Login

निशिगंधा भाग 3

एकाच ह्या जन्मी जणू फिरून नवी जन्मेन मी
निशिगंधा भाग 3
तुला समजून घेतांना...

©️®️शिल्पा सुतार

रेखाताईंशी झालेला वाद निशिगंधाला डिस्टर्ब करून गेला. ती साक्षीची वाट बघत होती. आता पुढे...

सध्या निशिगंधा वयाच्या वेगळया टप्प्यावर होती. कोणी काही बोललं की सहन होत नव्हतं. लगेच रडायला येणं, वाईट वाटणं नेहमीच होतं. सासुबाई यातून गेलेल्या आहेत ना. तरी त्या समजून घेत नव्हत्या. अगदी मनाला लागेल अश्या बोलत होत्या. त्यांचाच त्रास जास्त होता. नाहीतर घरातले बाकीचे चांगले होते.

आज झालेला वाद अगदीच गरजेचा होता का? मी थोडा वेळ स्वतःला दिला तर काय हरकत आहे? लगेच आत बोलवून घेतल. मला ही माझे कर्तव्य समजतात. जेवायला पाच दहा मिनिटं इकडे तिकडे झालं तरी चालत नाही. तरी बर सकाळ पासून खाणं सुरू असतं. त्या मला नेहमी कंट्रोल करायला बघता. जावू दे. आता साक्षी येईल. तिने मूड बदलला.

या सगळ्यात तिला शरदच्या साथीची खूप गरज होती. मानसिक रित्या जास्त. सध्या शरदच्या वागणुकीत बदल झाला होता. वयामानाने असेल बहुतेक. तो बर्‍यापैकी शांत झाला होता. निशिगंधा सोबत वेळ घालवत होता. तीच आणि शरदच नात चांगल होतं.

इतके दिवस घरासाठी शरद कडे वेळ नव्हता. आता रिटायरमेंट नंतर यांच कस होईल? ती विचार करत होती. एक चांगल होईल घरात काय सुरू आहे हे तरी यांना दिसेल. जे मी इतके वर्ष झाले सहन करते आहे. ते तरी यांना समजेल अशी आशा वाटते आहे.

शरद खूप बिझी होता. इतक्या वर्षात पूर्ण संसार एका हाती निशिगंधाने पेलला होता. मी, माझं ऑफिस, बाकीच मला काही सांगू नका.

निशिगंधाने एका शब्दाने तक्रार केली नाही. मूलं सांभाळून सगळं केलं. यांचे नातेवाईक, सणवार सांभाळले. शरद समोर ती शांत असायची. त्याची हुशारी तिच्यावर भारी पडत होती. तो जमेल तेव्हा निशिगंधाची काळजी घेत होता.

बाहेर टॅक्सी थांबली. साक्षी आली. घर भरून गेलं. निशिगंधा खूप खुश होती. तिने साक्षीला जवळ घेतलं. लेकीचा तो स्पर्श खूप छान होता. तीच मन भरून आलं होतं. हळवं व्हायचं नाही. सारखं रडायचं नाही तिने मनाला बजावलं.

साक्षीची गडबड घाई ती एन्जॉय करत होती. तिने खूप गिफ्ट आणले होते. सामान ही खूप आणलं होतं. आई... आई करत ती निशिगंधाच्या मागे होती.

" सचिन कधी येणार आहे?" निशिगंधाने विचारलं.

" तो आज रात्री येईल बहुतेक. "

निशिगंधा ताट करत होती. दोघी जेवायला बसल्या. रेखाताई समोर बसल्या होत्या. त्यांच्या गप्पा ऐकत होत्या.

" आजी काय म्हणतेस?" साक्षीने विचारलं.

" ठीकच आहे म्हणायचं. रूम दिला आहे पडून रहायचं. " रेखाताई तक्रार करत म्हणाल्या.

" आजीला काय झालं?" साक्षीने विचारल.

" काय होणार आहे. न बोललेलं बर. " निशिगंधा म्हणाली.

"तुमच अजून तेच सुरू आहे का?" साक्षी विचारत होती.

" हो. काही इलाज आहे का? यातून सुटका नाही. "

" काय वैताग आहे. आई तू कस एवढ सहन करते? हा मानसिक त्रास आहे. " साक्षी म्हणाली.

" खूपच, काय करू सांग ना. विरोध केला तरी त्या ऐकत नाही. माझं आयुष्य असंच गेल. जावू दे." निशिगंधा म्हणाली.

साक्षीला आई बद्दल वाईट वाटत होतं. तिने शरदला फोन केला." बाबा मी घरी आली आहे."

" हो मी लवकर येतो. "

तिने सोहमला फोन केला. तो ही निघाला होता.

जेवण झाल्यावर दोघी मार्केटमधे गेल्या. उद्याच्या प्रोग्राम साठी साडी घेतली. शरदसाठी कुर्ता घेतला. सोहम, पूनम ही तो पर्यंत घरी आले होते. त्यांचा फोन आला.

शरद ऑफिसहून आला होता. सगळे पुढे बसलेले होते. निशिगंधा, साक्षी आल्या. सगळे एकमेकांना भेटत होते. उत्साही वातावरण होत. साक्षी खरेदी दाखवत होती. मुल किती प्रेम, कौतुक करतात. निशिगंधा, शरद भारावून गेले होते.

रेखाताई त्यांच्यात बसल्या होत्या. त्यांनी घड्याळाकडे बघितलं. त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी होती. रागरंग बघून निशिगंधाला समजलं ती पटकन स्वयंपाकाला लागली.

"आई मी मदतीला येते." पूनम म्हणाली.

"आई स्वयंपाक करू नकोस. आपण बाहेरून जेवण मागवू. पार्टी करू." मुलांच सुरू होतं. साक्षी, सोहम, पूनम खुश होते.

"आता कश्याला बाहेरचे पदार्थ घेताय? तुझी आत्या आल्यावर घ्या." रेखाताईंनी नापसंती व्यक्त केली.

"तेव्हा ही घेवू की आजी. आज बाबांसाठी पार्टी. " सोहम म्हणाला.

" मला घरच हवं. " रेखाताई हट्टाने म्हणाल्या.

" बघितल हे असं आहे. कोणी आलं की यांच सुरू होतं." निशिगंधा, साक्षी बोलत होत्या.

पूनम ओट्या जवळ उभ्या होती. "आई थोडा स्वयंपाक करु. " फक्त रेखाताईं साठी खिचडी केली. बाकीच जेवण बाहेरून आलं.

सचिन आला. जावई आल्या मुळे शरद ही बिझी होता. बर्‍याच वेळ गप्पा सुरू होत्या.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →