ओढ मनाची....

ओढ मनाची
ओढ मनाची


का हुरहूर मनाला वाटे
का भिती मनात दाटे

डोळ्यात अश्रूं धारा दाटती
मना सुख- दुःख न समजती

किती दिवसांची ओढ भेटण्याची
डोळे भरून तुम्हाला पाहण्याची

ना करी खोट काही तरी
भिती मनाला छळते तरी

दिसता जरी व्हिडिओ वरी
मना ओढ पाहण्याची तरी

कसे बंध देवाने जुळवले
नात्यांचे पाश कसे मिळवले

का मनाची ओढताण होई
कशी होऊ मी उतराई

©® वीणा








0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →