"सईssss आज पण माझी आठ पस्तीस चुकणार वाटतं. डबा झाला का नाही? उशीर होतोय मला निघायला!" समीर उच्च स्वरात तिच्यावर ओरडलाचं.
"आले आलेssss" म्हणत कमरेभोवती गुंडाळल्या मळकट ओढणीला हात पुसत एका हातात समीरसाठी बनवलेला जेवणाचा डबा सावरत सई स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर घामाचे टप्पोरे थेंब जमा झाले होते. समीरच्या हातात डबा ठेवून त्याचं पावली ती परत मागे फिरली. एकीकडे टीव्ही ढणढण आवाजात सुरु होता. त्या आवाजाने तिचं डोकं भणभणत होतं. दुसरीकडे सासूबाईंचं चहा साठी आवाज देणं थांबत नव्हतं. ओढणीनेचं नकळतपणे तिने कपाळावर आलेला घाम टिपला आणि वेगानं स्वयंपाकघरात गेली. गॅसवर बाळासाठी खीर करायला ठेवली होती आणि दुसऱ्या गॅसवर पालकाच्या भाजीलाही चांगली रटरटून वाफ आली होती. तिने वाफ मुरावी म्हणून झाकून ठेवलेला चहा कपात ओतला आणि सासूबाईंना नेऊन दिला. सोबत बशीत तूप पोळीचे दोन रोलही सरकवले.
ह्या सगळ्या धांदलीत समीर मात्र आजही नाराजीनेचं पोटात काहीचं नं घालता रिकाम्या पोटी बाहेर पडला. त्याला वाटायचं काहींनाही तरी किमान सईने नीटनेटकं राहावं. त्याला कामावर जाताना हसून बाय करायला लिफ्ट पर्यंत तिने यावं. मग जाताजाता एखादा ओझरता स्पर्श झाला कि कसं अंगावरून मोरपीस फिरवल्या प्रमाणे वाटेल. दिवस अख्खा सुखद जाईल. पण हे वास्तवात काही घडत नव्हतं. त्याला कारणं पण तशीच होती. मुंबईत लहानश्या वन बीएचके फ्लॅट मध्ये ते सात जण राहायचे. समीरचे आईवडील आताशा थकले होते त्यामुळे वरचेवर गावाला जाणारे तेही आता कायमस्वरूपी त्यांच्याकडे मुंबईतचं स्थायिक झाले होते. सई, समीर त्यांचं सहा महिन्याचं छोटं बाळ, सईचे सासू सासरे, दीर आणि आता नव्याने लग्न करून आलेली धाकटी जाऊ असं त्यांचं एकत्र कुटुंब एका छताखाली नांदत होतं. ऍडजस्टमेन्ट ह्या शब्दाभोवती तिचं सारं विश्व फिरत होतं. त्या कशाबद्दलचं सईची कधीच काहीचं तक्रारही नव्हती. समंजसपणा तिच्यात आपसूकचं होता. पण सासरच्या संसाराच्या रगाड्यात नवऱ्याच्या सोबत दोन सुखाचे क्षण आपल्यालाही मिळावेत असं तिला वाटायचं. पण भोवती पसरलेला सगळा जबाबदाऱ्यांचा डोंगर तिचं लक्ष वळवून घ्यायचा.
सई लग्न करून आली आणि लगोलग संसारात रमली पण नव्या आलेल्या जाऊबाई तश्या नव्हत्या. सईची छोटी जाऊ मुंबईतलीचं होती. चांगली शिकलीसवरलेली होती. तिने लग्नाआधीचं बऱ्याचश्या गोष्टी करण्याला स्पष्टपणे नकार दिला होता. किंबहुना तिने ते त्यांच्याकडून वदवुनचं घेतलं होतं. तिचं नाव सोनाली. सोनाली नाव असलं तरी चेहऱ्याने आणि स्वभावानेही ती अगदींच जेमतेम होती. सोनाली आणि मनीषचा प्रेमविवाह असल्याने कोणाला फार काही हस्तक्षेप करताचं आला नाही.
सईने त्याही बाबतीत ऍडजस्ट करून घेतलं. नव्या जावेला मोकळीक द्यायची ठरवलं. आपल्या लहान बहिणीसारखी तिच्याशी हिचा व्यवहार असायचा. पण हे सगळं बऱ्याचवेळा एकतर्फी असायचं. खरंतर सईचं बाळ लहान होतं. अजून अंगावर प्यायचं त्यामुळे तिला सारखं बाळाला घ्यावं लागे. आपणहून सोनालीने काही तरी काम करावं असं सईला वाटत असायचं पण ह्या कशाचा परिणाम सोनालीवर होत नव्हता. ती आपली आपल्याच नादात असायची. त्यात ती सकाळी दहा ते संध्याकाळी सात नोकरीला जायची. त्यामुळे तिला आपसूक घरात आणि बाहेर किंमत असायची. उलट सोनालीला वाटायचं की सईने तिलाही सकाळी जेवणाचा डबा तयार करून द्यावा.
बाहेर जाऊन नोकरी नं करणाऱ्या त्या सईला सारे गृहीत धरत. ती काय घरींच असते त्यामुळे करेल ती असं ज्यावेळी घरातलं कोणी म्हणे त्यावेळी तिला अगदी लाजिरवाणं वाटे. आपण आपल्याचं हाताने स्वतःची किंमत कमी करतोय हे तिला पदोपदी जाणवायचं पण आपण बाहेर पडलो तर आपल्या चिमुकल्या बाळाकडे कोण पाहिल असा विचार येऊन ती शांत राहत असे. दिवस सरत होते. परिस्थिती बदलत नव्हती. बाळ आता मोठं झालं होतं. त्याच्या सुखद बाललीला बघताना सई मोहरून जायची. तिचं बाळ हे तिच्या साऱ्या दुःखावरचं मलम होतं. समीर आणि तिच्या नात्यातला रोमांस तर आता अगदींच कमी झाला होता.
आपलं एक कुटुंब आहे आणि त्यातली माणसं आपल्यावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठीचं आपलं जगणं समर्पित करणाऱ्या त्या जोडप्याचा साधा विचारही कोणी करत नसे.

....क्रमशः
पुढच्या भागात आपण पाहूया की समीर आणि सई ह्यातून काही मार्ग काढतील कि त्यांच्या संसाराची आहुती देतील....
©️®️सायली पराड कुलकर्णी
©️®️सायली पराड कुलकर्णी
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने