भाग -9
डॉक्टर आत जातात, मीनाताई डोळे बंद करून असतात, " काय ताई काय झालं..? " डॉक्टर मीनाताईंच्या जवळ बसत बोलतात.
डॉक्टरांचा आवाज ऐकुन मीनाताई डोळे उघडतात, "नाही ते बोलता बोलता अचानक काय झाले कळलेच नाही." मीनाताई बोलतात.
" असूदेत मी पाहतो काय झालंय ते, तुम्ही लांब श्वास घ्या." आणि डॉक्टर स्टेटसस्कोप ने मीनाताईंना चेक करतात.
फार बारकाईने मीनाताईंना चेक करतात, " झोप होते का नीट ? " डॉक्टर विचारतात.
मीनाताईंचे डोळे आत गेले होते आणि डोळ्या खाली काळी वर्तुळे आली होती.
" हो डॉक्टर.. " मीनाताई हळूच बोलतात.
" हो डॉक्टर.. " मीनाताई हळूच बोलतात.
" नाही डॉक्टर, आज काल हिला जरा ही झोप नाही. मी कितीवेळा पाहिलंय, कसल्या तरी सतत विचारात असते. " सावंत पटकन मध्ये बोलतात.
" काय टेन्शन कसलं घेतलंय का ? कामाचा ताण घेत आहात की काय ?" डॉक्टर विचारतात.
" हो तर आहे की टेन्शन, आणि कामाचा ताण तर विचारूच नका. आम्ही नाही केलं तर पान हलत नाही ना. " सावंत भडाभडा बोलत होते.
" अहो काही काय बोलताय, मी कुठे कामाचा ताण घेते उलट आरामच आहे मला. " मीनाताई सावंतांना शांत करत.
" बरं बरं, तुम्ही आराम करता पण ह्या पुढे ही आरामच करायचं आहे. कारण ब्लड प्रेशर वाढला आहे, पण असूदेत ताण काही असेल तर कमी घ्या एवढंच सांगेन मी. " आणि डॉक्टर एक प्रिसक्रेपशन लिहून विशालच्या हातात ठेवतात.
" ह्यात काही औषधं आणि टेस्ट लिहल्या आहेत त्या मात्र करून घ्या, बाकी रिपोर्ट आले की पाहु. " डॉक्टर बोलतात.
" बरं डॉक्टर काही नाजूक काही नाही ना ?" विशाल मात्र काळजी म्हणुन विचारतो.
" नाही नाही रिपोर्ट येऊ द्या, मग पाहूया. " डॉक्टर समजावत.
तेवढ्यात सावंत खिशातुन पैसे काढतात आणि डॉक्टरांच्या हातात देतात, तेवढ्यात विशाल अडवतो, " अहो बाबा काय करताय, मी देतो की तुम्ही कशाला..? "
"नाही नको उगाच आपल्यामुळे कुणाला कशाला त्रास !" सावंत मीनाताईंच्या आजारी पडण्याने खचून जातात.
" अअअअअ मी निघतो.. " आणि डॉक्टर कसे बसे तिथून निघतात.
काही वेळाने
संगीता किचन मध्ये असते तेवढ्यात विशाल, " अगं तुझ्या अकाउंट मधुन मला काही पैसे हवेत, आईला उदया टेस्ट ला घेऊन जातो. " हे ऐकताच संगीताच्या डोक्याचा पारा चढतो.
संगीता किचन मध्ये असते तेवढ्यात विशाल, " अगं तुझ्या अकाउंट मधुन मला काही पैसे हवेत, आईला उदया टेस्ट ला घेऊन जातो. " हे ऐकताच संगीताच्या डोक्याचा पारा चढतो.
" का...? म्हणजे तु का घेऊन जाणार..? आणि पैसे कशाला त्यांच्या जवळ नाही का..? रिटायर्ड नंतर इतक्यातच खिसा खाली झाला का..? " संगीता बोलते.
" अगं काही काय बोलतेस, खिसा खाली असो वा नसो माझं कर्तव्य आहे की म्हणुन मागतोय.. " विशाल बोलतो.
" हे बघ विशाल त्यांना म्हणावं तुम्ही तुमचं बघा, आणि तस ही आपल्या कडे राहतात हेच खुप जास्त आहे. " संगीता बोलते.
संगीताच हे बोलणं सावंत ऐकतात, " आम्ही राहतो म्हणजे, आम्ही आलो नाही इथे. कसे आलो.. का आलो... कोणत्या परिस्थिती आलो.. हे सगळं विशाल तुला आणि तुझ्या बायकोला चांगलंच माहित आहे ना..? " सावंतांच्या रागाचा पारा चढतो.
सावंतांचा आवाज ऐकुन मीनाताई किचनमध्ये येतात, " अहो सावंत काय झालं...? असे चिडले का आहात..? " मीना ताई थकलेल्या आवाजात विचारतात.
" तु का आलीस उठुन..? अगं किती थकवा आलाय बघ. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे ना, आणि तु नको लक्ष देऊ. " सावंत बोलतात.
" घ्या आल्या, आता काय नवीन..? " संगीता केसाची बट पाठी करत तोंडातल्या तोंडात कुजबुजते.
" काय म्हणालीस संगीता..? अगं वाद का करतेस..? " मीनाताई थकलेल्या आवाजात बोलतात.
" अगं आई काही नाही तु आराम कर जा बरं, आणि संगीता इतकं तापण्या सारखं काय झालं. जो काही विषय आहे तो तु नीट शांतपणे आपापसात बोलू शकतेस." विशाल बोलतो.
संगीता चिडून बाल्कनीत जाऊन उभी राहते.
संगीता चिडून बाल्कनीत जाऊन उभी राहते.
