Login

निशिगंधा भाग 4

एकाच ह्या जन्मी जणू फिरून नवी जन्मेन मी
निशिगंधा भाग 4
तुला समजून घेतांना...

©️®️शिल्पा सुतार

बाहेरून जेवण मागवलं होतं. रेखाताईंनी सांगितल्या प्रमाणे त्यांच्यासाठी खिचडी केली होती. आता पुढे

सचिन, सोहम गप्पा मारत होते. पूनम, साक्षी ही त्यांच्यात बसलेल्या होत्या. उद्याच्या प्रोग्रामच्या तयारी बद्दल ते बोलत होते. " आपण खूप एन्जॉय करायच आई बाबांना जपायचं."

निशिगंधाने रेखाताईंना वाढून दिलं. त्या मुद्दाम शरद कडे बघत होत्या. त्याने त्यांच्या ताटात खिचडी बघितली.

शरद आत आला. "निशिगंधा हे काय सुरू आहे? एवढे पदार्थ ऑर्डर केले असतांना आई खिचडी का खाते आहे?"

ती त्याच्याकडे बघत राहिली. यात ही माझा दोष आहे की काय? बापरे या सासुबाई अजूनही अस का करतात?

" एक काम करा तुम्ही आईंना जावून विचारा ना की सूनबाईने तुला खिचडी का दिली? एवढे पदार्थ का खावू देत नाही. नेहमी प्रमाणे त्यांनी माझी फजिती केली आहे. तुम्हाला ही समजत नाही. मला काही हौस नाही. बाहेरून जेवण आलं तरी खिचडी करत बसायला. आई मुद्दामून करतातच, तुम्ही ही काही कमी नाही. एकाच माळेचे मणी. मला अस विचारायला आलेच कसे? " निशिगंधा फाडफाड बोलली.

तिला राग आला होता. ती साक्षी जवळ जावून बसली. इतके वर्ष झाले तरी बायकोवर अजिबात विश्वास नाही. आई नाटकं करून करून अजून दमल्या नाहीत. अस वाटत ना एकतर त्यांना कुठे सोडून यावं, नाहीतर मी तरी इथून जाते. आता सहन होत नाही. पूर्ण आयुष असच गेलं. नेहमीच मी चुकली नाही हे सांगत बसा.

"आई जेवण झाल का? " शरद रेखाताईं जवळ जावून बसला.

" हो सुरू आहे. हे काय खिचडी खाते आहे. मला पाणी दे. " रेखाताई म्हणाल्या.

"सगळे आल्यावर तू अस का करतेस आई? एवढे पदार्थ कोणासाठी मागवले आहेत?"

" मला बाहेरचे पदार्थ आवडत नाही. निशिगंधा आळस करते. तिला कोणतचं काम नको असतं. मूल आले, जावई आले, जरा घरी काहीतरी गोड धोड करायचं ना. नाही, पण सांगेल कोण. सगळं बाहेरून मागवते. आमची तर सत्ता संपली आहे." रेखाताईंची परत बडबड सुरू झाली.

"मुलांनी पार्टीच ठरवलं ना. सारखं नाही कस म्हणणार. तुला खिचडी हवी होती तर माझ्या कडे अस का बघत होतीस जस तुला खूप त्रास होतो आहे. " शरद म्हणाला.

" बाकी काही नाही तर खिचडी बरी. मी कुठे तुला काही सांगितलं. आता मी शांत झाली आहे. काहीही करा आता काय फक्त बघत बसायचं. उद्या नेहा येईल तेव्हा ही असच घे. " रेखाताई म्हणाल्या.

" हो सगळं होईल. पण तू सारखं निशिगंधा वर तोंडसुख घेवू नकोस. तुझ्या मुळे आमच्यात गैरसमज होतात." शरद चिडला.

" याला ही स्वतः च्या बाजूने करून घेतलं. माझा मुलगा काही माझं ऐकत नाही. " रेखाताई बडबड करत जेवत होत्या.

शरद निशिगंधा जवळ येवून बसला. तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याला ही समजलं तिला राग आला आहे.

निशिगंधा...

" झाली उलट तपासणी करून? तुम्ही पण ना. अजिबात ऐकत नाहीत. आता रिटायर होणार ना. यापुढे तुमच्या आईंकडे तुम्हीच बघत जा. मी इतके वर्ष केलं. मला जमत नाही. त्या खुश नाहीत. आता तुमच्या शहाण्या हातांनी होवून जावू द्या. तुम्हाला मी तुमच्या आईची सेवा करायची संधी देते. मला त्या जबाबदारीतून मुक्त करा. एकतर तुमचा माझ्यावर विश्वास नाही. तुम्ही रोज त्या म्हणतात ते ऐकत जा. पंचपक्वान्न केले तरी माझी हरकत नाही. " निशिगंधा हळू आवाजात म्हणाली.

" तस नाही ग निशिगंधा. मला फक्त वाटलं... " शरद म्हणाला.

" नेहमीच आहे... आईला काही झालं की डायरेक्ट येवून निशिगंधाला जाब विचारायचा. का तर ती सोपी सापडते. खर खोट बघायचं नाही. सगळयाला मीच जबाबदार. हो ना. " ती कंटाळली होती.

" अस नाही निशिगंधा..."

" चांगल झालं ना तुम्ही आईंशी बोललात, विचारून खात्री केली. अजून काही बोलायचं बाकी आहे का? " ती दुखावली गेली होती.

सासुबाईंच करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आठ पंधरा दिवसात नाही यांचे भांडण झाले तर निशिगंधा नाव लावणार नाही. सासुबाई किती गुणी आहे हे माझ्यापेक्षा कोणाला माहिती आहे. यांना दिवसा तारे दिसतील.

ते सगळे जेवायला बसले.

" बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. आता तुमच पुढचं रीटायरमेंट नंतरच आयुष्य असंच सुंदर, सुखी जायला हवं. आईला जपा, खूप छान रहा." सोहम म्हणाला.

" हो आणि आमच्याकडे रहायला या आता. " पूनम म्हणाली.

" आमच्याकडे ही." साक्षी, सचिन म्हणाले.

आमच्या जबाबदार्‍या अजून संपत नाही. कुठे जायच म्हटलं की सासुबाईंना कुठे ठेवणार? निशिगंधा विचार करत होती.

शरद इमोशनल झाला होता. त्याने साक्षी, सोहमला जवळ घेतलं. निशिगंधा लांबून बघत होती. सगळं कुटुंब एकत्र किती छान वाटतं आहे. सगळे छान गप्पा मारत होते.

"निशिगंधा माझ्या गोळ्यांचा डबा आण. सगळे आले म्हणजे माझ्याकडे बघायचं नाही अस ठरवलं वाटतं. " रेखाताईंचा आवाज आला. सगळ्यां समोर खूपच कसतरी वाटलं. निशिगंधाचा चेहरा उतरला.

"आजी मी आणते." साक्षी पटकन आत गेली.

नेहमीच होतं. सगळे जमले की रेखाताई मुद्दाम निशिगंधाला काही काम देत होत्या. कुजक बोलत होत्या. ते बाकीच्यांना लक्ष्यात आलं. साक्षीला ही ते आवडलं नाही.

"बाबा हे काय सुरू आहे घरात? आजी आईशी कशी वागते आहे." ती म्हणाली.

शरदने ही इतके दिवस लक्ष दिलं नव्हतं. पण आता अति झालं. त्याला ही हे लक्ष्यात येत होतं. त्यात आज तो ही निशिगंधाला बोलला होता.

" बाबा मला आई बद्दल तुमच्याशी थोड बोलायच होतं. आईच ही आता वय झालं. ती वेगळया टप्प्यात आहे. तीच मन आपण सांभाळलं पाहिजे. आजी का अशी करते? तिला त्रास देते. मला खूप वाईट वाटतं. सगळं असूनही आईला अजूनही आरामात रहायला मिळत नाही. सुख नाही. घरच्या लोकांचा खूप त्रास आहे. आजीला पूर्वीच समजून सांगायची गरज होती. तेव्हा तुम्ही आईची बाजू का घेतली नाही? अस असेल तर मी आईला माझ्या सोबत घेवून जाईल. आता तिला त्रास होवु देणार नाही. " साक्षी म्हणाली.

" नाही, मी निशिगंधा शिवाय राहू शकत नाही. मी तुझ्या आजीशी बोलतो. यापुढे तुझ्या आजीच मी सगळं करत जाईल. " शरद म्हणाला.

" एकतर आईने नेहमी आपलं खूप केलं. तिच्या वाटेला आयुष्यभर अशी तडतड आली. तिला तुमच्या आधाराची खूप गरज आहे. थोड तरी समजून घ्या. आजीने मुद्दाम खिचडी करायला सांगितली तुम्ही आईला बोललात. आधी विचारायचं तरी. " साक्षी चिडली होती.

" हो. " शरद विचार करत होता. माझी चुक झाली. आता मी निशिगंधाला जपणार आहे.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →