निशिगंधा भाग 2
तुला समजून घेतांना...
तुला समजून घेतांना...
©️®️शिल्पा सुतार
निशिगंधा, प्रीती बोलत होत्या. "चल घरी येतेस का? चहा घेवू."
" नको, तुझ्या सासुबाई असतिल." प्रीती म्हणाली. दोघी हसत होत्या. निशिगंधा घरी आली...
हॉलमधे जोरात टीव्ही सुरू होता. रेखाताई नेहमी प्रमाणे टीव्ही बघत होत्या. त्या प्रवचन ऐकत होत्या. भजनाच्या तालात डोलत होत्या.
निशिगंधा किचन मधे होती. ती ऐकत होती. तिने त्यांना नाश्ता दिला.
जे टीव्ही वर सांगत आहेत ते किती खर आहे. या वयात भौतिक गोष्टींचा त्याग करून मन अध्यात्मात रमवलं पाहिजे. आपल वर्तन नीट हवं. कोणाला त्रास होईल अस वागु नये.
सासुबाई नुसतं ऐकतातं. आचरणात काही आणत नाही. त्यांच म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. तिला थोड हसू आलं.
खरच हसण्यासारखी परिस्थिती आहे. वरवर या गोष्टी सोप्या वाटतात. सगळ्यांना वाटत मी किती सुखी आहे. बंगाल, गाडी, बँक बॅलन्स, नवरा वरच्या पोस्टवर. घरात कसलीच कमी नाही. पण सासुबाई त्रास ही तेवढाच देतात. त्या सोडून बाकीचे घरचे लोक चांगले आहेत.
घरात अजूनही रेखाताई हक्क जमवून होत्या. सासरे पाच वर्षापुर्वी वारले. तेव्हा पासून शरद त्यांची खूपच काळजी घेत होता. त्यांनी याचा गैरफायदा घेतला होता.
संसार म्हणालं तर थोडी बोलचाल चालतेच. शरद मला बोलतात मी पण त्यांना थोडी सोडते. शेवटी आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. म्हणून मी इथे टिकून आहे. थोड समजून घेतलं की होतं.
निशिगंधा आता बाहेरचं आवरत होती. ती छान गुणगुणत झाडांना पाणी देत होती. तो वेळ तिचा स्वतः चा होता. गुलाब, मोगरा, चांदणी छान फुलली होती. अगदी कोथिंबीर, मेथी, मिरच्या, टोमॅटो ही तिने लावले होते. बागेची साफसफाई झाली. ती तिथे थोडा वेळ बसली होती. तिथे तिला जगाचा विसर पडत होता.
पन्नाशीतील निशिगंधा अजूनही खूप सुंदर दिसत होती. कॉटनचा ड्रेस तिला शोभत होता. लांब वेणीचा शेपटा तिच्या नाजूक चेहर्यावर शोभत होता. वागायला ती तशी साधी छान होती. कधी मोठ्या आवाजात बोलणं नाही की चिडचिड नाही. समजूतदारपणा, हुशारी अंगजात होती.
आज मूल येतील. बर्याच दिवसांनी घरात छान वाटेल. चला स्वयंपाक करून घेवू.
"निशिगंधा आवरलं की नाही? आज बागेत थांबणार का? माझी जेवणाची वेळ झाली., हीच कधीच वेळेवर आवरत नाही. जे आहे ते छान आहे धरून चालायचं." रेखाताईंचा आवाज आला.
माझ्या तर पोटात जागा नाही. यांना नाश्ता करूनही बारा साडेबाराला कशी काय लगेच भूक लागते? मला कधीच आरामात राहू देत नाही. ती उठली घरात आली. कामाला लागली.
मी काही लहान आहे का? मला सून आली तरी घरी अजून तेच सुरू आहे. सासुरवास कमी होत नाही. माझ्या वाटेला शांती, प्रेम आलं नाही.
शब्दाने शब्द वाढतो म्हणून निशिगंधा नेहमीच दुर्लक्ष करत होती. तेच बर आहे हे इतक्या वर्षाच्या अनुभवावरून ती शिकली होती. यांच्याशी भांडून उपयोग नाही. या गोष्टीचा रेखाताईंनी चुकीचा अर्थ घेतला होता. निशिगंधा नेहमीच चुकते म्हणून ती काही बोलत नाही. ऐकून घेते. असं त्यांना वाटत होतं.
तिने त्यांना जेवायला दिलं.
"आई आता घरी पाहुणे येणार आहेत. जरा शांत राहत जा. किती ते कुजकट बोलणे. तुम्ही आम्हाला निवांत बसू देत नाही. रोज प्रमाणे आवरून व्हायला हवं हा हट्ट सोडा. नाहीतर तुम्ही करून घेत जा." निशिगंधा शेवटी म्हणाली.
"म्हणजे? मी काही म्हणते का? आजकाल तू खूप बोलायला लागली आहेस निशिगंधा. नुसत जेवायला दे म्हंटल तर काय झालं?" त्यांची बडबड सुरू होती.
" हेच तर तुम्हाला समजत नाही ना. सुनेशी बोलतांना अजूनही तुमचा आवाज वाढतो. "
दोघींचे दोन दोन शब्द झाले. निशिगंधा आत जावून बसली. रेखाताई एकट्या जेवत होत्या.
निशिगंधाने स्वतः ला थोड शांत केलं. पाणी पिलं. तिने साक्षीला फोन लावला." कुठे पर्यंत आलीस बेटा? "
" आई दहा मिनिटात येते. " निशिगंधा आता खुश होती. चला माझी लेक येईल. ती असे पर्यंत मी खूप एन्जॉय करणार आहे.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
