मागच्या भागात आपण पाहिलं कि संसाराचा गाडा रेटताना सई आणि समीरची होणारी ओढाताण आणि त्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करणारे त्यांच्या घरातले. त्या सगळ्यात खराब होत चाललेलं सई समीरचं नातं.... ते सावरू शकतील का? पाहूया ह्या भागात.
आजची सकाळ त्यांच्या घरात काहीशी वेगळी उगवली. रविवार असल्यामुळे घरातले सगळेचं उशिरापर्येंत झोपलेले होते. सोनाली आणि मनीषचं नवीन लग्न झाल्यापासून अलिखीतपणे त्यांनी बेडरूमवर ताबा मिळवला होता. घरात वाद नकोत म्हणून ही गोष्टही सईने समजुतीने घेतली होती. ते दोघे आणि बाळ स्वयंपाक घरात झोपत. सासूबाई आणि सासरे दिवाणखोलीत झोपत. सईला दिवसाभरातील सगळं समीरला सांगावं वाटे. त्याच्या कडून दोन गोष्टी ऐकाव्या वाटत पण जागेच्या अभावाने दोघांमध्ये काही बोलायचं झालं तरी हलक्या आवाजात बोलावं लागे. नाहीतर सासूबाई तांब्याभांडं वाजवून त्यांच्या जवळचं असण्याची आठवण करून देत. प्रेमाच्या कित्येक रात्री त्यांनी अश्या विरहात घालवल्या होत्या.
आज सईला सुद्धा उठायला उशीरचं झाला. नेहमी पाचच्या ठोक्याला उठणारी ती आज आठ वाजले तरी उठली नव्हती हे पाहून सासूसासऱ्यांचा पारा चढला होता. सकाळपासून चहा पाणी काहींचं नं मिळाल्यामुळे त्यांची जास्त चिडचिड होत होती. सईने घड्याळात आठ वाजल्याचं पाहिलं आणि भितीमुळे तिचा चेहरा पांढरा फटक पडला. आज आपली काही खैर नाही असं समजून ती घाईघाईनं उठली. केसांचा बुचडा बांधून झटकन आन्हिकं आवरायला गेली. अंघोळ वैगरें उरकून चहा नाश्ता बनवायला तिने सुरुवात केली. एकीकडे बाळाच्या पाळण्याला झोका देत होती. बाहेरच्या खोलीत सोनाली सासूबाईंसोबत बसून पेपर वाचण्यात मग्न होती. "नव्या नोकरीसाठी प्रयत्न करतेय म्हणून पाहतेय पेपरमध्ये काही जाहिरात दिसते का ते..." असं पटेल असं कारण सांगून तिने कामापासून काढता पाय घेतला होता. सासूबाईंनासुद्धा आपल्या ह्या नव्या सुनबाईवर खूप विश्वास होता.
इकडे सईची एकटीची होणारी धावपळ पाहून समीरला जरा वाईट वाटलं. तो मागच्या आठवड्यापासून तिचं निरीक्षण करत होता. लग्नानंतरची सई अन आत्ताची सई कित्ती बदलली नं. छानशी हसणारी, आपल्या लांबसडक केसांची नेहमी नवीनवीन केशरचना करणारी, स्वतःच्या शरिराकडे आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणारी आनंदी सई त्याला जास्त आवडत होती. पण आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या उचलून पोक्तपणा आलेली सई त्याला जास्त डागणी देत होती. मनोमन काहीतरी विचार करून समीरने आज तिला आराम द्यायचं ठरवलं. पहाटे तिच्या नकळत त्याने तिचा गजर बंद केला होता आणि त्यामुळेच सईला जाग आली नव्हती. तिचे हात सवयीप्रमाणे स्वयंपाकघरात झरझर चालत होते. चहा नाश्ता देऊन झाला होता आता तिने दुपारच्या जेवणाची तयारी सुरु केली होती. आज रविवार म्हणजे सग्ळ्यांना काहीतरी स्पेशल हवं असायचं. त्यामुळे तिचा मात्र अगदी पिट्टा पडत असे. तिने आज बिर्याणी आणि रायता बनवायचं ठरवलं होतं. ती भाज्या चिरत होती. इतक्यात समीर तिथे आला.
"राहू दे सगळं चल आधी बाहेर मला सगळ्यांशी काही तरी बोलायचं आहे आणि त्यावेळी मला तू पण तिथे हवी आहेस." असं म्हणून समीर सईला स्वयंपाकघरातून बाहेर दिवाणखान्यात घेऊन आला.
"आई अण्णा, वहिनी मनीष मला तुमच्या सगळ्यांशी जरा महत्वाचं बोलायचं आहे." समीर म्हणाला तशी सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा सईवर खिळल्या.
"तिच्याकडे पाहू नका खरंतर तिलाही ठाऊक नाही कि मी काय सांगणार आहे. गेले कित्येक दिवस मी बघतोय सईला घरात नीट वागणूक मिळत नाहीए. ती ह्या घराची मोठी सून आहे. लक्ष्मी आहे. तिने आपल्या सगळ्यांसाठी तिच्या शिक्षणाचा, करिअरचा त्याग केला आहे पण जो तो आपल्या विश्वात इतका मश्गुल आहे की कोणी तिला माणूस म्हणून समजून घ्यायलाही तयार नाही.”
समीरच्या डोळ्यात सईबद्दलचं प्रेम दिसत होतं.
त्याचं बोलणं मध्येंच तोडत सासूबाईंनी बोलायला सुरुवात केली.
"हे आणि काय नवीनचं नाटक आहे? घरातली कामं करते म्हणून काय झालं? जर सोनाली बाहेर नोकरी करते तर हि घरातलं बघते त्यात काय गैर आहे रे? ती घरची सून आहे तिने नाहीतर कोणी करायची कामं? जबाबदारी घ्यायलाचं हवी ना आता..." त्यांचा पारा चढला होता.
"अहो हे काय लावलयं तुम्ही आज? मी कधी कसली तक्रार केलीये का तुमच्यापाशी मग कशाला भांडण काढताय भरल्या घरात." सई भीतीने कापत समीरला म्हणाली.
"हे बघ घाबरू नकोस मला जे डोळ्याने दिसलं ते बोललो. मला एवढंच वाटतं कि आपण सगळे एका छताखाली एकत्र राहतो तर कामाची वाटणी सुद्धा सामान असावी. म्हणजे प्रत्येकाला मोकळा वेळ मिळेल. आता स्पष्ट बोलतो, सोनाली वहिनीने सईला कामात जरा हातभार लावला तर तिलाही जरा उसंत मिळेल. निदान शनिवार रविवारी सुट्टी असताना तरी..." समीर बोलायचा थांबला.
"बापरे आता हे सगळं फिरून माझ्यावर येऊन ठेपल का? मला नाही हो जमायचं हे सगळं घरकाम वैगरे. मला ते आवडत नाही आणि जमतीसुद्धा नाही. मी बाहेर जाऊन पैसे कमावून आणतेच ना मग घरचं वहिनींनी बघावं." इतका वेळ पेपर मध्ये डोकं खुपसून बसलेली सोनाली फटकन म्हणाली.
"बरोबर आहे वहिनी तू पैसे नक्कीच मिळवतेस पण घरातून तुला पाठिंबा आहे म्हणूनच ना? सकाळी उठल्या बरोबर हातात आयता मिळणारा वाफाळता चहा असो किंवा सुग्रास जेवणाचा डबा! सगळं आपोआप मिळतंय म्हणून तर तुला नोकरी करणं सुकर आहे." आज समीरने आपलं म्हणणं लावून धरलं होतं. सईने डोळ्याला पदर लावला होता.आपल्यामुळे घरात वाद नकोत असं वाटून तिने समीरला हरप्रकारे गप्प करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला होता.

.....क्रमशः
पुढील भागात आपण पाहुया कि समीर ह्या सगळ्यावर काही उपाय काढू शकतो का? सईची बाजू घेतील का बरे कोणी समजून? आपली चूक सोनालीला पटेल का? बघूया!!
©️®️सायली पराड कुलकर्णी
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने