“मला पोळ्या येत नाहीत,” तो पुढे म्हणाला, “पण शिकू शकतो. नाही जमलं तर स्वयंपाक करणारी ठेवू.”
आई चिडल्या.
“देवाला बाहेरच्या बाईच्या हातचा नैवैद्य लावायचा का?”
“देवाला बाहेरच्या बाईच्या हातचा नैवैद्य लावायचा का?”
मंदारने कपाळावर हात मारला.
“देवाला भावना लागतात, आई. पोळी कोणी लाटली ते नाही.” बोलत तो तिथून निघून गेला.
“देवाला भावना लागतात, आई. पोळी कोणी लाटली ते नाही.” बोलत तो तिथून निघून गेला.
आई संतापाने हॉलमध्ये आल्या.
“बघितले? बायकोच्या मागे मागे फिरतोय. बरं शिकवून ठेवलंय बायकोने..”
“बघितले? बायकोच्या मागे मागे फिरतोय. बरं शिकवून ठेवलंय बायकोने..”
सतीशराव शांत बसले होते. त्यांनी हळूच विचारलं, “चुकीचे काय बोलला?”
ते ऐकून आई थबकल्या.
“तो तिची बाजू घेतोय… कारण त्याने तुझं आयुष्य पाहिलं आहे.” सतीशरावांचा आवाज शांत होता, पण शब्द जड होते.
आई काही बोलल्या नाहीत.
“तू नोकरी, घर, सगळं एकटी ओढताना पाहिलंय त्याने. सकाळी तापात बसून डबे बनवताना पाहिलंय.” सतीशराव. आई फक्त बघत होत्या.
“तेव्हा मी काही बोललो नाही. आईसमोर तुझ्या पाठीशी उभे राहण्याची हिंमत झाली नाही. आणि कुरकुरी वाढत गेल्या तेव्हा शेवटी मीच तुला नोकरी सोड म्हणालो. आठवतंय तू काय म्हणाली होतीस?”
आईंच्या डोळ्यांत पाणी आलं.
“ठीक आहे… पण माझी ओळख इथेच संपली.” असं म्हणाली होतीस.”
सतीशराव शांतपणे म्हणाले,
“तू काम करत होतीस तेव्हा तुला साथ हवी होती. आज तीच साथ तुझा मुलगा तिला देतोय, त्यात काय चुकीचे आहे?”
“तू काम करत होतीस तेव्हा तुला साथ हवी होती. आज तीच साथ तुझा मुलगा तिला देतोय, त्यात काय चुकीचे आहे?”
आईंच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणी उमटू लागल्या.
सकाळी पाचला उठायचं. घरकाम. ऑफिस. परत येऊन स्वयंपाक. सासूबाईंचे टोमणे.
कोणी कधीच विचारलं नव्हतं, “तू ठीक आहेस ना?”
कोणी कधीच विचारलं नव्हतं, “तू ठीक आहेस ना?”
सहा महिन्यांची गर्भवती होती. एक दिवस तापाने अंग जळत होतं. तरी पोळ्या लाटत उभी. थोडीशी बसली तर लगेच सासूबाई रागवल्या होत्या. आराम करत बसशील तर बाळ आळशी होईल, आणि काय काय बोलल्या होत्या…
आईंच्या डोळ्यांत अचानक मिताली दिसू लागली — स्वतःचीच तरुण सावली.
तीच धावपळ. तीच अपराधी भावना.
फरक फक्त एवढाच, आज कुणीतरी तिच्यासाठी उभं होतं.
जे तिच्यासाठी कधी उभं राहिलं नव्हतं. पण तरी सुद्धा सगळं समजून सुद्धा कळत नव्हते की वळत नव्हते. बहुतेक आता पात्र बदलले होते, तेव्हा त्या सून होत्या आता सासूबाई.. कुठला अहंकार, काय आडवे येत होते कळत नव्हते.

******
चैत्राची पहाट उजाडली. मिताली लगबगीने कामं करत होती. बाहेर अंगणात मोहक रांगोळी काढली होती. दाराला आंब्याची, फुलांची तोरण शोभत होती. स्वयंपाक घरात तिने नैवेद्य करायला घेतला होता. आई फक्त तिच्या हालचाली टिपत होती.
दुपारी अचानक फोन आला. आईंची मोठी वहिनी, कमलाताई, येणार होत्या. त्यांच्यासोबत अजून चार लोक.
“अरे देवा… अजून जेवण वाढायचं आहे. पुरणार नाही.”आईंच्या चेहऱ्यावर ताण आला.
“आई, मी कुकर लावते आणि पोळ्या करायला घेते. तुम्ही भाजीचे बघा. बाकी जेवढे झालेय, त्यात बघून घेऊ. मी आणि मंदार शेवटी बसू जेवायला, होऊन जाईल, काळजी नका करू.” ती थकली होती पण पाहुणे सासूबाईंसाठी किती महत्वाचे आहेत तिला माहिती होते. आधीच काल तब्येतीमुळे वाद झालेला होता, आता आज सणाच्या दिवशी काही नको म्हणून तिने शांततेने आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे घ्यायचे ठरवले होते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा