Login

निशिगंधा भाग 7

एकाच ह्या जन्मी जणू फिरून नवी जन्मेन मी
निशिगंधा भाग 7
तुला समजून घेतांना...

©️®️शिल्पा सुतार

पाहुणे गेले. मुलं एक दिवस होते. सगळे आरामात आवरत होते. रोजची धावपळ नव्हती. आता शरदला सकाळी जायच नव्हतं. त्यामुळे निशिगंधा ही आरामात होती.

रेखाताई सकाळी सहा वाजेपासून उठल्या होत्या. त्या हॉलमधे बसुन होत्या. शरद त्यांच्या जवळ बसला.

"चहा नाही, पाणी नाही." त्यांची बडबड सुरू होती.

शरदने सगळ्यांचा चहा केला.

"आता तू घरी आहेस म्हणजे सगळे काम तुलाच देणार ती निशिगंधा." रेखाताई म्हणाल्या.

" नुसता चहा केला तर काय झालं आई. उगीच काहीही बोलू नकोस."

ते पिकनिकचं ठरवत होते.

"मी खूप थकली आहे. तुम्ही जावून या." निशिगंधा म्हणाली. आईंच कोण आवरेल हे ही तिला वाटत होतं. उगीच त्या चिडचिड करतात.

"चल ग आई बर वाटेल. आम्ही आजच्या दिवस तर आहोत." साक्षी आग्रह करत होती.

"हो निशिगंधा चल. नाहीतरी आपण दोघं असे कुठे जात नाही. आटपा लगेच अर्धा तासात निघू. " शरद म्हणाला.

" सासुबाई? त्यांच काय करू या?" निशिगंधा विचारत होती.

"तिला नेहाकडे सोडून देवू. "

"चालेल. "

रेखाताई ऐकत होत्या ." मी कुठे जाणार नाही. माझ्या मुलीला का त्रास? "

" त्यात काय त्रास? एक दिवस जा ना आई." शरद म्हणाला.

" नाही. तुझ्या आत्याला पिकनिक साठी बोलव ." रेखाताई म्हणाल्या.

"नाही आजी. आम्ही आमचे जाणार आहोत. तू येत नाही ना तुझ्यासाठी जेवण टेबल वर आहे." सोहम म्हणाला. उगीच नेहा आत्या आली की मोकळ बोलता येत नाही. परत आई कामात रहाते.

ते निघाले. निशिगंधा ही गेली. रेखाताई खूप चिडल्या होत्या. कोणी लक्ष दिलं नाही.

खूप मजा आली. साक्षी, पूनम सोबत निशिगंधा रमली होती. निसर्गाच्या सान्निध्यात अस ही तिला खूप आवडत होतं. ती शरद सोबत खुश होती. दोघांनी खूप गप्पा मारल्या. वेगवेगळ्या फुलांबद्दल निशिगंधा त्याला सांगत होती.

" तुला बरीच माहिती आहे निशिगंधा."

ती छान हसत होती.

" निघतांना तुझ्यासाठी इथून रोपं घेवू तुझ्या बागेसाठी." शरद म्हणाला.

"हो मी निवडून ठेवते."

" मी पण तुला मदत करणार हं." शरद म्हणाला.

" अहो थँक्यू." दोघ छान सोबत होते. सोहमने त्यांचे खूप फोटो घेतले. अगदी कॅंडीड मुमेंट होते. ते फोटो बघत होते.

रेखाताईंनी दोन तीनदा फोन केला. निशिगंधा गडबडून गेली होती. " आपण निघू या का? "

"आई काय झालं?" साक्षी विचारत होती.

"अग सासुबाईंचा फोन आला की मला घाबरायला होतं."

पूनम, साक्षी तिच्याशी बोलत होत्या.

" आजी काही तुझी बॉस नाही आई. रीलॅक्स. घरी एवढ ही कडक वातावरण काही गरजेच नाही. आता सगळं सोडून दे. आजकाल तुझी तब्येत ठीक नसते. छोटे मोठे टेंशन घ्यायचं नाही." साक्षी म्हणाली.

"अस म्हणायला सोप असत गं. त्यांच्या सोबत राहील की समजतं. आता बघ सात आठ दिवस कसा त्रास देतील. भांडणा पेक्षा त्यांना काही न बोललेलं बर. " निशिगंधा म्हणाली.

" आजीचा स्वभाव विचित्र आहे. आम्ही नेहमी सांगतो. तू विचार करू नकोस. आपण घाबरलं की त्या जास्त करतात. किती वर्ष तेच करणार? जरा खमकी हो आई. तू खूपच साधी आहेस. " साक्षी म्हणाली.

" आता बाबा बरोबर करतील बघा. " पूनम म्हणाली.

" आमच्या पिठीचा तोच प्रोब्लेम आहे. नेहमी दबून रहायचं. आम्हाला अस कोणाला बोलता आलं नाही. त्यामुळे बहुतेक स्त्रियांना सासुरवास आहे. " निशिगंधा म्हणाली.

शरद तिला आवाज देत होता." निशिगंधा इकडे ये. " दोघ छान सोबत होते. ती बाकीच विसरली.

ते रात्री घरी आले. नेहमी प्रमाणे तणावपूर्ण वातावरण होतं. सोहमने आजीला जेवायला दिलं. बाकीचे आराम करत होते. तो बोलतो म्हणून रेखाताई ही गप्प होत्या.

दुसर्‍या दिवशी दोघ मुल निघाले. निशिगंधा हळवी झाली होती. शरद आणि ती बस स्टॉप वर सोडायला गेले होते. येतांना ती रडत होती.

" निशिगंधा काय अस? सांभाळ स्वतःला. असा त्रास करून कस होईल. मूल येतात अधून मधून." शरद तिला समजावत होता.

आता घरी शरद, निशिगंधा आणि रेखाताई तिघेच होते.

पुढे काय होईल? रेखाताई नेहमी प्रमाणे त्रास देतील का? की शरद सपोर्ट करेल? की निशिगंधा ठाम पणे सगळ्याला सामोरी जाईल?
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →