“थांब.” मिताली उठणार इतक्यात मंदार म्हणाला.
दोघी त्याच्याकडे पाहू लागल्या.
दोघी त्याच्याकडे पाहू लागल्या.
“मी जवळच्या कॅटरिंगवाल्याला फोन करतो. भाजी आणि पोळ्या मागवू.” तो शांतपणे मोबाईल काढत म्हणाला.
“सणाच्या दिवशी बाहेरचं जेवण? लोक काय म्हणतील?”आई अक्षरशः चिडल्या.
“लोक पोटभर जेवतील.” मंदार शांतपणे म्हणाला.
“घरची प्रतिष्ठा असते काही! आणि ती म्हणतेय ना करून घेऊ, मग आम्हा बायकांच्या मधात कशाला बोलतोय?” आईंचा आवाज वाढला.
“प्रतिष्ठा जेवणात नाही, माणसांच्या चेहऱ्यावर दिसते. थकलेल्या चेहऱ्याने वाढलेलं जेवण कोणाला आवडत नाही.”मंदारने यावेळी सरळ उत्तर दिलं.
मिताली शांत उभी होती. ती काही बोलली नाही.
ती फक्त पाहत होती, हा वाद नाही, ही भूमिका आहे.
मिताली शांत उभी होती. ती काही बोलली नाही.
ती फक्त पाहत होती, हा वाद नाही, ही भूमिका आहे.
मंदारने ऑर्डर दिली.
“आमच्या काळात असं नव्हतं.”आई नाराज होऊन बाजूला बसल्या आणि त्यांची बडबड सुरू होती.
मिताली हळूच त्यांच्या जवळ बसली.
“आई, तुमच्या काळात मदत मिळत नव्हती… म्हणून तुम्ही सगळं केलंत. पण आता पर्याय आहेत ना.”
आई काही बोलल्या नाहीत.

“काम कमी केलं म्हणजे सण कमी होत नाही.”ती पुढे म्हणाली.
अर्ध्या तासात जेवण आलं.
पाहुण्यांना काहीच फरक जाणवला नाही. उलट सगळे आरामात बसून गप्पा मारत होते.
पाहुण्यांना काहीच फरक जाणवला नाही. उलट सगळे आरामात बसून गप्पा मारत होते.
“वा सुजाता, यावेळी तू पण आमच्यासोबत बसली आहेस. नाहीतर कायम स्वयंपाकघरातच असायचीस.”कमलाताई म्हणाल्या.
आई थबकल्या. त्यांना जाणवलं , खरंच, आज त्या पहिल्यांदाच पाहुण्यांसोबत बसल्या होत्या.
त्यांच्या हातात चहाचा कप होता आणि घाई नव्हती.
त्या नकळत मंदारकडे पाहू लागल्या.
त्यांच्या हातात चहाचा कप होता आणि घाई नव्हती.
त्या नकळत मंदारकडे पाहू लागल्या.
संध्याकाळी पाहुणे गेल्यावर मिताली गच्चीवर उभी होती. गुढी अजूनही वाऱ्यात डोलत होती.
मंदार तिच्या बाजूला आला.
मंदार तिच्या बाजूला आला.
“काय विचार करतेय?” पाठीमागून तिला मिठीत घेत म्हणाला.
“मला काहीतरी कळलं.” ती त्याच्या हातांवर हात ठेवत म्हणाली.
तो तिच्याकडे पाहू लागला.
ती म्हणाली —
“मला तू नेहमीच फार प्रॅक्टिकल वाटतो.. कधी कधी मला सुद्धा ते आवडायचं नाही.. पण तू काम टाळत नाहीस… तू थकवा टाळतोस.”
ती म्हणाली —
“मला तू नेहमीच फार प्रॅक्टिकल वाटतो.. कधी कधी मला सुद्धा ते आवडायचं नाही.. पण तू काम टाळत नाहीस… तू थकवा टाळतोस.”
मंदार हसला, “घर चालवायचं असेल तर ऊर्जा जपावी लागते. नाहीतर लोक आधी थकतात… मग नाती.”
