Login

आई बाबा रिटायर्ड होत आहेत भाग -8

कौटुंबिक कथा

भाग -8

" तुला राग येईल पण ह्या सगळ्या गोष्टी करायची तुला गरज आहे का ? अगं घरात मोलकरीण आज आली नाही तर सगळं तुच करायची गरज काय आहे..? " सावंत रागात बोलतात.

सावंतांचा राग मीनाताईंच्या लक्षात येत होता, पण करणार तरी काय..?

मीना ताई त्यांच्या बाजुला हळूच बसतात, " अहो इतकं रागवायची गरज काय आहे..? आणि हे परक्याचं घर थोडी आहे की काम नाही करायला. माझं आपलं घर आहे, मग करायला काय हरकत मला सांगा..? " मीना ताई समजावतात.

सावंत मीनाताईंच्या बोलण्यावर हलक्या आवाजात उत्तर देतात, " मीने अगं आपलं घर नाही हे, आपलं घर म्हणायला आहे तरी काय इथे..? अपमान फक्त."

सावंतांच हे बोलणं मीना ताईंच्या मनाला चटका लावुन जातं, " अहो असे काय म्हणताय, आपलाच मुलगा आहे ना तोह..? "
मीना ताईंचा आवाज अगदी रडवलेला होतो.

सावंत तिच्या हातावर हात ठेवतात, तिच्या कडे समजुतीने पाहतात, " आपला मुलगा आहे, पण मुले लहानपणीच आपली असतात. मग मोठी झाली की त्यांना पंख फुटतात आणि उडून जातात. मग घरटे राहते फक्त रिकामी." आणि सावंत स्वतःचे डोळे फुसतात.

" अहो... अहो.. " मीना ताई कळवळीने जोरात ओरडतात आणि पलंगावर बेशुद्ध पडतात.
सावंतांच्या हातातला मीनाताईचा हात सुटतो, " मीने... अगं... मीने काय झालं.. अगं... अगं.. " सावंत जोरजोरात आवाज देत मीनाताईला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण मीनाताई शुद्ध हरपून पडतात.

सावंतांचा आवाज ऐकुन विशाल आणि संगीता धावत हॉल च्या रूम मध्ये येतात, आईला सोफ्यावर बेशुद्ध पडलेलं पाहुन विशाल घाबरतो, " बाबा अहो काय झालं आईला, अशी बेशुद्ध का पडली ? " विशाल घाबरत मीना ताईंना उठवण्याचा प्रयत्न करतो.

"मलाच माहित नाही रे काय झालं ? बोलता बोलता शुद्ध हरपली तिची." अस बोलुन सावंत रडू लागतात.

" थांबा मी आईला आत बेडरूम मध्ये घेऊन जातो, आणि संगीता डॉक्टरांना तडक कॉल कर आणि तातडीने बोलावून घे. " अस बोलुन तो मीनाताईंना उचलून आत रूममध्ये घेऊन जातो.

" आता काय धाड भरली म्हातारीला, मगाशी तर चांगली होती. " संगीता तोंडातल्या तोंडात पुटपुटत डॉक्टरांना कॉल लावते.

काही वेळाने

मीनाताई कशाबशा शुद्धीवर येतात, " मीने अगं, काय झालं..? बोलता बोलता अशी बेशुद्ध का पडली..? काय झालं..? " सावंत कळवळीने विचारतात.

" अहो काही नाही, मलाच कळलं नाही. तुम्ही नका काळजी करू, मी ठीक आहे आता. " मीनाताई कशाबशा स्वतःला सावरत बोलतात.

" असं कस ठीक आहे, विशाल ने डॉक्टरांना बोलावलंय ते येतील इतक्यात. " सावंत मीनाताईंना सांगतात.

"काय.. अहो कशाला..? तुम्ही ना थोड्या थोड्या साठी काळजी करत असतात. मी सांगतेय ना मी ठीक आहे करून.." मीना ताई समजावत बोलतात.

" आई अगं हट्ट का करतेस, कळेल तरी का चक्कर आली ते. काही असेल तर औषधं चालु करूयात, तु नको हट्ट करुस. "

तेवढ्यात दारावरची बेल वाजते, " डॉक्टर आलेत वाटतं! मी आलेच.. " असं बोलुन संगीता दार उघडायला बाहेर जाते.

संगीता दार उघडते, " या... या... डॉक्टर, बरं मी काय म्हणते माझ्या सासूबाईंना बर नाहीये म्हणुन तुम्हाला बोलावलं. पण जास्त खर्चाच काही सांगु नका हा... " संगीता दबक्या आवाजात हळूच डाक्टरांना सांगते.

" अहो पण मी खोटं कस बोलणार, पेशंट चा जीव महत्वाचा नाहीतर माझ्यावर येईल सगळं. " डॉक्टर विचारात पडतात., " आणि तुम्ही मला खोटं का बोलायला लावतायत..? "

" अहो डॉक्टर काय सांगणार... जाऊदे मी जे सांगितलंय ते फक्त लक्षात ठेवा आणि जमल्यास थोडं खोटं बोललात तर बरं होईल.. " संगीता जीभ चावत बोलते.

तेवढ्यात विशाल बाहेर येतो, " अगं संगीता बाहेर बोलत काय बसलीस, तिथे आईला बर नाहीये आणि तु गप्पा करण्यात दंग आहे. " विशाल जरा ओरडतच बोलतो.

" नाही ते.अअअ.. ते मी.. " संगीता विशालचा आवाज ऐकताच अडखळते.

" तु अ.. आ... ई.. करत बस, डॉक्टर तुम्ही चला पाहु आधी. " आणि विशाल डॉक्टरांना घेऊन जातो.

क्रमश...




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →