रुटीन सुरू झालं, नवरी चहाचा कप घेऊन नवऱ्याला द्यायला आली आणि त्याच्या शेजारी बसली. मुलाला हे सगळं नवीन होतं, तो लाजायचा आणि घाबरायचाही... तेवढ्यात कविता तिथे आली...
*****
"ऐका ना, मला सकाळी 9 वाजताच जायचं आहे कार्यक्रमाला, तयारी करण्यासाठी मला लवकर बोलावलं आहे"
"जा की मग, त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय.."
"अहो मी सकाळी थालीपीठचं पीठ भिजवणार आहे, मुलांना सकाळी सकाळी डब्याला हवंय.. पण तुम्हाला 10 ला डबा लागतो"
"मग?"
"मी 9 ला गेले तर तुम्हाला गरमागरम थालीपीठ कोण बनवेल?"
"वेडी की खुळी तू? आई आहे ना, आई बनवून देईन..त्यात काय एवढं..तू नव्हतीस तेव्हा उपाशी नव्हतो राहत मी, आईच करायची.."
मिहीर सहजपणे बोलून गेला पण नेहा मात्र सासूबाईंना पुरती ओळखून होती. आपल्या मुलासमोर कामाचा कांगावा करायचा, प्रत्यक्षात मात्र कशालाच हात लावत नसत. लग्नाआधी केलं असेल आई म्हणून, पण लग्न झाल्यावर मुलाचं प्रेम स्वार्थात बदललं..ते फक्त सुनेला दाखवून देण्यापुरतं उरलं.. मुलगा आता सुनेचाही आहे हे त्यांना पटतच नसे. आईच्या प्रेमाची झालर उतरून सासूची झालर त्यांच्यावर चढली. मिहिरच्या डोळ्यावर आईच्या प्रेमाची पट्टी असल्याने त्याला आईचं कुठलंच वागणं खटकत नव्हतं. याचाच फायदा घेऊन सासूबाई नेहाला छोट्या छोट्या गोष्टींवरून विनाकारण त्रास देत.
हीच संधी आहे नवऱ्याला धडा शिकवायची, असं समजून नेहा सकाळी 9 वाजताच कार्यक्रमाला निघून गेली. साडेनऊ झाले तसं मिहिरने आईला आवाज दिला..सासूबाई त्यांच्या खोलीतच होत्या, त्यांना माहीत नव्हतं नेहा घरी नाही ते..
"आई, अगं नेहा नाहीये आज..तेवढं थालीपीठ टाकून देतेस का??"
पूर्ण वाचा कमेंटमध्ये
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
