माझंच काय ते चुकलं - 4
थकून भागून राकेश घरी आला, त्याच जेवण होईपर्यंत सुनीता त्याच्याशी काहीच बोलली नाही. उलट तिच्या वाटेची भाकर सुद्धा तिने त्यालाच वाढली. पोटभर जेवण झाल्यावर राकेश लगेच खाटेवर आडवा झाला.
"पाय चेपून दे ग माझे जरा, आज काम ज्यादा केलं मी."
राकेशने असे म्हणताच सुनीता उठली आणि त्याच्या पायाशी जाऊन बसली. सासूबाईंना जेवायला वाढायच होतं, पण त्यांनी हाताने घेतलं नाही. तिने पुन्हा उठून त्यांना जेवायला वाढलं. राहिलेली एक भाकर त्यांच्या ताटात वाढली. रिकाम्या झालेल्या टोपल्या कडे बघत तिने डोळे टिपले आणि पाण्यानेच आपलं पोट भरलं.

पुन्हा राकेशचा आवाज आल्यावर त्याच्याजवळ जाऊन बसली. त्याच्याशी बोलावं म्हणून तोंड उघडणार तोच वैशूने गळा काढला.
"ए गप कर की तिला."
राकेश पुन्हा खेकसला तिच्यावर, कारण थकून आल्यावर त्याला लगेच झोप लागायची. छोट्या वैशुने रडून रडून तिच्या बापाची झोप मोड केली होती. तिला ओरडा तर मिळणारच होता. भुकेने ते तान्हं बाळ रडत होतं आणि सुनीताच्या पोटात काही नाही.. तिला दूध तरी कुठून येणार होतं. तरी सुद्धा ती त्या लेकराला तसेच छातीला लावून बसली होती. रडून रडून कोरडा झालेला तो जीव आपसूकच शांत झाला.
वैशुला खाली गोधडीवर टाकून ती पुन्हा राकेश जवळ गेली बोलायला.

"मी काय म्हणते, ते कमला.. "
पुढे बोलू की नको असं झालं होत तिला, पण बोलावं तर लागणारच! न बोलून कसं चालेल. आपली परिस्थिती बदलायला पाहिजे असं वाटतं असेल तर बोलायलाच पाहिजे.
पुढे बोलू की नको असं झालं होत तिला, पण बोलावं तर लागणारच! न बोलून कसं चालेल. आपली परिस्थिती बदलायला पाहिजे असं वाटतं असेल तर बोलायलाच पाहिजे.
"हम्म्म.. काय त्या कलमीच आता मध्येच, पुन्हा काही बोलली का तुला ती. कशावरून भांडली तुझ्यासोबत."
राकेश पडल्या पडल्याच तिला विचारत होता.
राकेश पडल्या पडल्याच तिला विचारत होता.
"नाही, ती काही नाही बोलली. पण मी काय म्हणते, ती जशी कामाला जाते तसं मी पण जाऊ का तिच्यासोबत."
धीर एकवटून शेवटी सुनीताने बोलून टाकलं.
धीर एकवटून शेवटी सुनीताने बोलून टाकलं.
"कशाला त्या नालायक बाईच्या नादाला लागते ग! घरात काय कमी आहे तुला? मी आणतो त्यात भागत नाही का तुझं."
असं म्हणून राकेशने तिला पायानेच ढकलून दिलं. ती तिथेच जमिनीवर पडली.
असं म्हणून राकेशने तिला पायानेच ढकलून दिलं. ती तिथेच जमिनीवर पडली.
"पण मी काय म्हणते, ते तरी ऐका. मी बाहेर गेली तर चार पैसे येतील. घरात दोन वेळेला चांगल खायला होईल. पोरगी मोठी होतेय, तिला शाळेत पैसे लागतील. मी नाही शिकले जास्त शाळा, पण तिला शिकवीन."
असे म्हणून सुनीता रडू लागली.
असे म्हणून सुनीता रडू लागली.
"चार पैसे मिळतील." इतकचं ऐकून राकेश तयार झाला तिला बाहेर पाठवायला. पण त्याला माहिती होतं कमला कुठलं काम करते ते.
"धुनी भांडी करायला जाणार म्हणजे लोकांची खरकटी काढणार व्हय ग तू. मग त्यापेक्षा घरातच कर ना ते."
सुनीताच ऐकून सासूबाई पण तिच्यावर डाफरल्या.
सुनीताच ऐकून सासूबाई पण तिच्यावर डाफरल्या.
"मी काही स्वतः साठी नाही करते हे काम, आपल्या सगळ्यांना मदत होईल आणि घरात माझा थोडा फार हातभार लागेल. घरात वस्तू येतील, तुम्हाला चांगली साडी चोळी घेईन. बाळाच्या अंगावर एक दागिना नाही, त्याला काहीतरी घेता येईल."
सूनीताच ऐकून सासूबाई शांत झाल्या, त्यांच्यासाठी पण काहीतरी घेईन म्हणतं होती ती; म्हणून त्याही राजी खुशी तयार झाल्या.
कसं असतं ना! जोवर आपल्याला काही फायदा होत नाही तोवर आपण समोरच्याला काहीच भाव देत नाही. तसेच आता सुनीताचे झाले होते.
दुसऱ्या दिवशी कमला बाहेर जाताना दिसली. तिथेच वाटेत तिला अडवून सुनीता तिच्याशी बोलू लागली.
"कमला, मलाही नेशील तुझ्यासोबत कामाला?"
सुनीता अगदी शांतपणे विचारत होती तिला. पण मनात खूप उत्सुकता होती नव्या कामाची.
सुनीता अगदी शांतपणे विचारत होती तिला. पण मनात खूप उत्सुकता होती नव्या कामाची.
"कामाला तर नेईन मी, पण आमचे सुद्धा काही नियम आहे.. ते पाळावे लागतील. बोल आहे मंजूर."
कमला अगदी रुबाबात बोलत होती तिच्याशी.
कमला अगदी रुबाबात बोलत होती तिच्याशी.
"हो, मला तुझे सगळे नियम मंजूर आहेत. फक्त मला काम मिळवून दे."
सुनीता विनवणीच्या सुरात बोलली.
सुनीता विनवणीच्या सुरात बोलली.
"काय ग! अचानक इतकी कशी काय गरज पडली तुला कामाची. राकेश तर किती भांडला होता मागच्यावेळी माझ्याशी. मग आता कसाकाय तयार झाला तो पण?"
कमला जरा जोरातच बोलली.
कमला जरा जोरातच बोलली.
"कमला ते.. घरात थोडी नड आहे पैशाची. आता ह्यांचा पगार पुरत नाही घरात. लहान वैशुला दवा पाण्यासाठी पण पैसा लागतो. घरात काही आणायचं म्हंटल की पहिले पैसे मोजावे लागतात. कालच पिठाचा डबा पण रिकामा झालाय."
"हम्म्म, मी तुला आधीच सांगत होते. पण तुझा नवरा राकेश.. त्याला तर मी आवडतच नाही; म्हणून तुला सुद्धा माझ्याशी बोलू द्यायचा नाही. पण आता.. "
"ते सोडून दे कमला आता, तू मैत्रीण हाय ना माझी. माझ्यासाठी एवढं तरी कर."
असे म्हणून सुनीता तिला हात जोडू लागली.
असे म्हणून सुनीता तिला हात जोडू लागली.
"ए बाई, हात बित नको जोडू. चल मी निघतेच आहे कामावर, तू ही सोबत चल. कालच मला मालकीण बाई विचारत होत्या, कामासाठी बाई आहे का म्हणून.. चल तुझंही काम होऊन जाईल आज."
असे म्हणून कमला घाईगडबीने बोलत होती तिच्याशी.
असे म्हणून कमला घाईगडबीने बोलत होती तिच्याशी.
"आत्ता लगेच येऊ सोबत?"
"हो मग कधी."
"अग पण मी अजून बाळाला भरवल नाही आणि कामही अजून तशीच पडलेली आहेत."
"ते नंतर आल्यावर कर, पण आता माझ्यासोबत चल.. नाहीतर जे काम मिळतय ते ही हातच जायचं."
"बरं बरं.. येते मी."
असं म्हणून सुनीता लगबगीने घरात गेली आणि सासूबाईंना सांगू लागली. राग तर आलेलाच त्यांना, पण आता त्याला पर्याय नव्हता.
असं म्हणून सुनीता लगबगीने घरात गेली आणि सासूबाईंना सांगू लागली. राग तर आलेलाच त्यांना, पण आता त्याला पर्याय नव्हता.
"हे बघ, मी घरातलं काहीही करणार नाहीये. तू आलीस की हे सगळं आवरायचं."
सासूबाईंनी आधीच सांगून टाकले तिला; त्यामुळे ती जरा खचली पण आता काम करायचं ठरवलं आहे ना! मग करायचंच. असे ठरवून ती निघाली कमला सोबत.
सासूबाईंनी आधीच सांगून टाकले तिला; त्यामुळे ती जरा खचली पण आता काम करायचं ठरवलं आहे ना! मग करायचंच. असे ठरवून ती निघाली कमला सोबत.
कमला सोबत कामाला निघालेली सुनीता आज जरा खुशीतच होती, पण लगेच कमलाने तिला भानावर आणले.
"मी काय सांगते ते नीट ऐक. तिकडे गेल्यावर लगेच मला हे येत ते येत असं करायचं नाही. जितकं सांगितलं तितकं करायचं आणि गप बसायचं."
"हा.. पण त्यांनी काही कामच दिलं नाही तर!"
"असं कसं नाही दिलं तर! कामं खूप असतात तिकडे. तू फक्त चांगल कामं कर, मग बघ मालकीण बाई किती खुश होतात ते."
"व्हय काय? "
"व्हय तर! त्या खुश झाल्या की लै काय काय देत असत्यात."
कमला मोठं तोंड भरून कौतुकाने तिला सांगत होती. सुनीता पण तिचं ऐकून भारावून जायची.
कमला मोठं तोंड भरून कौतुकाने तिला सांगत होती. सुनीता पण तिचं ऐकून भारावून जायची.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने