निशिगंधा भाग 1
तुला समजून घेतांना...
तुला समजून घेतांना...
©️®️शिल्पा सुतार
शहरातील पॉश एरियातली सकाळची वेळ होती. परांजपेच्या घरी नेहमी प्रमाणे आवरायची गडबड सुरू होती. पेपर, दूध वेळेवर आलं होत. निशिगंधा सवयीने भराभर आवरत होती. शरद तयार होता.
रेखाताई पुढे बसुन सगळं बघत होत्या. सूनबाई माझ्या मुलाला वेळेवर चहा पाणी देते की नाही याकडे त्यांच व्यवस्थित लक्ष होतं. सध्या ते तिघेच एवढ्या मोठ्या बंगल्यात रहायला होते. साक्षी, सोहम त्याचे मूलं लग्न होवुन बाहेरगावी रहात होते.
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी, ना आर्तता
फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी, ना आर्तता
एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी... रेडिओ वर सुंदर गाणं सुरु होत.
निशिगंधा ही गाणं गुणगुणतं होती. तिने शरदचा डबा भरला. किती सुंदर अर्थ आहे या गाण्याचा. माझं आवडत गाणं आहे. प्रत्येक स्त्री यातून जाते. तरी दुसरीला समजून घेत नाही. अस का असेल? यावर तिला कधीच उत्तर सापडलं नाही. तरी नेहमी प्रमाणे ती विचार करत होती. तिचे हात भराभर चालत होते तिने ओटा आवरला. दूध फ्रीज मधे ठेवलं.
" माझा डबा?" शरदने आवाज दिला. तिने पटकन रेडिओचा आवाज कमी केला.
शरद जवळ येवून उभा राहिला. "झाल का?"
" हो." ती छान हसली. तिने डबा दिला.
शरद आईजवळ जावून बसला.
"संध्याकाळी येतांना काही आणायचं का निशिगंधा?" शरदने लॅपटॉपची बॅग हातात घेत विचारलं.
मुलगा सुनेला विचारतो आहे. हे इतक्या वर्षांनी ही रेखाताईंना सहन झालं नाही. "हो माझे औषध आणं." रेखाताई घाईने म्हणाल्या. त्यांना प्रत्येक गोष्टीत निशिगंधा सोबत बरोबरी करायची होती. शरद बायकोशी बोलत होता ते त्यांना आवडलं नाही.
"आई तुझे औषध सांगितले आहेत. तुझ्याकडे अजून भरपूर औषध बाकी आहेत. ते घे आधी. तो काही खाऊ नाही." शरद म्हणाला.
" बर मग फळ आणं."
" ठीक आहे."
निशिगंधा... शरदने परत आवाज दिला. मला उशीर होतो आहे.
"हो आली. " तिने छान कॉटनचा चुडीदार घातला होता. केसांची सैल वेणी होती. तो पिवळा रंग तिला छान दिसत होता. प्रसन्न अशी निशिगंधा शूज घालत होती. ती त्याच्या सोबत बाहेर निघाली. ती रोज वॉक साठी जात होती. तेवढाच वेळ तिला स्वतः साठी मिळत होता.
रेखाताई बडबड करत होत्या. त्यांनी उठून दार लावला. सकाळी छान आंघोळ करून घरची काम करावी तर काय तर म्हणे वॉकला जाताय. बर आहे. कोणी काही म्हणत नाही. मैत्रिणीं सोबत खिदळायला मिळतं. बर यांचे विषय तर काय? तुझ्या सासूने हे केलं माझ्या सासूने हे केलं.
निशिगंधा बागे जवळ कार मधून उतरली. "अहो, गुड डे नीट जा. संध्याकाळी आईंसाठी फळ आणालं तेव्हा दही ही आणा."
तिला माहिती होतं. आता तो नाही म्हणणार नाही. कारण आईंनी फळ सांगितले होते. तेच निशिगंधाने सांगितले असते तर त्याने स्पष्ट नकार दिला असता. तुला हव ते तू घेवून घेत जा. मला सांगू नकोस. बायको हक्काची असते. तिच्याशी कस ही वागा.
निशिगंधाने फोन लावला. प्रीतीने उचलला.
" आले... गेट जवळ आहे."
दोघी बागेत आल्या. दोघींची मूल बरोबर मोठे झाले होते. त्यांची जुनी मैत्री होती. शाळेच्या बस स्टॉप वर ओळख झाली होती. दोघींचा वॉक झाला.
" मग काय निशिगंधा प्रोग्रामची तयारी कुठे पर्यंत आली. मूल येणार आहेत ना?"
" हो. दोघ येणार आहेत. मला खूप छान वाटत आहे. खूप दिवसांनी घर भरेल. " निशिगंधा खुश होती.
" हो ग मुलां शिवाय काही मजा नाही. नणंद बाई येणार ना?"
" हो नेहा पण येईलच की. तिच्या शिवाय कस होईल. सासुबाई ऐकतील का? साक्षी आल्यावर बहुतेक आम्ही खरेदीला जावू."
" छान साडी घे. "
थोड बोलून ती घरी आली. शरद रीटायर होणार होता. त्यामुळे घरी कार्यक्रम होता. दोघं मुल येणार होते. साक्षी आधी येणार होती. तिचे मिस्टर सचिन नंतर येणार होते. सोहम त्याची बायको पूनम आज येणार होते.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
