Login

निशिगंधा भाग10

एकाच ह्या जन्मी जणू फिरून नवी जन्मेन मी
निशिगंधा भाग 10
तुला समजून घेतांना...

©️®️शिल्पा सुतार

निशिगंधा ट्रीपला गेली तेव्हा शरद, रेखाताईंच अजिबात पटलं नाही. आता पुढे...

निशिगंधा परत आली. शरद सोबत ती हसुन बोलत होती. तिकडे काय झालं सांगत होती. "अहो तुम्ही ही यायला हवं होतं. कधी अस ना मोकळ ही फार छान वाटतं. तुम्ही घरी असल्यामुळे मला जात आलं."

रेखाताई चिडचिड करत होत्या. निशिगंधाला आवाज आला. ती थोडी कांडावल्यासारखी झालं होती.

"काय झालं? आई का चिडल्या? बाईने नीट काम केलं नाही का?" ती शरदला विचारत होती.

"काहीही झालं नाही. आईला उगाच तक्रार करायची सवय झाली आहे. नीट वागायचं नाही काही नाही. व्हीआयपी ट्रीटमेंट हवी. यापुढे तिची ही अति सेवा बंद कर निशिगंधा. " शरद सगळं सांगत होता.

" आई ऐकत नाहीत काय करणार. माझ्या कडुन ही आता इतकं काम होत नाही. अस ना एक वेगळच टेंशन घरात असतं. " निशिगंधा म्हणाली.

" हो ते मला जाणवलं. अश्याने तब्येत खराब होईल. जेवढ्यास तेवढं रहात जा. " शरद म्हणाला.

निशिगंधा किचन मधे आवरत होती. रेखाताई आल्या. " निशिगंधा तू घरचे काम सोडून कश्याला फिरते? माझी सगळी गैरसोय झाली." त्या बडबड करत होत्या. तिला बोलत होत्या.

"आई बाहेर जावुन बस, तिला बोलू नकोस. गप्प रहा. तिने कुठे जायच नाही का? हे काय अस? " शरद म्हणाला.

निशिगंधाने किचन आवरलं. खिचडी केली, पापड भाजले.

"मला पोळी भाजी हवी." रेखाताई म्हणाल्या.

शरदने बाहेरून पोळी भाजी घेतली. त्यांनी तोंड वाकडं केल. " यांना काही करायला नको परत काही बोलायची चोरी. "

"ती दमून आली आहे. जे आहे ते खा आणि जरा शांत रहात जा आई. अश्या स्वभावाचा तुला ही त्रास होईल. आम्हाला तर होतोच आहे." शरद म्हणाला.

" तू अचानक एवढी बायकोची बाजू घेतोस? "

" हो उशिरा का होई ना मला समजल. पूर्वी मला या गोष्टी दिसत नव्हत्या. आता दिसता आहेत. "

" पुरे, शब्दाने शब्द वाढतो. " निशिगंधा म्हणाली.

दोघ सकाळी वॉकसाठी निघत होते.

"निशिगंधा आज माझी पूजा आहे. " रेखाताई म्हणाल्या.

" तू कर ना आई. त्यासाठी तुला असिस्टंट कशाला हवी. सगळ्यांना घेवून पूजा करणार का? सगळं समोर ठेवलं आहे. खरतर तूच तुझी तयारी करायला हवी. आम्हाला सांगत जावू नकोस. " शरद म्हणाला.

दोघ छान फिरायला गेले. बागेत त्यांचा ग्रुप भेटला.

" निशिगंधा आजकाल खूप खुश दिसतेस. " तिची मैत्रीण विचारत होती.

" हो... कोणी आपली काळजी घेतली की छान वाटत ना. वाटत कोणीतरी आपल आहे. मग घरी किती का त्रास असेना किती हि जबाबदारी असेना काही वाटत नाही." ती शरदकडे बघत म्हणाली.

" हो खर आहे. मला तुझ हे आवडलं. जून उकरत बसण्यापेक्षा ही नवीन सुरुवात छान झाली."

" आम्हाला ही एकमेकांशिवाय कोण आहे?"

" हो ना. "

दोघ घरी येत होते.

" अहो हे जे सुरू आहे ते खर आहे ना? म्हणजे तुम्ही माझ्या बाजूने आहात?" निशिगंधा विचारत होती.

" पूर्वी ही मी तुझ्या बाजूने होतो. थोडा बिझी होतो इतकच. पण जे सुरू होतं ते मी बघत होतो. कधी कधी कठोर वागलो असेल. तुला ही बोललो असेल पण मी ही मनुष्य आहे. " शरद म्हणाला.

"हो. माझ्या मनात काही नाही. जून सोडलेलं बर. " निशिगंधा म्हणाली.

"चल आज छान नाश्ता करू." शरद हॉटेल कडे बघत म्हणाला.

" आई?"

" तिच्यासाठी पार्सल घेवू. तिला काय आवडत?"

" मसाले डोसा. "

" आणि तुला? "

" मला... "

" तू थांब मी सांगतो. तुला इडली, वडा आवडतो. " शरद म्हणाला.

" हो बरोबर. " निशिगंधा खुश होती.

तिला वाटलं नव्हतं त्याला माहिती असेल. हे खूप हुशार आहेत. सगळीकडे लक्ष असतं.

ते भाजी घेवून घरी आले. निशिगंधा आवरून स्वयंपाकाला लागली. साक्षीचा फोन आला होता. दोघ तिच्याशी बोलले. तिला नवीन जॉब ऑफर आली होती. ती शरदशी त्या बद्दल बोलत होती.

"आपल्याला नाटकाला जायच आहे आटोप." शरदने सांगितलं.

निशिगंधाने स्वयंपाक करून ठेवला. ती तयार होत होती.

" आता कुठे निघताय? नेहा येते आहे. " रेखाताई म्हणाल्या.

" तिला नाही सांग. नाहीतर येवू दे. तू आहेस ना." शरद म्हणाला.

" तीच करेल कोण? "

" काय करायच आहे? ती सारखी येते. पाहुणचाराची गरज नाही. स्वयंपाक तयार आहे. तुम्ही दोघी जेवून घ्या." शरद म्हणाला.

" ती तिच्या हाताने घेईल का?" रेखाताई रागात होत्या.

"हो मग काय झालं. तिला येत नाही का? तिच्या घरी कोण करत? आई तू अति करतेस." शरद म्हणाला.

" अहो आता मूड खराब करू नका. एकदा सांगितल ना. चला बर. " निशिगंधा, शरद निघाले. दोघांनी सोबतचा वेळ एन्जॉय केला. येतांना ते जेवायला गेले.

" अहो आई राहिल्या आहेत. आपण जेवण करतोय त्यापेक्षा घरी गेलो असतो. "

" तू काळजी करू नकोस नेहा आली असेल. "

" त्या आपल्या सोबत आल्या असत्या. "

" नको, तिला नीट रहायचं नाही. ती सासू आहे. जोर करायचा आहे करू दे. तिला मुंगी होवून साखर खायची नाही. हत्ती होवून लाकड तोडायची आहेत."

शरद जे म्हणाला ते किती खर आहे. निशिगंधा विचार करत होती. खरच आपल्याला सोडून देता येत नाही. आई चांगलं ही वागू शकतात पण नाही त्या मला पाण्यात बघतात. पण यामुळे त्यांना त्रास होतो. कोणालाच त्या आवडत नाहीत. जावू दे हे कर्म असतं. तिने विचार झटकले. शरद सोबत ती एन्जॉय करत होती.
#निशिगंधा
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →