शेवटी बहिण आणि बायकोच्या वादात आपण भरडले जाऊ नये म्हणून सागरने या विषयातून अंग काढून घेत शांत राहणेच पसंत केले. पण घरातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला होता.
पुढे....
भाग 2
एका रविवारी अंबिका अचानक बॅग भरून माहेरी आली. त्या दिवशी घरात किरणने तिच्या आवडीनुसार लिव्हिंग रूमची थोडी सजावट बदलली होती आणि नवीन सोफा कव्हर्स घातले होते.
अंबिकाने घरात पाय ठेवताच कपाळावर आठ्या घातल्या आणि तोंड वाकडं केलं.
"हे काय वहिनी? हे कसले भडक रंगाचे कव्हर्स आणले आहेत? घरातली जुनी पद्धत किती छान होती! आई, तू कशाला वाहिनीच्या हातात घराच्या चाव्या आणि सर्व अधिकार दिले आहेत कोण जाणे!
"हे काय वहिनी? हे कसले भडक रंगाचे कव्हर्स आणले आहेत? घरातली जुनी पद्धत किती छान होती! आई, तू कशाला वाहिनीच्या हातात घराच्या चाव्या आणि सर्व अधिकार दिले आहेत कोण जाणे!
उद्या ही घरातल्या माणसांनाही बाहेर काढेल," अंबिका उपरोधाने आणि तिरकसपणे म्हणाली.
किरणने आजवर खूप सहन केले होते, पण आज अंबिकाने थेट तिच्या अस्तित्वावर आणि अधिकारावर बोट ठेवले होते.
किरणने आजवर खूप सहन केले होते, पण आज अंबिकाने थेट तिच्या अस्तित्वावर आणि अधिकारावर बोट ठेवले होते.
सागर नेहमीप्रमाणे गप्प बसला होता, तर सासू-सासरे संकोचात पडले होते. किरणने दीर्घ श्वास घेतला. तिने ठरवले की आता शांत राहणे म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाचा बळी देणे ठरेल.
किरण शांत पण अत्यंत ठाम आवाजात म्हणाली, "अंबिका ताई, बस झालं आता! आजपर्यंत तुम्ही जे काही बोललात, ते मी मोठ्या नणंद आहात म्हणून आदराने ऐकून घेतलं.
पण याचा अर्थ असा नाही की मला स्वतःची मतं नाहीत किंवा या घरावर माझा काही अधिकार नाही. मी या घरात सून म्हणून आले आहे, मोलकरीण म्हणून नाही. हे माझंही घर आणि माझाही संसार आहे."
अंबिका संतापाने लालबुंद झाली, "तुझी एवढी हिंमत? तू मला माझ्याच घरात शिकवतेस?"
त्यावर किरण पुढे म्हणाली, "ताई, हे तुमचं माहेर आहे, तुमचा हक्क नक्कीच आहे. पण माहेराचा हक्क गाजवताना भाऊ आणि वहिनीच्या संसारात ढवळाढवळ करू नये.
तुम्ही स्वतःच्या सासरी सासू-सासऱ्यांना विचारल्याशिवाय एक गोष्ट तरी बदलू देता का? मग माझ्या घरात येऊन मला सतत कमी लेखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?"
अंबिकाने लगेच आई-वडिलांकडे पाहिले आणि रडायला सुरुवात केली, "आई, बघ कशी बोलतेय ही माझ्याशी! सागर, तू काही बोलत का नाहीस?"
तेव्हा अनपेक्षितपणे सासू लक्ष्मीबाई पुढे आल्या. त्या मायेने पण ठामपणे म्हणाल्या, "अंबिका, किरण जे बोलतेय ते १०० टक्के खरं आहे. तू आमची मुलगी आहेस, तुझं या घरावर नेहमी प्रेम राहील.
पण किरण या घराची सून आणि लक्ष्मी आहे. तिचा स्वाभिमान आणि तिचे निर्णय जपणे हे आमचे कर्तव्य आहे.
तू सारखं तिच्या संसारात ढवळाढवळ करणं आम्हालाही मान्य नाही." सासरे देवप्रसाद यांनीही लक्ष्मीबाईंच्या शब्दांना दुजोरा दिला. आपल्याच घरात सर्वांनी वहिनीची बाजू घेतलेली पाहून अंबिकाचा अहंकार दुखावला आणि ती रागाने पाय आपटत तडक निघून गेली.
