माझंच काय ते चुकलं - 5
कमला तिच्या कामावरच्या गोष्टी मोठं तोंड भरून कौतुकाने तिला सांगत होती. सुनीता पण तिचं ऐकून भारावून जायची.
आपल्याला काम मिळणार मग आपण हे करू ते करू. घरात काय काय घ्यायचं याची तर लगेच मनात यादी तयार झाली तिच्या. छोट्या वैश्यूसाठी तिने खूप स्वप्न बघितलेली होती, ती आता पूर्ण करता येईल; म्हणून जोमाने कामाला लागायचे. मनात काय काय ठरवून ती कमला बरोबर कामाच्या ठिकाणी पोहचली सुद्धा.
भली मोठ्ठी बिल्डिंग, डोकं वर करून बघायलाही जमेना इतकी मोठ्ठी. वॉचमन कमलाच्या ओळखीचा झालेला होता; त्यामुळे त्याने आत लगेच सोडलं दोघींना.
"कमला, किती मोठी आणि स्वच्छ आहे ही बिल्डिंग."
सुनीता ते सगळं बघूनच चाट पडली होती.
सुनीता ते सगळं बघूनच चाट पडली होती.
"हो तर, आत जाऊन बघ ह्या मोठ्या लोकांची घरं किती चकाचक असतात ते. जरा सुद्धा इकडची काडी तिकडं चालत नाही ह्यांना. म्हणून तर आपल्याला काम मिळतय इकडे."
"व्हय व्हय.. मी पण चांगल काम करीन."
असे म्हणून ती कमला ज्या दिशेने जाईन त्याच दिशेने वळत होती.
असे म्हणून ती कमला ज्या दिशेने जाईन त्याच दिशेने वळत होती.
कमला तिला एका घरात घेऊन गेली. तिथे सगळं अगदी काचेसारख स्वच्छ दिसतं होतं. कमला म्हंटली अगदी तसेच.. इकडची काडी तिकडे नव्हती. घर अगदी लखलखत होते.
सुनीताला आता काम मिळाले होते,
कामावरून येताना कधी कधी उशीर व्हायचा, पण त्यातही ती भरभर आवरून वैशुच्या ओढीने लवकर घरी जायची. तिचं काम आवडत होतं सगळ्यांना; त्यामुळे आणखी दोन घरची कामं करण्यासाठी तिला बोलावलं होतं.
कामावरून येताना कधी कधी उशीर व्हायचा, पण त्यातही ती भरभर आवरून वैशुच्या ओढीने लवकर घरी जायची. तिचं काम आवडत होतं सगळ्यांना; त्यामुळे आणखी दोन घरची कामं करण्यासाठी तिला बोलावलं होतं.
महिना होतं आला होता, आज तिला तिचा पहिला पगार मिळणार; म्हणून ती सुद्धा खुश होती. मिळणाऱ्या पैशातून काय काय खरेदी करायची हे तिचं आधीच ठरलेलं होतं.
पगारातल्या पैशातून घरी जातांना तिने सगळ्यांसाठी जिलबी आणि चार भजी बांधून घेतली होती. बाळाला टोपड घेतलं, थंडीत तिला कानाला बांधायला होईल म्हणून. सासूबाईंसाठी एक चोळीच ब्लाऊज घेतलं. घरासाठी काही वाण सामान घेतलं, पहिल्यांदाच.. ते ही रोखीने. स्वतः साठी मात्र काहीच न घेता ती घरी परतत होती. आज दिवसभर काम करून ती सुद्धा थकून भागून घरी आली होती.
घरात बघते तर सगळा पसारा करून ठेवलेला होता सासूबाईंनी. जेवलेली भांडी तशीच खाली पडून होती. छोटी वैशु झोक्यात रडत पडली होती. सगळीकडे अस्ताव्यस्त झालेलं घर बघून तिला ते मोठ्ठ्या बिल्डिंग मधले तिच्या नव्या मालकीनीचे घर आठवले. तिथे कसं सगळं अगदी टापटिप होतं.. आणि एक आपलं घर. जिथे भिंती म्हणून चार पत्रे उभे केलेले. त्यातच न्हाणी आणि त्यातच सैपाक घर. तिला तिच्या स्वतः च्याच नशिबावर खूप वाईट वाटतं होते. पण घरची परिस्थिती आपण बदलायला हवी. असे म्हणून तिने पटापट आवरायला घेतलं.
सगळं घर स्वच्छ झाडून घेतले. पाणी भरले, भांडी घासून ठेवली आणि वैशीला जवळ घेत तिने आणलेला खाऊ तिला भरवला. सासूबाईंना पण एका प्लेट मध्ये दिला आणि आणलेली चोळी त्यांच्या हातावर ठेवली. त्या सुद्धा ते बघून खुश झाल्या.
"अरे वाह, आज पगाराच्या दिवशी चांगली कमाई झालेली दिसतेय."
सासूबाई बोलत बोलतच खात होत्या.
सासूबाई बोलत बोलतच खात होत्या.
इतक्यात राकेशच्या सायकलीचा आवाज आला. त्यालाही दोन तुकडे जिलबी प्लेट मध्ये भरून तिने बाजूला काढून ठेवले. अजून तिचा सैपाक बाकी होता. वैशुला एका बाजूला बसवून तिने सैपाक बनवायला घेतला.
राकेश घरात येताच त्याच्या हातात जिलबीची प्लेट दिली. तो ही खुश झाला. खाऊन झाल्यावर तिथून उठणार तोच सुनीता जवळ आली.
"हे घ्या."
त्याच्या हातात पैशाची गुंडाळी देत सुनीता बोलली.
त्याच्या हातात पैशाची गुंडाळी देत सुनीता बोलली.
पैशाकडे बघून राकेशची नियत बदलली. चुपचाप ते पैसे घेऊन तो फरार झाला.
"हम्म्म ठीक आहे."
असे म्हणून ती पैशाची गुंडाळी खिशात ठेवत राकेश पुन्हा बाहेर निघून गेला. तो उशिराने घरी आला ते पिऊनच. त्याला धड चालताही येत नव्हते. सुनीताला वाटले आज हातात पैसे दिले म्हणून पिले असणार. जाऊ दे असं म्हणत तिने त्याला सहारा दिला आणि आत घेतले.

सुनीताचे काम आता चांगले सुरू झाले होते. घरात चार चांगल्या वस्तू येत होत्या, खायला प्यायला मालकीण देत होती. वापरलेले पण चांगल्या अवस्थेत असलेले कापडे मिळतं होती. तिच्यावर खुश होतं सासूबाई सुद्धा मागे पडलेली तिची कामं आवरून घेऊ लागल्या.
पण राकेशच हल्ली सगळं बिघडलं होतं. तो कधी कधी कामावर जायचा नाही, कधी कधी घरातच पिऊन पडू लागला. खायला आयत मिळतं होतं, त्यावर तो जगत होता. पैसा बायको आणत होती, तिच्यावर तो अवलंबून राहत होता.
सुनीताने काय विचार केला होता, ते सगळं विस्कळीत झालं. नवरा असा वागायला लागला की तिला आता नकोस झालं होतं तिचं काम.
ती कामाला लागल्यापासून राकेश जास्तच प्यायला लागला होता.
पहिला पगार तिने स्वतः हून त्याच्या हातात दिला होता, पण आता तो महिन्याचा पगार सुद्धा हिसकावून घेऊ लागला. याचा सुनीताला खूप राग यायचा. आयता पैसा हातात दिसायला लागला आणि जर नाही दिला तर हिसकावून घेऊ लागला. त्याचे कामावर खाडे इतके झाले होते की आता तो परत जरी गेला तरी त्याला घेणार नाही अशी अवस्था झाली होती त्याची. त्याच्या अशा वागण्यामुळे सुनीताला काही समजेनासे झाले होते.

घरची परिस्थिती सुधारण्या ऐवजी आणखीन बिघडत चालली होती. सासूबाई निदान थोडाफार हातभार लावत होत्या घरच्या कामात, पण लहान पोरगी सांभाळत नव्हत्या. सुनीता तिच्या मुलीला सुद्धा नेत होती कामावर. कोपऱ्यात बसवून ती तिचे काम निगुतीने करायची, पण तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे सगळं ती तिच्याचसाठी तर करत होती.
घरी गेलं की राकेशची रोजचीच कटकट, त्याचा मार. घालून पाडून बोलणे.. हे सगळं तसचं सुरू होतं.
हे आता रोजचेच झाले होते. मनोमन सुनीता स्वतः लाच कोसत होती.
हे आता रोजचेच झाले होते. मनोमन सुनीता स्वतः लाच कोसत होती.
"माझंच काय ते चुकलं. मी काय विचार केला होता आणि काय होऊन बसले. घरात पैसा आला की थोडी तरी परिस्थिती सुधारेल, पण झालं ते उलटच."
"ए सुने, पगार झाला की नाही तुझा ह्या महिन्याचा."
दारूच्या नशेतच राकेश बोलत होता, बहुतेक कालची उतरली नसावी त्याची.
दारूच्या नशेतच राकेश बोलत होता, बहुतेक कालची उतरली नसावी त्याची.
"नाही झाला, आणि पगार झाला तरी बी म्या तुला त्यातले पैसे घेऊ देणार न्हाई."
सुनीता पण आता त्याच्याशी चिडून बोलली. याचा त्यालाही खूप राग आला.
सुनीता पण आता त्याच्याशी चिडून बोलली. याचा त्यालाही खूप राग आला.
"मला बोलते तू! मला बोलते."
असं म्हणून तो तिच्या अंगावर धावून गेला, पण सुनीताने तिथे चुलीत पडलेली जळकी लाकडं उचलली आणि त्याच्यावर भिरकावली.
असं म्हणून तो तिच्या अंगावर धावून गेला, पण सुनीताने तिथे चुलीत पडलेली जळकी लाकडं उचलली आणि त्याच्यावर भिरकावली.
"हात लावलास तर याद रख, यापुढे तुला माझ्या पगारातून एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही."
सुनीताचं हे रूप पाहून राकेश पण घाबरला, तिथे उभी असलेली तिची सासूबाई पण हादरली.
सुनीताचं हे रूप पाहून राकेश पण घाबरला, तिथे उभी असलेली तिची सासूबाई पण हादरली.
परिस्थिती श्रीमंत असो किंवा गरीब.. ज्या घरात बाईचा हात फिरतो ते घर स्वर्गाहून सुंदर बनते. पण इथे सुनीताने जसा विचार केला तसे काही झालेच नाही. ती यासाठी सुद्धा स्वतःलाच दोष देत होती.
गरीबी, लाचारीत हलाखीचे दिवस काढत सुनीता तिचं काम करत तर होती, एक दिवस कधी ना कधी ही परिस्थिती बदलेल या आशेने.
गरीबी, लाचारीत हलाखीचे दिवस काढत सुनीता तिचं काम करत तर होती, एक दिवस कधी ना कधी ही परिस्थिती बदलेल या आशेने.
ती पुन्हा जोमाने कामाला लागली,
"आधी मुलगी आणि सासूबाईंना सांभाळत होती, आता नवऱ्याला ही सांभाळेन.. खूप मेहनत करेन पण माझ्या वैशुला मोठ्ठं करीन. तिच्या वाटेला ही अशी जिंदगी नाही येऊ देणार."
"आधी मुलगी आणि सासूबाईंना सांभाळत होती, आता नवऱ्याला ही सांभाळेन.. खूप मेहनत करेन पण माझ्या वैशुला मोठ्ठं करीन. तिच्या वाटेला ही अशी जिंदगी नाही येऊ देणार."
असे म्हणून तिने आणखी चार घरची कामं धरली आणि कंबर कसून कामाला लागली. पगार हातात येताच अंगावर धावून येणारा राकेश दिसायचा, पण तो ही आता चांगलाच घाबरला होता तिला. राकेश तिला बोलतं तर होताच, पण तिने त्याचं काही एक ऐकून न घेता त्यालाच ओरडायला सुरुवात केली. त्याच्याकडून तिला आता कसलीच अपेक्षा नव्हती. तिला फक्त तिच्या मुलीचं भविष्य घडवायचं होतं.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने