भाग १
"नंदू sssss ...
"नंदू ssss.... " आवाज देत श्रिराज गाडीतून उतरून समोर असलेल्या वाड्याच्या दारातून आत आला..
गावात आल्या आल्या तो आधी नंदू ला भेटायला यायचा ... नंतर तो घरी जायचा ..
आजी काही काम करत होती, "आजी ग नंदू कुठे आहे ....?"
"नुसती धुमाकूळ घालते, आबांनी रगवलाय.. बसली असेल कुठल्या कोपऱ्यात रुसून " ....आजी
श्रिराज ने परत जोरजोराने द्यायला सुरूवात केली.. तेवढयात आबासाहेब बाहेर आलेत ...
" तू आहेस होय ... तेच म्हणतोय येवाढा आरडाओरडा कुठून येतोय... आताच एकाला शांत बसवले ... आता तू सुरू केले होय रे .. कधी आलास .??" .आबासाहेब
"हे काय आताच येतोय .... ते राहू द्या, नंदू कुठाय सांगा अगोदर " अस म्हणून परत तो आवाज द्यायला लागला.
इकडे नंदू आतल्या खोलीत कोपऱ्यात जाऊन बसली होती .. आवाज ओळखीचा वाटला तसे तिचे डोळे आनंदाने मोठे झाले , तशीच उठून ती पळत बाहेर आली आणि शरू करत त्याच्या गळ्यात पडली ...
"बघ ना रे , सगळेच मला रागवतात" ..मुसमुसत ती शरू ला सांगत होती ..." कोणीच माझा लोभ नाही करत " , आबान कडे बघून ती नाटकी बोलत होती ...
शरू नेहमीच नंदू ची बाजू घ्यायचा .... ती कितीही नाटकी वागली तरी तो तिच्याकडून च बोलायचा नी नंदू यायचाच फायदा घ्यायची ..
" काय केले ते पण सांगा की बाईसाहेब ?" ..आबा
नंदू चुपचाप गालातल्या गालात हसत शरू कडे काही नाही केले अशी मान हलवत होती....
" बाजूच्या राम्याच्या कोंबड्या उडाऊन लावल्या हिनी .. , अश्याच कुरापती करत असते , नी मग सगळे माझ्याकडे हीची तक्रार घेऊन येतात.." आबा
ऐकताच शरू पण खुदकन हसायला लागला , नंदू पण त्याच्यासोबत हसायला लागली
शरू हसतच " काय हो आबासाहेब ... तुम्ही इतके मोठे .. का छळता आम्हा मुलांना ... आम्ही मुलं देवाघरची फुल.. विसरलेत का हो तुम्ही ....?" शहरातलं च पोर ते बोलायला अगदी हुशार...
" आला मोठा हीचा वकील बनून .. हीचे समजते , तू तर येवढा मोठा घोडा झालास ना ?" ...अस म्हणून त्यांची काठी घेऊन शरू नंदू चा मागे आले तसे शरू नंदू हाथ पकडून अंगणभर धावत सुटले , कधी आजीच्या मागे , कधी पायऱ्यांवर ..असे धावत होते ... आबा त्यांच्या मागे मागे करून थकले नी ओसरीत खुर्चीवर बसले ....
"नंदूच्या आजी पाणी आणा हो , या कार्ट्यांनी "दमाऊन सोडलं..."
आजी हे सगळं बघत होती, " शरू आला की कसे घराचं गोकुळ होऊन जाते " ... मनातच बोलली .. नी आतमध्ये पाणी आणायला गेली ..
" चल जा आबासाहेबांकडे , एक पापी कर ... राग पळून जाईल त्यांचा.. " अस म्हणत त्याने तिचे गोबरे मऊ मऊ गाल ओढले... नी परत त्याच्या घरी जायला निघाला...
" अरे बाळा आला तसाच निघाला?? , हे बघ खाऊ आणलाय , थोडं खाऊन तर घे ," ...
प्लेट मधला एक लाडू उचलत .. " येतो ग आजी उद्या ... तिकडे पण महासरकर बसलीय ना .. ओरडत असेल माझ्या नावानी ." .. म्हणत शरू पळाला..
" या साहेब , तुम्ही आता मोठे झाले, नाही काय...? आता तुम्हाला त्या कार्टी शी आधी भेटायचं .... या आजीची काही आठवण नाही यायची ना .??"... मोठे डोळे करत आजी शरू ला आत येत बघत म्हणाली...
" ओये माझी शोणुली मोणुली क्युटी पाय आज्जी ... इतक्या दुरून आलो, आता काय अशी मला रागवत बसणार आहेस ग ?" ... असं म्हणत तो तिचे गाल ओढत बसला... तसा आजी च राग कुठल्या कुठे उडाला...
त्यांना असे असेेे बघूूून सगळे
हा आहे श्रिराज ... १३ वर्षाचा .. खूप समजदार तेवढाच मस्तीखोर ... त्यात नंदू ची साथ असली की भयंकर मस्ती करणार... सर्वांना नको नको करून सोडणार .. .. मुंबई ला राहतो ... प्रत्येक उन्हाळा चा सुट्टी मध्ये इथे गावात मामा कडे यायचा आई सोबत... नंदू त्याची बेस्ट फ्रेंड .. खूप जीव तिच्यावर त्याचा...
घाऱ्या डोळ्यांची नंदू म्हणजे नंदिनी .. ९ वर्षाची .. सुंदर गुटगुटीत पोर, ७ वर्षाची असताना एका अक्सिड्डेंत मध्ये आई वडील दोघंही गेलेले, इथे गावामध्ये आपल्या आजी आबा सोबत राहते... भयंकर उपद्रवी, मस्तीखोर ...सर्वांना नको नको करून सोडणारी...पण तेवढीच निर्मळ मनाची ... आणि म्हणून सगळ्यांची लाडकी..
७ वर्षाची असताना पासून शरू आणि नंदू ची ओळख , शरू हो नंदू श्रिराज ला शरू च म्हणते तिला श्रिराज म्हणता नाही यायचं ..
नंदू चा आबा च वाडा आणि शरू चा मामाचा वाडा आजूबाजूला , तो सुट्टी मध्ये आला की तिथे मित्रांसोबत खेळायचा ....
असाच खेळत असताना वाड्याच्या समोर दाराजवळ पाळी वर बसलेली नंदू त्याला दिसली, तिच्या डोळ्यात पाणी होत, मुसमुसत होती ती ..तेव्हा शरू ११ वर्षाचा होता , तिचा तो लोभस केविलवाणा चेहरा बघून तिच्या जवळ आला ,
"काय झालं, का रडतियेे" ?.. शरू
दोन्ही हात फोल्ड करून ती त्याच्याकडे बघत
"आजी ने सांगितलेय अनोळखी सोबत बोलायचं नाही .."
"अगं होो , पण मी अनोळखी कुठेय , बघ बाजूच्याच त वाड्यात राहतो..तू मला सांगू शकते ?" , मी मदत करेल तुझी .
" खरंच ...?"
"हो.."
"आजी रागावली ." . रडक्या आवाजात नंदू
"का..??" शरू
" ते मी... मी.. म्याऊ च शेपूट ओढल ..."
काय??? शरू डोळे मोठे करत, "ऐवढा साठी रागावली आजी ..?"
"दूध सांडले.,." . नी नंदू रडायला लागली
" म्हणजे मला कळलं नाही... नीट सांग ना ...?" शरू
"ते मी .... म्याव माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होती , म्हणून मी तिची शेपूट ओढले, मग ती माझ्या मागे धावायला लागली, मी पळत होती, आजी ला धडकली , आजीच्या हातातलं दूधच पातेल खाली पडलं... ह्याा...". नंदू ने भोंगा पसरला...
शरू हसायला लागला..
"तू हसतोस होय .?" ... आ.. परत भोंगा काढला, तू मला मदत करणार होता ना ..
अगं हो हो , तू पाहिले रडायची थांब , डोळे नी नाक पुस आधी ते .... कसं शी दिसतंय...
आणि तू बस, इथेच, मेi आलोच म्हणत शरू त्याचा वाड्यात गेला...
त्यांच्या कडच्या गडी माणसाला , गण्या काका ओ गण्या काका , मला ते गायी च पातेल भर दूध द्या हो काढून
काय करासाल छोटे मालक ...
ध्या हो मला पटकन, काम आहे ते ... लवकर ध्या
गण्या नी त्याला पातेल मध्ये दूध दिले, ते घेऊन तो नंदू जवळ आला नि म्हणाल चल आतमध्ये ... नंदू नी तो आतमध्ये आले
आज्जी ओ आज्जी ...
आजी बाहेर आली...
काय रे पोरांनो .. चला बाहेर खेळा... आणि हे काय आणलास तू ....
आज्जी हे घ्या पातेल, दूध आहे त्यात... हिला रागावू नका, चुकून झालं होत ते तिच्या कडून ... रडतिये कधीची ती ...
आज्जी आवसून त्याच्या कडे बघत होत्या
कोण रे तू
मी हीचा मित्र
कधी झाला मित्र..
हे काय आताच, ती बाहेर रडत होती ना तेव्हा..तो हसत
हो रे , कोण कुठला कुणाचा
मी हा बाजूचा... वाड्याकडे हाथ दाखवत
अच्छा अच्छा शिर्केंच्या घरचा तू ... बरं बरं ..पण काय रे दूध का आणलाय
अहो आज्जी तुम्ही हिला रागावला ना , दूध सांडले म्हणून ..
आज्जी डोक्यावर हात मारत ... अरे बाळा मी तिला त्यासाठी नाही रागावले, ती मंजरीची शेपटी ओढत होती, चावली असती म्हणजे ती तिला... म्हणून रागावले...
ओ अस आहे ... बरं मे सांगतो तिला असा नाही करायचे ते , तुम्ही तिला रागावू नका आता....
आजी मान हलवत हसत आतमध्ये निघून गेली..
बघ आता नाही रागवणार आज्जी तुला, मी म्हणालो ना ..
नंदू हसायला लागली
ये तुझं नाव काय ग ... आता आपण मित्र झालो ना
नंदिनी ... नंदू सांगते, पण सगळे मला नंदू च म्हणतात, तुझं नाव काय रे
श्रिराज...
श....श.. र... किती कठीण नाव आहे रे तुझं श...र...शरू..
अगं येईल, ठीक आहे शरू म्हणता येत ना तेच म्हण चालेल मला...
अशी त्या दोघांची मैत्री झाली
**********
नंदू ssss नंदू ssss , आम्ही निघालो ग .. ये लवकर ये ग ... आई रागवायची आता मला , शरू वाड्यात येत बोलला
ती नाही रे इथे, गेली असेल तिकडे कुठे उनाडक्या करायला.. आबा म्हणाले
ओ आबासाहेब काय हो सारखं सारखं तिच्या मागे लागता तुम्ही...शरू
नाहीतर काय घरात एक मिन म्हणून नसते ती, बांधूनच ठेवायला हवं...आबा मस्करित थोडा रागात बोलले
आबा साहेब बघा हा .... मोठा झाला की पळ लून च नेणार आहे मी ... काळजी घ्या नंदुची...म्हणत नमस्कार करत बाहेर गेला..
आला मोठा पळवानारा ... आबासाहेब हसायला लागले , नंडूच्या आजी बघा काय म्हणताय शहरातलं पोर ... म्हणत आजीआबा हसायला लागेल... त्यांना पण मुलांची माहिती होती.... खूप जीव लावतो हो शरू आपल्या बाळाला ... आजी आबा साहेबांना म्हणाल्या ..
ह्म्म... आबा साहेब
इकडे बाहेर शरू नंदुची वाट बघत उभा होता, आई त्याला घाई करत होतो , बस जायची म्हणून..
तो ५ मी ५ मी करत होता...
तो जायला वळणार तेवढयात नंदू तिथे धापा टाकत आली ...
कुठे गेली होतीस ग ...कधीच आवाज देतोय..
तिने तिचे हाथ उघडे आणि ३ कैऱ्या त्याला दिल्या, तुला खूप आवडतात न झाडावरच्या कैऱ्या...त्याच तोडायला गेली होती...
शरू ला हसू आलं... बरं चल येतो नेक्स्ट सुट्टीत, काळजी घे ... म्हणत तिला बाय करून निघाला..
************
असे हे नंदू शरू खूप जिवाभावाचे मित्र, जीव की प्राण एकमेकांचे.. शरू जरा जास्तीच तिचा लोभ करायचा, नेहमी तिच्या साठी तिच्या सोबत उभा असलेला ...
प्रत्येक उन्हाळ्यात सुट्टी त्यांची भेट असायची .. शरू आला इकडे की दोघं मिळून खूप धिंगाणा घालायचे, मस्ती करायचे, शेतावर खेळणं काय, चोरून आजी चा डब्ब्यातून खाऊ पळवा यचे काय, गायी म्हशी , कोंबड्या मांजरांच्या मागे मागे काय करायचे ... खूप धमाल घालायचे ..
आणि आता दोन्ही घरातल्यांना यांच्या बद्दल माहिती होते..
नंदू चा आबा च नी शरू च नेहमी नंदू वरून गोड वादावादी होत राहायची..नी मग तो प्रत्येक वेळ त्यांना धमकी द्यायचा तिला घेऊन जाण्याची....
असेच वर्ष जात होते, आता शरू १० ला होता त्यामुळे त्याला सुट्टीत यायल जमले नव्हते ...
१० वी चा परीक्षेनंतर तो आला , ... पण नंतर त्याला यायला जमले नाही, नंतर १२ , मग त्याचे इंजिनिअरिंग ...
इकडे नंदू त्याची सुट्टी वाट बघत बसायची .. दिवसेंदिवस तिच्या खोड्या, उचापती वाढतच होत्या ... ती पण शाळेत जायची.. मित्रमैत्रिणी चा गराड्यात रमायची, गावात नको नको करून सोडायची सगळ्यांना..
असे छान मजेत दिवस जात होते...
**********
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा