वर्षाचा पहिला सण दारात येऊन उभा होता.
घरात गुढीपाडव्याची लगबग सुरू होती. स्वयंपाकघरातून फोडणीचा सुगंध येत होता, हॉलमध्ये रांगोळीचे रंग पसरले होते, आणि त्या सगळ्यात मिताली शांतपणे काम करत होती.
तिच्या हालचाली नीटनेटक्या होत्या, पण चेहऱ्यावरचा थकवा लपवत नव्हता. काल रात्रीपासून अंग दुखत होतं. हलकासा ताप होता. तरी ती तिचे कामं करत बसली होती. घरात सणाची तयारी होती , पण उत्साहापेक्षा ताण जास्त जाणवत होता.

“मिताली, बस आता. आत जाऊन आराम कर.” मंदार. त्यावर ती काही बोलली नाही.
स्वयंपाकघरातून लगेच आवाज आला.
“आराम? उद्या सण आहे. कामं कोण करणार मग?”
“आराम? उद्या सण आहे. कामं कोण करणार मग?”
“आई, मी आहे ना. तू कामांची लिस्ट दे.” मंदार शांतपणे म्हणाला.
आई वळल्या, “तू? आता तू पोळ्या लाटणार आहेस काय?”
त्यावर मंदारने उत्तर दिलं नाही. फक्त मितालीकडे पाहिलं.
“जा, आराम कर.” यावेळी त्याच्या आवाजात निर्णय दिसत होता.
मितालीने तिची सुरू असलेली कामं बाजूला सारून ठेवली आणि खोलीकडे निघाली. पाठीमागे शब्द लागलेच.
“ही एकटीच काय नोकरी करते? आम्ही पण करत होतो. पण आमची कामं कधी अशी पडून राहिली नाहीत.” आई.
ते ऐकून मिताली मागे वळली, खोल श्वास घेत, ती स्वतः बोलली.
“मी माझी जबाबदारी टाळत नाहीये. पण स्वतःची काळजी घेणंही जबाबदारीचाच भाग आहे असं मला वाटतं.” ती शांतपणे पण स्पष्टपणे म्हणाली आणि आतमध्ये निघून गेली.
“मी माझी जबाबदारी टाळत नाहीये. पण स्वतःची काळजी घेणंही जबाबदारीचाच भाग आहे असं मला वाटतं.” ती शांतपणे पण स्पष्टपणे म्हणाली आणि आतमध्ये निघून गेली.
“इतके तोंड वर करून ती बोलून गेली, तुला कसेच काही वाटत नाही? वरतून तिचीच बाजू घेतोय. आम्ही पण नोकरी केली आहे, पण सासूबाईंना कधी असे बोललो नाहीत. ” आई थोड्या चिडलेल्या वाटत होत्या.
“आई, मी तेव्हा पण तुला जॉब सोड म्हणत होतो.”
“मी स्वतःसाठी करत होते काय? घरासाठी करत होते! तुमच्या शिक्षणासाठी! तापातसुद्धा काम केलंय मी. कधी कुरकुर केली नाही.”आई लगेच पेटल्या.
“कुरकुर केली नाही… की कुणी ऐकून घेतलं नाही?”मंदारचा आवाज शांत होता, पण धार होती.
क्षणभर शांतता पसरली. आईंच्या चेहऱ्यावर धक्का उमटला.
“आता हिला काय गरज आहे नोकरीची? तू चांगला कमावतोस. घर सांभाळावं बस.”
“गरज पैशांची नाही, आई. गरज तिच्या अस्तित्वाची आहे.”मंदार सरळ त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
“तिने अभ्यास केला, एवढे परिश्रम घेतले, करिअर उभं केलं. लग्न झालं म्हणून ती फक्त ‘घरची बाई’ झाली पाहिजे, हा नियम कोणी लिहिला?” मंदार.
“घर चालवायचं असतं स्त्रीने.” आईंचा आवाज कडक झाला.
“घर दोघांचं असतं.” मंदार लगेच म्हणाला.
“बाईची कामं बाईलाच जमतात आणि शोभतात पण.. तू काय पोळ्या लाटत बसणार आहेस का आता घरात? ” आई.
“मला पोळ्या येत नाहीत,” तो पुढे म्हणाला, “पण शिकू शकतो. नाही जमलं तर स्वयंपाक करणारी ठेवू.”
आई चिडल्या.
“देवाला बाहेरच्या बाईच्या हातचा नैवैद्य लावायचा का?”
“देवाला बाहेरच्या बाईच्या हातचा नैवैद्य लावायचा का?”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा