नणंद येता घरी (भाग 1l

किरणचे लग्न सागरसोबत होऊन दोन वर्षे झाली होती. सासू लक्ष्मीबाई आणि सासरे देवप्रसाद अतिशय प्रेमळ व समजूतदार स्वभावाचे होते.
भाग 1

​किरणचे लग्न सागरसोबत होऊन दोन वर्षे झाली होती. सासू लक्ष्मीबाई आणि सासरे देवप्रसाद अतिशय प्रेमळ व समजूतदार स्वभावाचे होते.

किरणनेही अल्पावधीतच आपल्या प्रेमळ स्वभावाने व कष्टाने संपूर्ण घर आपलंसं केलं होतं. संसाराची गाडी अत्यंत सुरळीत व आनंदाने चालू होती. परंतु, या गोड संसारात एकच गोष्ट वारंवार मिठाचा खडा टाकत होती—ती म्हणजे सागरची मोठी विवाहित बहीण, अंबिका.

​अंबिकाचे लग्न होऊन चार वर्षे झाली होती, तरीही तिचे पाय सासरी कमी आणि माहेरीच जास्त असायचे. आठवड्यातून दोन-तीन दिवस ती न चुकता माहेरी हजर असायची.

माहेरी येणे गैर नव्हते, पण तिचा स्वभाव असा होता की घरात पाय ठेवल्यापासून प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीत तिची अवाजवी हुकमत सुरू व्हायची.

किरणने स्वयंपाक कसा करावा, घरात पडदे कोणते लावावे, किराणा कुठून आणावा, अगदी सागरने किरणला कुठे फिरायला न्यावे आणि किती खर्च करावा, यातही अंबिकाची नाक खुपसण्याची सवय होती.

​"वहिनी, भाजीमध्ये मीठ जरा कमीच वाटतंय... आणि हे काय, महिना संपायच्या आतच एवढा किराणा कसा काय संपला? आमच्या वेळी आई अगदी हिशोबाने घर चालवायची,"

असा तिचा रोजचा टोमणा असायचा. किरण अनेकदा मनातल्या मनात वाईट वाटून घ्यायची, पण सासरची शांतता भंग होऊ नये म्हणून गोड हसून गप्प बसायची.

​एके दिवशी देवप्रसाद आणि लक्ष्मीबाईंनी अंबिकाला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. "अंबिका, बेटा, आता तुझं स्वतःचं एक घर आहे, सासर आहे. माहेरी नक्की ये, पण किरण आता या घराची सून आहे.

तिला तिच्या पद्धतीने घर चालवू दे. सतत प्रत्येक गोष्टीत बोलणं योग्य नाही."
​हे ऐकताच अंबिकाचे डोळे पाणावले. तिने लगेच भावनिक अस्त्र बाहेर काढले,

"बरं झालं आई, आज स्पष्टच बोललीस! म्हणजे लग्न झालं की मुलगी लगेच परकी होते हेच खरं ना? आता माझं माझ्याच माहेरच्या घरावर काही हक्क उरला नाही का? मी तुमच्या भल्यासाठी बोलले तर मीच वाईट ठरले!"

​अंबिकाचा हा तमाशा बघून आई-वडील हतबल झाले. सागरनेही सुरुवातीला तिला समजावले, "ताई, आई-बाबा तुला परकं नाही म्हणत आहेत, फक्त मर्यादा समजून घे." पण अंबिकाने सागरलाही "बायकोचा पदर धरून बोलतोस" म्हणून सुनावले.

शेवटी बहिण आणि बायकोच्या वादात आपण भरडले जाऊ नये म्हणून सागरने या विषयातून अंग काढून घेत शांत राहणेच पसंत केले. पण घरातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला होता.

माहेरची ओढ की अवाजवी ढवळाढवळ?

Stay tuned....

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →