शॉर्टफिल्म लेखन स्पर्धा जुलै 2026
(साठीतील मैत्रीणींचा संवाद)
नवऱ्याच्या तिसऱ्या बायकोची गोष्ट...
नवऱ्याच्या तिसऱ्या बायकोची गोष्ट...
"काय तरी बाई या मिडियानी उच्छाद मांडलाय सगळ्या वैयक्तिक गोष्टी चव्हाट्यावर. आजवर लग्नाच्या पत्रिका छापून जगजाहीर आमंत्रण पाहिलं होतं.आता घटस्फोटही जगजाहीर..."
"आता हे सिनेस्टार, गायक मोठे मोठे लोकच असं करून राहिले तर आपल्यासारख्या घरात काय आणखीनच फावते."
"काय तर म्हणे प्रेम विवाह तेव्हा इतकं उतू जाते प्रेम की दुसरं काहीच सुचत नाही. दुसरा कोणी काही सांगते ते समजत नाही. करीन तर त्याच्याशीच करीन त्याच्यासारखा जगात दुसरा कोणीच नाही."
"अन आता काय तर त्याच्या एवढा वाईट जगात कोणी नाही.
त्याचे माझे विचार जुळत नाही."
त्याचे माझे विचार जुळत नाही."
"आधी कशे जुळले होते मग. आता कोणाचे विचार बदलले त्याचे कि तिचे?"
"म्हणून आज कालचे पोरं पोरी लग्न करायला तयार होत नाहीत."
"लग्नाचं बंधन नको आहे त्यांना फक्त. बाकी न बोललेलं बरं. एकावेळी चार डगल्यांवर हात..."
"आपल्या नवऱ्याची तिसरी बायको बघायला मुलाबाळांसह हजर किती उदारमतवादी आहेत बरं आजकालच्या मुली..."
"उदारमतवादी म्हणे...तिचा असेल ना अजून दुसरा कोणी. मग..."
"आम्ही सहमतीने वेगळे होतोय एकत्र येतांना काय कुणी जबरदस्ती केली होती?"
"ते 'लिव्ह इन' चं फॅड आलंय आता. पटलं तर पटलं नाहीतर तुझी तू माझा मी."
"बरोबर ना गं दोघेही कमवतात त्यांना एकमेकांची गरजच उरली नाही."
"पण मुलाबाळांचे काय त्यांचा काही विचार? त्यांची बिच्यार्यांची मधल्या मध्ये फरफट."
"पण मुलाबाळांचे काय त्यांचा काही विचार? त्यांची बिच्यार्यांची मधल्या मध्ये फरफट."
"आपल्या वेळी होतं का गं असं काही? आई-वडिलांनी शोधलेल्या मुलासोबत... चहा पोह्याच्या वेळी नजर उचलून वर पाहिलेही जात नव्हते.तरी चोरट्या नजरेने बघायचे.बस्."
"तेच बरं होतं आता हे काय पाहतात?"
"तरी आपण निभावले ना गं संसार गुण्यागोविंदाने."
"तरी आपण निभावले ना गं संसार गुण्यागोविंदाने."
"अगं असंही म्हणायची सोय राहिली नाही बघ.
कालच वाचली मी पेपरात एका पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्याची बायको मेली आणि एका साठ वर्षाच्या म्हातारीचा नवरा.
त्या दोघांनी आपल्या मुला बाळांच्या संमतीने 'लिव्ह इन' मध्ये राहायचं ठरवलं..."
कालच वाचली मी पेपरात एका पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्याची बायको मेली आणि एका साठ वर्षाच्या म्हातारीचा नवरा.
त्या दोघांनी आपल्या मुला बाळांच्या संमतीने 'लिव्ह इन' मध्ये राहायचं ठरवलं..."
"हे काय?म्हातारचळ...म्हणायचे."
"अगं पूर्ण ऐकून तर घे आधीच प्रतिक्रिया देतेस.
लिव्ह इन मध्ये राहायला एक वर्ष झालं नाही तोच त्याचे हार्ट अटॅक ने निधन झाले आता दोघांचेही मुलं मुली इस्टेटीसाठी भांडताहेत ते वेगळे आणि शेवटी एकटेपण...?
ते तर पहिल्यापेक्षाही जास्त जाळणारं कारण आता जबाबदारी कोण घेणार? "
"पाश्चिमात्यांचा अनुकरण करता करता सगळे संस्कार गुंडाळून ठेवलेत बाई आजकाल.
'कालाय तस्मे नमः'
दुसरं काय?
©®शरयू महाजन

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने