निशिगंधा भाग 6
तुला समजून घेतांना...
तुला समजून घेतांना...
©️®️शिल्पा सुतार
निशिगंधा, साक्षी, पूनम किचन मधे चहा करत होत्या.
रेखाताई चहाची वाट बघत होत्या. त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या पाहुणचारात कोणतीच कमी रहायला नको होती. यासाठी त्या आग्रही होत्या. नेहमी प्रमाणे सुनेला, नातीला खूप बोलत होत्या. अजिबात एडजेस्ट करत नव्हत्या. घरात पाहुणे आहेत हे ही त्यांना समजत नव्हतं.
निशिगंधा... शरद आवाज देत होता.
" आई, बाबा बोलवता आहेत."
निशिगंधा आत गेली. शरद फॉर्मल ड्रेस मधे तयार होता. तो निशिगंधा कडे बघत राहिला. "खूपच छान साडी आहे."
"हो का आणि मी? " तिने हसत विचारलं.
" तुझा काही प्रश्न आहे का? नेहमी प्रमाणे सुंदर दिसते आहे. घरात पाहुणे आहेत म्हणून अस कोरड सांगतो आहे. " शरद म्हणाला.
" तुमच काहीतरी असतं. आता रीटायर होणार आहात. जरा म्हणून बोलतांना काही वाटत नाही. " निशिगंधा उगीच चिडली. ती त्याच्या कपड्यांच्या घड्या घालत होती. शरद छान हसत होता.
"अहो तुम्ही कुर्ता घालणार होता ना?"
" आत्ता नाही. संध्याकाळी घालेन. माझं घड्याळ कुठे आहे?"
तिने दिलं.
" निशिगंधा आज माझ्या सोबत रहाशील? "
"हो अहो. तुम्ही ठीक आहात ना?" तिने विचारलं.
"हो एकदम ओके. "
दोघ बाहेर आले.
"निशिगंधा अग चहा कुठे आहे?" रेखाताईंचा जोरात आवाज आला. निशिगंधा दचकली. शरद ही बघत होता काय सुरू आहे?
पूनम घाईने पुढे आली. " आत्याला चहा दिला आहे आजी."
" आजी, तू किती मोठ्याने आईवर ओरडतेस. मला हे आवडलं नाही. एवढ वाटत तर तू स्वतः उठून बघायचा ना आत्याने चहा घेतला की नाही. " सोहम चिडला.
सगळ्यांना कसतरी वाटलं.
"जावू दे सोहम." पूनम म्हणाली.
" जावू दे काय? जावू दे? इतके वर्ष झाले घरात तेच सुरू आहे. आजीला कोणी काहीच बोलत नाही म्हणून ही अति करते. नेहमी दुसर्यावर तोंडसुख घेते. हिला वेळेवर उलट बोलायला हव होतं. " सोहम चिडला होता.
" हो बरोबर आहे आजी. यापुढे अस चालणार नाही. जरा सावकाश बोलत जा. नाहीतर आम्ही ही तुझ्यावर ओरडत जावू. जश्यास तसे. " साक्षी म्हणाली.
" चला उशीर होतो आहे." निशिगंधा म्हणाली. रेखाताईं बद्दल बोलून उपयोग नाही. मूल माझी बाजू घेतात हे एक बर आहे पण.
ते सगळे ऑफिस मधे आले. शरद सगळ्यांना ऑफिस दाखवत होता. तो बसायचा ती जागा बघितली. सेंड ऑफ झाला. निशिगंधा ही हळवी झाली होती.
शरदने एका हाती घर चालवलं होतं. मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर सारख्या महत्वाच्या पदावर काम केलं होतं. अनेक महत्वाचे प्रोजेक्ट हॅन्डल केले होते. तो आज रिटायर होत होता. एवढ्या वर्षाची नोकरी. तो ही हळवा झाला होता. पूर्ण वेळ निशिगंधा, शरद सोबत होते.
कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्यांनी भाषण केले. शरदने सगळ्यांचे आभार मानले. निशिगंधाला खूपच महत्त्व दिलं. तिने कुटुंबासाठी काय केलं ते सगळ्यांसमोर सांगितलं.
तिला खूप छान वाटत होतं. तिला वाटल नव्हतं यांच्या मनात माझ्या बद्दल इतक प्रेम आणि सुंदर भावना आहेत. तिचे डोळे भरून आले होते. तिने त्यांना डोळ्याने थँक्यु म्हटलं.
सगळे घरी आले. जेवण झाल्यावर दुपारी शरद, निशिगंधा रूम मधे होते. इतक्या वर्षात काय झालं याची उजळणी करत होते. मूल त्यांच्यात येवून बसले.
"निशिगंधा तू खरच मुलांना सांभाळून दाखवलं. मुलांनी ही सिरीयसली नीट केलं. दोघ मूल सक्सेस फुल आहेत." शरद म्हणाला.
"अहो आपण दोघांनी केलं."
"नाही माझा काही रोल नव्हता. मी तुझ्यावर सोपवून ऑफिस मधे बिझी होतो. एक बोलू माझ्या खूप चुका झाल्या. प्रसंगी तुला बोललो." शरद म्हणाला.
" चुका तर माझ्याकडून ही झाल्या. मी पण काही कमी नाहिये. मी पण तुम्हाला उत्तर देत होते. " निशिगंधा म्हणाली.
" एक प्रॉमीस करशील आता जून उगाळायचं नाही. आयुष्याची संध्याकाळ सोबत छान घालवायची. " शरद म्हणाला.
" चालेल. मला ही टोमणे टिप्पणी आवडत नाही. " निशिगंधा म्हणाली.
दोघ हातात हात घेवून बसले होते. निशिगंधा समाधानी होती. मूल ही खुश होते.
जरा वेळाने शरद बाहेर येवून रेखाताईं जवळ बसला. तो बहिणीशी बोलत होता.
संध्याकाळी छान पार्टी झाली. शरदला ऑफिस मधे नातेवाईकांमधे किती मान आहे ते दिसत होत. तो निशिगंधा सोबत फिरत होता.
"मग आता काय प्लॅन आहे शरद?" मित्र विचारत होते.
"काही नाही. आता मी, निशिगंधा आरामात रहाणार आहोत आणि आयुष्यात जे करायचं राहीलं आहे ते करणार. तिला वेळ देणार. भरपूर फिरणार, वाचन करणार."
निशिगंधा खुश होती. असा सकारात्मक बदल यांच्यात होणार असेल तर किती छान होईल. नाहीतर तिला टेंशन आलं होतं. पूर्वी सुट्टीच्या दिवशी उगीच वाद होत होते. हे दिवसभर घरी असतिल काय करणार? तिला आधी टेंशन आलं होतं. एक तर सासुबाईंच किती कराव लागतं. त्या समजून घेत नाही. त्यात शरद ही घरी. पण आता ती रीलॅक्स होती.
शरदला अजून रेखाताईंचा दिनक्रम माहिती नव्हता. दुसर्या दिवशी पासून काय होतं ते बघू पुढच्या भागात.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