मिताली हलकं हसली, आणि आणखी एक कळले आहे..” ती लाडाने म्हणाली.
“काय?”
“की तू खूप गोड आहेस..” तिने डोळे मिचकावले. त्यावर तो खूप गोड हसला.
“काय?”
“की तू खूप गोड आहेस..” तिने डोळे मिचकावले. त्यावर तो खूप गोड हसला.
*******
“ आज पहिल्यांदा सण एंजॉय करताना दिसली.” सतीशराव पुस्तकात नजर खुपसून बोलत होते.
“ आज पहिल्यांदा सण एंजॉय करताना दिसली.” सतीशराव पुस्तकात नजर खुपसून बोलत होते.
“हो ना , कितीतरी दिवसांनी आज वहिनी सोबत छान गप्पा मारता आल्यात. खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला.” आई सतीशरावांना सांगत होत्या.
“हम्म… सगळं तुझ्या सून आणि मुलामुळे..
प्रॅक्टिकल असणं म्हणजे भावना कमी असणं, असे नसते.” सतीशराव.
प्रॅक्टिकल असणं म्हणजे भावना कमी असणं, असे नसते.” सतीशराव.
“तुझी वहिनी सुद्धा छान कौतुक करून गेल्यात, बरं का.. जे त्यांना कधीच जमत नाही ..“
आई काही बोलली नाही बघून सरीशराव हळूच म्हणाले. त्यावर मात्र त्या खळखळून हसल्या.
आई काही बोलली नाही बघून सरीशराव हळूच म्हणाले. त्यावर मात्र त्या खळखळून हसल्या.
********
मितालीची सकाळची गडबड सुरू होती. आई स्वयंपाकघरात आल्या. “बस,” त्या म्हणाल्या.
मिताली गोंधळली.
मितालीची सकाळची गडबड सुरू होती. आई स्वयंपाकघरात आल्या. “बस,” त्या म्हणाल्या.
मिताली गोंधळली.
“आज बरं वाटतेय का? काल जरा धावपळ झाली. मी नाश्ताचे बनवते, तू बस.”
मिताली ते बघून गोंधळली.
मिताली ते बघून गोंधळली.
आई पुढे म्हणाल्या,
“आणि ऐक… उद्यापासून काम वाटून घेऊ. आणि बाई ठेवू.”
“आणि ऐक… उद्यापासून काम वाटून घेऊ. आणि बाई ठेवू.”
मितालीच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला.
आई हलकंसं हसल्या.
“देवाला नैवैद्य भावनेचा लागतो. अहंकाराचा नाही.”
“देवाला नैवैद्य भावनेचा लागतो. अहंकाराचा नाही.”
संध्याकाळी मंदार घरी आला.
आई आणि मिताली एकत्र बसून भाजी तोडत होत्या. मध्ये मध्ये हसत होत्या.
तो दारातच थांबला.
“कधी कधी मुलं आई-वडिलांना जगायची नवी पद्धत शिकवतात.” सतीशराव म्हणाले.
आई आणि मिताली एकत्र बसून भाजी तोडत होत्या. मध्ये मध्ये हसत होत्या.
तो दारातच थांबला.
“कधी कधी मुलं आई-वडिलांना जगायची नवी पद्धत शिकवतात.” सतीशराव म्हणाले.
“ सॉरी बाबा, पण काय करू, कधी कधी बोलावे लागते..” मंदार.
सतीशराव सहमती दर्शवत हसले.
घर बदललं नव्हतं.
लोक बदलले नव्हते.
फक्त एक गोष्ट बदलली होती, कर्तव्यात समजूत आली होती.
आणि त्या वर्षी गुढी फक्त दारात नव्हती उभारली…
ती घरातल्या प्रत्येक मनात उभी राहिली होती.
लोक बदलले नव्हते.
फक्त एक गोष्ट बदलली होती, कर्तव्यात समजूत आली होती.
आणि त्या वर्षी गुढी फक्त दारात नव्हती उभारली…
ती घरातल्या प्रत्येक मनात उभी राहिली होती.