साक्षीकडे गेले. सचिन वागायला खूप चांगला होता. साक्षीने दोघांनी खूप ठेप ठेवली. ते सगळीकडे फिरून आले. साक्षी बघत होती बाबा आईशी खूप नीट वागता आहेत. तिला समाधान वाटलं. तिला पूर्वीचे दिवस माहिती होते. आईला बराच त्रास होता.
सकाळी साक्षी बाल्कनीत बसून चहा घेत होती. निशिगंधा तिच्या जवळ बसली.
" आई, आता बाबा घरी असतात तर कस वाटत?"
" खूप छान वाटत. ते मला खूप मदत करतात. सांभाळून घेतात." निशिगंधा म्हणाली.
"आई तुला आधी बाबांचा राग येत होता का?"
" हो मग राग येत होता. तस मी त्यांना बोलायची ही. तसे तुझे बाबा वागायला वाईट नव्हतेच. त्यांना घरात काय परिस्थिती होती ते माहिती नव्हतं." निशिगंधा म्हणाली.
" पण मग त्यांनी ते जाणून घ्यायचं प्रयत्न नाही केला का? " साक्षी तिच्याकडे बघत होती.
" अग ते किती बिझी होते. त्यात जबाबदार्या खूप. तुम्हा मुलांच शिक्षण, तुझ्या आत्याच कॉलेज सुरू होत, त्यानंतर तीच लग्न, सासुबाईंच आजारपण. खूप होत ग. थोड एडजेस्ट कराव लागतं. यात यांची धावपळ होत होती. "
" तू नेहमी बाबांना समजून घेतेस ना? "
" हो, तसच रहायला हवं आणि राग करून काय करू? इतक्या वर्षांनी माझ्या आयुष्यात सुख आलं आहे. मला ते एन्जॉय करायच आहे. आता ते माझ्याशी नीट वागता आहेत तर मला मागे फिरायचं नाही." निशिगंधा म्हणाली.
" बरोबर आहे आई तुझं. गेलेल्या क्षणाचे दुःख करत बसायचं की असे चांगले क्षण एन्जॉय करायचा हे आपल्या हातात आहे. हेच समजायला पाहिजे. "साक्षी म्हणाली.
" पूर्वीच झाल ते गेल. आता त्यांना माझ्यासोबत रिलॅक्स राहायचं आहे. मलाही छान वाटतं आहे. आता उगाच जुन्या गोष्टी उकरून बोलत बसायचं आणि ते पण दुःखी मी पण दुःखी या गोष्टीला काही अर्थ नाही." निशिगंधा म्हणाली.
"आई तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे."
निशिगंधा... आतून आवाज आला.
" या इकडे आम्ही बालकनीत आहोत. "
शरद येऊन बसला. साक्षी आई-वडिलांना बिलगून बसली होती. ती खूप खुश होती.
" आम्ही आता थोडे दिवस सोहम आणि पूनम कडे जाणार आहोत. नंतर घरी जावू." शरद पुढचा प्लॅन सांगता होता.
सोहम, पूनमकडे मजा आली. एक महिना ते मुलाकडे होते. निशिगंधाने रोज वेगवेगळे पदार्थ केले. मूल खुश होते.
रेखाताईंची मुलीकडे खात्री निघाली. घरच्या सारखी सगळीकडे ठेप ठेवली जात नव्हती. बरेच काम स्वतः करावे लागत होते. वरून एक दोनदा नेहा त्यांना खूप ओरडली ही होती.
शरद, निशिगंधा परत आले ते रेखाताईंना समजलं. " मला घरी जायचं आहे."
"आई आता इथे थांब. यापुढे सहा महिने माझ्याकडे, सहा महिने शरद दादाकडे अस रहात जा."
"नाही मला इकडे आवडत नाही. मी जाते." रेखाताई म्हणाल्या.
"शक्य नाही. तुला जाता येणार नाही."
"आईची चांगली वाटणी केली." त्या चिडल्या होत्या.
" वाटणी काय? दादा तुझा मुलगा आहे तशी मी तुझी मुलगी आहे. मी पण तुझी जबाबदारी घेणार. जरा शांत रहात जा आई. दादा बरोबर सांगतो आहे. तू आता हल्ली खूप त्रास देतेस." नेहा म्हणाली.
रेखाताईंचा नाईलाज झाला. त्या नेहाकडे होत्या. अधून मधून शरद, निशिगंधा त्यांना भेटून येत होते. त्या बर्या पैकी एक्टीव झालेल्या दिसत होत्या.
" आई आता घरीही असच काम करायच हं. नुसत बसुन रहायचं नाही. " शरद म्हणाला. रेखाताई चिडल्या होत्या.
निशिगंधा, शरद नेहमी प्रमाणे बागेत फिरायला आले. ते छान बोलत होते. ते खुश होते. "अहो आईंना घरी बोलवू या का? "
"तिला थोडे दिवस नेहाकडे राहू दे. सगळ्यांनी मिळून तिला सांभाळू. तू एकटी का करशील? खर तर ती माझी आणि नेहाची आई आहे. आम्ही जबाबदारी घ्यायला हवी."
" ठीक आहे. नाहीतर त्या सगळीकडे सांगत फिरतील." निशिगंधा म्हणाली.
" सांगू दे ना काय फरक पडतो." शरद म्हणाला.
निशिगंधा त्याच्याकडे बघत होती. तिने हळूच त्याचा हात हातात घेतला. ती खुश होती.
बायकांना काय हवं असतं. दोन प्रेमाचे शब्द. त्यांना जे दिल त्याच्या दुप्पट त्या परत करतात. एकमेकांबरोबर आधीच आयुष्य कसं गेला आहे ते सोडा. प्रत्येकाला जबाबदारी असते. नंतरचा वेळ तुम्ही कसा घालवता आहात ते महत्त्वाचं आहे. आयुष्य एकदाचं मिळत आनंदाने जगा.
समाप्त
वाचकांचे खूप आभार
वाचकांचे खूप आभार
#निशिगंधा
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
