Login

घरची नेमप्लेट - भाग -1

Nemplet

घरची नेम्प्लेट - भाग -1


  
            अगं बाई, स्वराचं पण नावं नेमप्लेटवर.. आजकाल हे नविनचं फॅड आलंय नाही, बायकांचं नाव पण नेमप्लेटवर दिसायला लागलं आहे, काय एक एक नवीन निघेल नां, सुधाकाकू त्यांच्या बहिणीला बोलत होत्या.


      सुधाकाकींचे हे शब्द स्वराच्या कानावर पडले, आणी हे शब्द स्वराच्या मनाला खूप लागले, कारण ती नेमप्लेट फक्त पितळी अक्षरांची नव्हती, तर् ती तिच्या आणि सुधीरच्या पंचवीस वर्षांच्या संघर्षाची साक्ष होती, त्यामागे खूप संघर्ष होता, त्या सगळ्यांची साक्ष हे घर होतं.


त्या नेमप्लेटवरं लिहिलं होतं,


"सुधीर आणि स्वरा सावंत".



स्वराने प्रेमाने त्या नेमप्लेटवरून हात फिरवला आणि नकळत ती भूतकाळात हरवली.


स्वरा एका साध्या कुटूंबातली मुलगी, वडील शाळेत शिपाई, आई गृहिणी होती पण घरातून शिलाईकामं करत असे, स्वरा आणि एक मोठा भाऊ अशी ही दोन भावंड होती, घरची परिस्थिती बेताची होती.


दुसरीकडे सुधीरं, वडिलांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानंतर आई आणि दोन लहान बहिणींची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली, ती जबाबदारी त्याने कष्ट करून निभावली, अतिशय कष्टाळू असा हा सुधीर.


सुधीरच्या दोन्ही बहिणींची लग्न झालेली होती, त्या आपापल्या संसारात सुखी होत्या, त्याची आई एक वर्षांपूर्वीचं वारलेली होती, बहिणींची लग्न त्यांची बाळंतपण ह्या सगळ्यात स्वतःचं घर मात्र सुधीरला
घेता आलं नव्हतं.


स्वराला हे स्थळ सांगून आलं तेव्हा तिचे काका म्हणाले, मुलगा चांगला आहे गं, पण नां त्याचं स्वतःचं घर, नां बँक बॅलन्स, भाड्याच्या घरात राहतो तो.


पण स्वराला सुधीर पसंत पडला होता.


स्वराला बघायला आल्यावर सुधीर स्वराच्या वडिलांना म्हणाला होता, काका माझ्याकडे भरपूर संपत्ती नाही आहे, पण तुमच्या मुलीला आयुष्यभर कधीच मान खाली घालावी लागणार नाही...एवढा विश्वास मात्र मी नक्की देऊ शकतो.


ह्या एका वाक्याने सुधीरने स्वराच्या घरच्यांची मन जिंकली होती, लग्न ठरलं.


     एक महिन्याने लग्न झालं, स्वरा सावंतांची सुन म्हणून घरात आली, घर म्हणजे फक्त दोन खोल्या होत्या, उन्हाळ्यात घरात प्रचंड उकाडा व्हायचा, त्यात लग्न एप्रिलमध्ये झालं असल्यामुळे गर्मी होतं असे, पण स्वरानें त्याबद्दल कधीच तक्रार केली नाही.


     सुधीर सकाळी सातला घराबाहेर पडायचा आणि रात्री दहाला परत यायचा. एका खाजगी कंपनीत नोकरीं करून तो संध्याकाळी दोन तास अकाउंट्सची पण पार्ट टाईम कामं करायचा.


स्वरा त्याला म्हणायची एवढी धावपळ कां करताय तुम्ही...


सुधीर हसून म्हणायचा, आपलं स्वतःच घर घ्यायचं आहे गं मला, कधी आणि किती वर्षांनी जमेल माहित नाही, पण एक दिवस नक्कीच घेऊ.


सुधीरच्या कष्टाकडे बघून स्वराने पण एक निर्णय घेतला, तिने संसारात काटकसर सुरु केली.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - लग्नानंतर किती वर्षानी सुधीरच्या स्वप्नातलं घर होतं ते.)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →