Login

नंदिनी..श्वास माझा 12

शरू नंदू


भाग-12 : लग जा गले, फिर ये हसी रात हो ना हो


" काय यार नंदू , तू स्वप्नात सुद्धा माझ्या खोड्या करत असतेस, झोपु दे गं!" , आपल्या हातांनी आपले कान चोळत शरू झोपेतच बोलत होता .

" मी स्वप्नात नाही , खरोखरच इथे आली आहे. उठ ना आता , उद्यापासून तर झोपायचंच आहे तुला !" , खुसुरपुसुर आवाज करत नंदू त्याच्या कानात बोलत होती..


तिच्या त्या वाक्याने त्याने ताड्कन डोळे उघडले , तर डोळ्यांसमोर नंदू होती.

" ये बाई , अशी रात्रीची तू इथे काय करते आहे ?" , तो थोडा जोरात बोलणारच होता की नंदूने तिचा हात त्याच्या तोंडावर दाबून धरला .

" shhh ! ए हळु बोल ना, जागे होतील ना सगळे!\" , नंदू आजूबाजूला बघत हळू आवाजात म्हणाली.

नंदुचा हात शरूच्या ओठांवर होता , त्यामुळे त्याला बोलता येत नव्हते, तो इशाऱ्याने तिला तोंडावरचा हात काढ म्हणत होता. नंदू ने त्याच्या तोंडावरून हात काढला तसा तो झोपल्या ठिकाणी उठून बसला , आणि आजूबाजूला बघत होता तर त्याला रोहन दिसला नाही.

" इतक्या रात्रीची तू इथे काय करतेस ? हार्ट अटॅक येता येता राहिला मला ,असं कोणी येऊन बसतं काय समोर? ते ही इतक्या मध्यरात्री? आणि तू आत मध्ये कशी आली, दार तर बंद होते ना ?" , शरू म्हणाला.

" हा ते ... रोहन बाहेर बाल्कनी मध्ये काहीतरी करतोय , खोलीचं दार उघड होतं !" नंदू म्हणली.

" इतक्या रात्रीची तू इथे काय करायला आली आहे? इतकी आठवण येते माझी मला सांगायचं असतं , मी आलो असतो !" शरू तिची मस्करी करत बोलला.

" ए फाजीलपणा पुरे कर आता . दोन-तीन दिवसापासून मला तुझ्या सोबत काहीच वेळ घालवायला मिळाला नाही , ही चांडाळ चौकडी सतत तुझ्या सोबत असते . आता काय तो शांत वेळ मिळाला आहे , चल आता लवकर !" , म्हणत नंदू त्याला तिच्या गच्चीवर घेऊन येत होती.... शरू ने रोहनला इशारा केला आणि तो नंदू सोबत तिच्या घरी गच्चीवर दोघंही उड्या मारून आले.


उद्या सकाळी शरू परत जाणार होता , एकच रात्र मध्ये उरल्याने आणि इतके दिवस तिला त्याच्या सोबत पाहिजे तसा वेळ न घालवता आल्यामुळे , नंदूने ही रात्र शरू सोबत घालवण्याचा प्लॅन केला होता. ती रात्री सगळे झोपायची वाट बघत होती. शरूच्या रूमचा लाईट बंद दिसल्यावर तिच्या लक्षात आलं की आता सगळे झोपले असेल , तशी ती गच्चीवरून उडी मारून शरूच्या गच्चीत गेली... तिला रोहन बाहेर बालकनी मध्ये सिगरेट ओढताना दिसला , त्यामुळे शरूच्या रुमचं दार अनायसे तिला उघडे सापडलं आणि ती आत मध्ये शरूला उठवायला गेली होती.. दोन तीन दिवसाची दगदग आणि नंदूच्या तब्येतीमुळे रात्रीची झोप नीट न झाल्यामुळे थकलेला शरू आज लवकरच झोपी गेला होता...


" बापरे ! तू तर पूर्ण रात्र जागायचे प्लॅनिंग करून ठेवलेले दिसते आहे !" , शरू गच्चीवर नजर फिरवत बोलला..

आजीच्या डब्यातल्या खाऊचे चार-पाच प्लेट ,पाण्याची बॉटल ,खाली चटई टाकलेली होती.....

नंदू चटईवर जाऊन बसली.

" ए , इथे माझ्या समोर येऊन बस ना , मला तुला डोळे भरून बघून घ्यायचे आहे !" , नंदू शरू ला म्हणाली.

" बापरे ! मॅडम तर आज फूल रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत !" , शरू नंदूची मस्करी करत तिच्यासमोर जाऊन बसला , " जशी आपली आज्ञा राणी सरकार !" , तो हसत बोलला ...

" रोमँटिक वगैरे काही नाही हा, मला तुझ्यासोबत खूप खूप खूप गप्पा मारायच्या आहे आणि इथे आपल्याला डिस्टर्ब करणारं कोणी नसेल आहे, फक्त तू आणि मी !" , नंदू त्याचा हात आपल्या हातात घेत बोलली.

" ओ हो , मोठ्या झाल्या तर नंदिनीबाई !" , तो डोळे मिचकावत बोलला.

" श्रीराज !" , नंदूने शरुला हळू आवाज दिला . तिच्या हातात एक छोटासा बॉक्स होता...

खाऊ खाताखाता तो आपलं नाव ऐकून तसाच डोळे मोठे करत तिच्याकडे बघत राहिला.

" काय म्हणालीस..........? तुला श्रीराज म्हणता येते...?? ", शरू आश्चर्याने तिला विचारले.

आज तिने पहिल्यांदा त्याला श्रीराज म्हणून आवाज दिला होता...

" हो ! पण मला शरू च म्हणायला आवडते, तुला शरु फक्त मी एकटीच बोलते ना, मी दिलेलं नाव आहे ते , म्हणून मला ते फार आवडते" , नंदू थोडीशी लाडात येत म्हणाली.

" मी एक छोटसं गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी !", म्हणत तिने तिच्या हातातला बॉक्स ओपन केला. त्यात एक छोटसं \" श्री \" अक्षर कोरलेलं गोल्ड पेंडंट होतं. तिने ते त्याच्या हातात दिले.

" खूप छान आहे !" , शरू ते पेंडेंट हातात घेत बोलला..

" श्री फॉर श्रीराज ! त्याची अजून एक स्पेशालिटी आहे , ते टर्न करून बघ !", नंदू म्हणाली.

शरूने ते पेंडेंट टर्न केले , तर त्यावर बारीक अक्षरात SN असे लिहिले होते.

" SN.. म्हणजे श्रीराज नंदिनी!", नंदू खूप एक्साईटेड होत म्हणाली .

" खूप सुंदर आहे, हे मी सदैव आहे माझ्याजवळ ठेवेल !" , शरू म्हणाला.

" ठेवेल नाही घालायचं !", असं म्हणत नंदूने तिच्या गळ्यातली एक लांब चेन काढली त्यात ते पेंडंट घातलं आणि ती चेन शरूच्या गळ्यात घातली .

" हे बघ , आता मी नेहमी तुझ्या ह्रदयाजवळ राहील , नेहमीकरिता !" , ते पेंडंट हातात घेऊन त्याच्या हृदय वर धरत,. " आता मी तुझ्या हृदयाच्या एकदम जवळ राहिल आहे नेहमीसाठी. आता तू तिकडे गेला तरी तुला माझी नेहमी आठवण राहील म्हणजे तुझी दुसऱ्या मुलीकडे चुकूनही नजर जाणार नाही !" ,नंदू म्हणाली .

" अरे सोन्या, तुझ्याशिवाय कोणी नव्हतं आणि कधीच कोणी नसणार आहे . मी हे नेहमी घालून ठेवेल , कधीच काढणार नाही ", शरू तिला आपल्या जवळ घेत बोलला.

" तू खरच परत येशील ना? टीना त्यादिवशी म्हणाली होती, तिकडे गेले की तिकडून कोणी परत येत नाही !" , नंदू थोडी चिंतित स्वरात म्हणाली.

" अरे बाबा , असं काहीही नाही होणार आहे ,
तू कुणाचेही ऐकत बसते. मन्या , आता तू मोठी झाली आहे, खूप लोकं तुझ्या लाईफ मध्ये येतील, कोणाचे ऐकायचं , कोणाचे सोडून द्यायचं , कोणाचं मनावर घ्यायचं , आता तुला समजायला हवं.. असं प्रत्येकाचं बोलणं जर मनावर घेतलं तर आयुष्यातले आनंदाचे क्षण घालवून बसशील !" शरू तिचे केस कुरवाळत तिला समजावनीच्या सुरात म्हणाला.

" ह्म्म !" , नंदू
तरी तिचं त्याच्या उत्तराने समाधान झाले नव्हते , पण तिने तो विषय बदलला.

नंतर बराच वेळ तो तिला बारावीनंतर काय शिकायचं , कॉलेजमध्ये कसं राहायचं , असं बरंच काही सांगत होता.. मध्येमध्ये एकमेकांची मस्करी करणं, मारामारी करणं सुद्धा सुरू होतं.

" शरू माझ्यासोबत डान्स करशील , माझ्या वाढदिवसाला केला होता तसा ?" , नंदू लडिवाळपणे म्हणाली.

" म्युझिक.....?" , शरू

" म्युझिक ची गरज आहे काय ? आपल्या दोघांचे हार्ट बिटस च आपल्यासाठी खुप स्वीट म्युझिक आहे !" , नंदू त्याच्या डोळ्यात बघत बोलली...

तिचं बोलणं ऐकून तो गालातच हसला आणि तो डान्स साठी उठून उभा राहिला. शरूने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या एका हाताने तिची नाजुक कंबर पकडली . नंदूने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती घातले , ती त्याच्या पावलांवर जाऊन उभी राहिली आणि नजर त्याच्या नजरेला भिडवली.

म्युझिकविना सुद्धा ते खूप छान डान्स करत होते. दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले होते. आता शरू ने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घेतले होते आणि तिच्या कपाळाला स्वतःचे कपाळ टेकवून , तिच्याकडे बघत डान्स करत होता. तो एकटाच पायाने स्टेप्स घेत होता ,नंदू तर त्याच्या पायावर त्याला पकडून उभी होती. पुष्कळ वेळ ते दोघे एकमेकांमध्ये हरवून डान्स करत होते.

रात्र बरीच झाली होती, त्यामुळे आता थोडी थंड हवा जाणवायला लागली होती.

" नंदू , चल खाली जाऊन झोप, इथे आता थंडी वाढत आहे!" , शरू म्हणाला.

" नाही , मला पूर्ण रात्र तुझ्या सोबतच घालवायची आहे !" , नंदू हट्ट करत बोलली.

तिचे मन मोडेल , तो शरू कसा...

" बरं थांब एक मिनिट , मी जाऊन येतो!" , म्हणत शरू खाली नंदूच्या रूम मध्ये गेला आणि तिथून त्याने एक उबदार शाल घेऊन आला..

" बरं , आता इथे मोकळ्या हवेत बसू नको . आत्ताच दोन दिवस तुला ताप होता . चल आपण तिकडे झुल्यावर बसू , तिथे थोडं शेड आहे, हवा लागणार नाही " , शरू म्हणाला.

शरू ने नंदूला झुल्यावर नेऊन बसवले आणि तिच्या खांद्यावर , डोक्यावरून शाल नीट ओढली आणि तिच्या जवळ जाऊन बसला. नंदूने शरूचा एक हात आपल्या माने खालून घेतला, आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवले, आणि आपले दोन्ही पाय वर पोटा जवळ घेऊन त्याच्या कुशीत जाऊन बसली...

" शरू , आई-बाबा खरंच तारे बनून आकाशात चमकत असतील काय रे ? आजी मला लहानपणी असंच सांगायची!" ,नंदू आकाशाकडे बघत बोलली.

" हो , बघ ते तिकडे , दोन तारे , एक आई एक बाबा . ते बघ आपल्याकडेच बघत आहेत.. तू आता नीट राहायचं, असं रडायचं वगैरे नाही ,असं खचून जायचं नाही ... तुला असं रडताना , दुःखी झालेलं बघून त्यांना किती वाईट वाटत असेल !" , शरू म्हणाला.

" ह्म्म "

" शरू , केस कापणारे तुझे . तू आणि टिना सेमच दिसता, असे लांब केस कुणी मुलगा वाढवत असतो काय ? ही तुझी असली कसली फॅशन ?" , त्याच्या डोक्यावर हात फिरवत नंदू बोलली..

" ओके.... नेक्स्ट टाईम येईल तेव्हा केस छोटे करून येईल !" , शरू हसत बोलला..

" पण तू तुझे हे लांबसडक केस असेच ठेवायचे , बिलकुल कापायचे नाही , की छोटे करायचे नाही, मला तुझे हे केस असेच खूप आवडतात !", तिची केसांची एक बट आपल्या बोटांमध्ये फिरवत , खेळत तो बोलला.

" ह्म्म..."

आता जवळपास पहाटेचे तीन-साडेतीन वाजत आले होते. तरी त्यांच्या गप्पा सुरूच होत्या.. नंदू हळूहळू पेंगत होती ती , तशीच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली. त्याने पांघरून तिच्या अंगावर नीट केले.. तो सुद्धा समोर टेबलवर पाय लांब करुन, झुल्याला पाठ टेकवून , त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपलेल्या नंदू च्या केसात हात फिरवत, बसल्या जागीच झोपी गेला.


पहाटेच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने शरूला जाग आली. घड्याळात बघितले तर साडेपाच झाले होते.

" बापरे ! मी पण इथेच झोपलो की काय ?"

नंदू शरू च्या मांडीवर छान गाढ झोपली होती . तिला तसं झोपलेलं बघून त्याला आतून आनंद झाला.

" मन्या , अशीच सकाळ हवी आहे ग रोज मला, बघ आता एकदा शिक्षण पूर्ण झाले आणि करियर चांगलं सेट झालं की लगेच इकडे येऊन आबाकडून तुला नेहमीसाठी माझ्यासोबत घेऊन जाईल. प्रॉमिस आहे माझं तुला !" , तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत शरू मनातच बोलत होता...

त्याने तिला आपल्या कुशीत दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि खाली तिच्या रूममध्ये आला. तिला बेडवर नीट झोपवून तिच्या अंगावर पांघरूण घालून , तिच्या कपाळाचं किस घेऊन तो गच्ची वरूनच उडी मारून त्याच्या रूम मध्ये निघून गेला..

*******

सकाळी सगळ्यांची निघायची तयारी झाली होती. चहा -नाश्ता आटोपून सगळ्यांना भेटून शरू आणि त्याचे मित्र गाडीत सामान ठेवत होते..

" तुम्ही सामान ठेवा , मी आजी , आबा आणि नंदूला भेटून येतो!" शरू त्याच्या मित्रांना बोलला आणि नंदूच्या वाड्यात निघून आला.


" सगळी तयारी झाली बाळा?" , आजी शरू ला म्हणाली.

" हो आजी, नंदू कुठे आहे ?" , शरू म्हणाला.

" जा बघ , बहुतेक झोपलीये, उठव तिला !" , आजी तिचे काम करत बोलली..

शरू ने काही मोगऱ्याचे फूल तोडलीत, फुले आणि एक मोरपीस घेऊन तो नंदूच्या रूम मध्ये गेला..रात्री उशिरा झोपल्यामुळे नंदू खूप गाढ झोपली होती.

शरू तिच्या शेजारी जाऊन बसला . त्याने मोगऱ्याचा फुलांची टोपली तिच्या डोक्याजवळ ठेवली आणि आपल्या हातातून मोरपीस त्याने अलगदपणे तिच्या चेहऱ्यावर फिरवले.....

" श....शू..... !!" , करत नंदू ने चेहऱ्यावर हाताने माशी उडवण्या सारखे केले आणि परत झोपी गेली ...

तिच्या अशा वागण्याने शरूला हसू आले. "बावळटच आहे माझी चिमणी....!" , तो पुटपुटला.

त्याने ते मोरपिस तिच्या अंगावर ठेवले आणि तिचं ते गोड रूप डोळ्यात साठवून घेतलं ..

"स्वतःची काळजी घे राजा !" , म्हणत त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिच्या कपाळावर कीस करून , आपल्या उलट्या हाताने डोळे पुसत तो बाहेर आला.. खाली येऊन आजीला जाऊन नमस्कार आणि हग केले..

" नंदू खाली नाही आली ?" , वरती पायाऱ्यानकडे बघत आजी म्हणाली .

" अगं नाही, ती झोपली आहे. माझं तिला उठवायचं मन झालं नाही . ती रात्री उशिरा झोपली होती !" , शरू म्हणाला.

(शरू ने तिला मुद्दाम उठवले नव्हते....नाहीतर त्याला जायला खूप जड गेले असते आणि त्याला जाताना बघून नंदूला त्रास झाला असता... जे त्याला नको होते..)

" हो रे लबाडा ,तरीच म्हटलं डब्यातला खाऊ संपला कसा !" . आजी त्याचा कान ओढत म्हणाली..

" अरे पण उठायचं होतं तिला, उठल्यावर तू दिसला नाही तर ती आमचं डोकं खाईल , मला उठवलं का नाही म्हणून !" , आजी म्हणाली.

" ठीक आहे ग, एवढं काही नाही !", शरू म्हणाला.

आबा खुर्चीवर पेपर वाचत बसले होते , तो खाली त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला. त्यांच्या मांडीवर आपले हात ठेवले.
" आबा काळजी घ्या !" , शरू त्यांना नमस्कार करत बोलला..

" लवकर परत ये बाळा !" , आबा त्याच्या डोक्यावर हात ठेवत बोलले.

" हो आबा , हा गेलो आणि हा आलो बघा !" हसतच शरू बोलला आणि घराबाहेर पडण्यासाठी तो दरवाजाजवळ आला. परत काहीतरी आठवून तो आबा जवळ परत आला..

" आबा , परत आल्यावर मी नंदूला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे , नेहमीसाठी . काय ते लाड करायचे ते आत्ताच करून घ्या, नंतर मी ऐकणार नाही हा कोणाचं !" , बोलतांना त्याच्या डोळ्यात पाणी होते , त्याचा आवाज आता कापरा झाला होता.. डोळे पुसतच घराबाहेर पडला....

" सगळं कळते रे बाळांनो , असेच नेहमी खुश राहा !", आबा आपले दोन्ही हात वर करत आशीर्वाद दिल्यासारखे मनातच बोलले. शरूच्या डोळ्यातल्या अश्रूंनी खरं काय ते सगळं आबांना सांगितलं होतं..


**********

शरूने नंदिनीच्या चेहऱ्यावर मोरपिस फिरवल्यामुळे तिची झोप मोडली होती. शरू गेल्यावर दहा मिनिटातच ती जागी झाली होती. आळस देत ती उठली , बघते तर तिच्या अंगावर मोरपीस ठेवलं होतं आणि बाजूला मोगऱ्याची फुलं तिला दिसली. मोरपीस हातात घेऊन एकटक त्याच्याकडे बघत गोल गोल फिरवत होती...

" अच्छा , तर हा शरू येऊन गेला वाटतं ", आणि मग अचानक तिला आठवलं,... " अरे आज तर् हा परत मुंबईला जाणार होता!" , तिने घड्याळाकडे बघितलं 8.05 मिनिट झाले होते. ती होती त्या अवतारात तशीच पळत खाली आली..

" आजी ....आजी ...शरू आला होता काय ?" , नंदू पायऱ्यांवरून खाली उतरत ओरडतच बोलली.

" अग हो ,पाच मिनिट झाले, आत्ताच गेला. वरती तुझ्या खोलीमध्ये तुला भेटायला आला होता , पण तू गाढ झोपली होती म्हणाला, म्हणून तुला त्याने उठवले नाही बोलला " , आजी म्हणाली.

" अगं पण उठायचं होतं ना मला ", नंदू ओरडतच बाहेर पळाली.

" अग कुठे चालली ?" , आजी तिला बाहेर जातांना बघून बोलली.

" अगं थांब , येते बघून, तो जास्ती दूर नसेल गेला!" , म्हणती तिने बाहेर धूम ठोकली..

तिचा जीव आता घाबराघुबरा झाला होता. ती होती त्या स्थितीत पळत निघाली होती.. तिने आड वळणाचा छोटा शॉर्टकट रस्ता धरला आणि त्या रस्त्यावरून पळत होती..

" मला न भेटता कसा काय जाऊ शकतो शरू तू ? आपल्या या भेटीचा हा शेवटचा क्षण तू माझ्याकडून कसा हिरावून घेऊ शकतो ? मला....मला बघायचे होते तुला , तुझ्या मिठीत एकदा यायचे होते , एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं !, मनातच बोलत रडत रडत ती पळत होती आणि मोठ्या रस्त्याच्या जवळ येऊन पोहोचली. तिथे उभी रस्त्यावर नजर जाईल तिथवर बघत होती आणि तिला शरू ची गाडी दिसली. गाडी अजून यायची होती.

" शरू......शरू.... !" , जोराने ती आवाज देत होती. रस्त्यापासून थोड्या उंच भागावर ती उभी होती. गाडी तिथून निघायला नको म्हणून घाईघाईने ती खाली उतरायला गेली. तिचा पाय घसरला आणि ती जमिनीवर घसरत खाली पडली.

शरूने तिला पडलेले बघितले आणि लगेच रस्त्याच्या एका साईडला गाडी उभी केली. गाडी थोडी पुढे निघून गेली होती. तो गाडीतून उतरून पळतच नंदू जवळ आला.

त्याला असे पळताना बघून बाकीचे पण गाडी बाहेर येऊन उभे राहिले..

नंदू घसरल्यामुळे खाली पडली होती होती, कसेबसे स्वतःला सावरून ती बसली होती..तिचा लाईट पिवळा पटियाला सलवार मातीने खराब झाला होता , ओढणी सुद्धा घ्यायला ते विसरली होती... घरातून तशीच पळत निघाली होती, तिला एक मिनिटाचा ही उशीर करायचा नव्हता... मोकळे विस्कटलेले केस.., डोळ्यात पाणी, पडल्यामुळे तिच्या कपाळावर थोडं खरचटलं होतं, त्यातून थोडसं रक्त येत होतं आणि हाताला कोपरा जवळ खरचटलं होतं . ती तो जखमी झालेला हात आपल्या दुसऱ्या हातात पकडून पाणावलेल्या डोळ्यांनी शरू कडे बघत बसली होती ,तिचा श्वास चांगलाच फुलला होता.


तिचा तो अवतार बघून शरूच्या काळजात धस्स झालं. त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर त्याच्या कुशीत उचलून घेतले . तिने पण तिचा एक हात त्याच्या मानेत टाकला , दुसऱ्या हाताने त्याचा शर्ट ची कॉलर पकडली होती.. आणि रडक्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती. जवळच असलेल्या झाडाच्या कठड्यावर त्याने तिला आणून बसवीले .

" रोहन, फर्स्ट किट बॉक्स , क्विक !" , शरू रोहनकडे बघत ओरडला..

रोहन धावतच फर्स्ट किट बॉक्स घेऊन आला. शरूने त्याच्या हातातून बॉक्स घेतला. कॉटन आणि डेटॉल ने नंदू च्या कपाळावरची जखम क्लीन करत होता...

" स... स्....", नंदुच्या तोंडून आवाज आला.
नंदुला डेटॉलमुळे थोडी जळजळ झाली होती . ती त्याच्याकडे बघत बसली होती . शरू झालेल्या जखमेवर फुंकर घालत औषध लावत होता.. ती मात्र एकटक त्याच्याकडे बघत होती.

आता सगळे त्यांच्याजवळ जमले होते. मीना सुद्धा नंदूच्या मागे आली होती, नंदू तिला रस्त्याने धावताना दिसली तेव्हा ती नंदूच्या मागे आली होती. ती पण खाली नंदू जवळ येऊन उभी राहिली..
नंदू शरू दोघे उभे होते , त्यांच्या आजूबाजूला हे सगळे उभे होते. त्या दोघांना असे त्रसात बघून बाकीच्यांना पण आता वाईट वाटत होतं.

"मला न भेटता का निघून आलास?" , नंदू डोळ्यांनीच शरू सोबत बोलत होती..

" तू जागी असताना तुला बघून मला निघायला त्रास झाला असता !", शरू ने पण डोळ्यांनीच उत्तर दिले..

शरू नंदू दोघांनाही आता शब्दांची गरज नव्हती, त्यांचे डोळेच एकमेकांशी बोलत होते आणि वाहत होते.

" तुला न भेटता मला किती त्रास झाला असता?" नंदू

" बाळा , काय अवतार करून घेतला आहेस राणी ? असं धावत-पळत यायची काही गरज होती काय ? मला तुझा त्रास बघवला गेला नसता , म्हणून तुला न उठवता निघून आलो " , शरू

" हो होती ,खूप गरज होती, नाहीतर तू निघून गेला असता !", नंदू

" परत येशील ना?" , नंदू त्याच्या डोळ्यात बघत होती.

शरूने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या हृदयावर ठेवला. आता तिला त्याचे हृदयाचे ठोके स्पष्ट जाणवत होते. जसं काही त्याचं हृदय तिला सांगत होतं , \" हो मी नक्कीच लवकर परत येणार aahe\" आणि त्याने तिच्या डोळ्यात बघत होकारार्थी मान हलवली.

" तुला भेटायचा, तुला बघायचा, तुला स्पर्श करायचा , माझा हक्क होता , का निघून आला असाच मला न भेटता ? मला तुला एकदा करकचून मिठी मारायची होती !", तिच्या डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळू लागले होते .

" मिठी मारायची होती " , हे तिच्या मनातलं ऐकून , समजून घेत त्याने तिला मिठीत घेण्यासाठी आपले दोन्ही हात पसरले , पण लगेचच त्याच्या लक्षात आले की आपण रस्त्यावर उभे आहोत . त्याने इकडे तिकडे बघितले , आणि मग त्याने त्याचे हात मागे घेत खिशात घातले. सामाजिक नियमांना तो बांधल्या गेला होता . त्याचे हात तिला मिठीत घेण्यासाठी बांधल्या गेले होते . तिला मिठीत घ्यायची इच्छा असूनही त्याला काही करता येत नव्हतं , याचं त्याला खूप वाईट वाटत होते . त्याच्या सुद्धा डोळ्यातून आता पाणी ओघळू लागलं होतं..

दोघेही भरल्या डोळ्यांनी एकमेकांना बघत तसेच उभे होते . मनाशी मनाचं बोलणं सुरू होतं..

शरू आजूबाजूला बघत होता तेव्हा रोहनने त्याला बघितले होते आणि शरूच्या मनाची अवस्था त्याच्या लक्षात आली होती . त्याने सगळ्यांच्या कानात काहीतरी सांगितले , तसे ते सगळे एक लाईन मध्ये उभे होत भिंती सारखा आडोसा बनवला त्यामुळे रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना नंदू आणि शरू दोघ दिसत नव्हते. सगळे जवळजवळ आले आणि रस्त्याच्या साईडने चेहरा करून उभे होते. सकाळची वेळ असल्यामुळे तसेही रस्त्यावर वाहने कमी होती..

जशी सगळ्यांनी एकमेकांजवळ उभे राहून भिंत बनवून रस्त्याच्या साईड ने आपले चेहरे वळवले, हे लक्षात येताच नंदूने एकही क्षणाचा विलंब न करता , आपले पाय उंचावत , आपल्या दोन्ही हातांनी शरूची मान आणि डोकं पकडून त्याच्या ओठावर आपले ओठ टेकवले आणि ती त्याला रडतच किस करु लागली. शरूला काही कळायच्या आत हे सगळं घडलं होतं. श्वास घ्यायला जड होऊ लागलं तसं तिने त्याला सोडलं. तो एकटक तिच्या डोळ्यात आरपार बघत होता. तिच्या डोळ्यात त्याला विरहाच्या खूप वेदना दिसत होत्या , त्याने तिच्या डोक्याला पकडून तिला आपल्या छातीजवळ मीठीमध्ये ओढले आणि तिच्या डोक्यावर , कपाळावर , केसांवर गालांवर किस करत सुटला.

थोड्या वेळाने जड मनाने त्याने तिला आपल्या मिठीतून बाजूला केले ..

" मीना , नंदू ची काळजी घे !" , एवढं बोलून तो परत जाण्यासाठी मागे वळला , तसे सगळे गाडीत जाऊन बसले..

नंदू पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांची गाडी दिसेनाशी होयीपर्यंत तिथेच उभी होती........




५ वर्ष नंतर..............


********

शरू नंदुचा आता पर्यंतचा प्रवास तुम्हाला आवडला...खूप छान वाटतेय...आता इथून पुढे कथा वेगळे वळण घेत आहे ...अपेक्षा आहे की ते पण तुम्हाला आवडेल..