माझंच काय ते चुकलं - 3
काल कमलाच्या बोलण्याने सुनीता चांगलीच भारावून गेली होती. तिलाही मनात विचार आला,
"आपणही कमला सारखं कुठेतरी कामाला जायला पाहिजे. ह्या छोट्याश्या चाळीतल्या पत्र्याच्या खोलीत किती दिवस काढायचे असे रडत कढत. निदान चार पैसे आल्यावर थोडी तरी परिस्थिती बदलेल आपली."
असे म्हणून तिने आज संध्याकाळी राकेश घरी आल्यावर त्याच्याशी बोलायचे ठरवले.

सुनीता.. आई बापाला जड झाली म्हणून त्यांनी कोवळ्या वयात लग्न लावून टाकलेली पोरं. बरं लग्न झालं ते ही तिच्या दुप्पट वयाच्या माणसा सोबत. तिथेही परिस्थिती हाताबाहेर गेलेली. घर म्हणायला होतं फक्त, त्याला भिंती नव्हत्याच. तरीही तिने संसार थाटला.
काही चुकलंच तिचं तर राकेश आणि त्याची आई काहीबाही बोलायच्या तिला,
"निमूटपणे सगळं ऐकून घ्यायचं.. नवरा काहीही बोलला किंवा ओरडला तरी तोंडातून शब्द बाहेर काढायचा नाही. नाहीतर तुला घरातून हाकलून दिल्यावर तू पुन्हा इथे आमच्या सोबत येशील राहायला. इथे आम्हाला खायला नाही त्यात तुला आणि कसे पोसणार आम्ही. काहीही झालं तरी ते घर सोडायचं नाही पोरी."
आईचे हे शब्द आठवतच ती आला दिवस घालवायची.

संध्याकाळ झाली, सुनीता भरभर घरातलं आवरत होती. घर छोटंसं असलं तरी ती खूप मायेने सर्व काही करायची. छोट्या वैशूला पलीकडच्या खोलीत खेळायला पाठवायची, तोपर्यंत घरातलं आणि स्वयंपाकाच सगळं आवरून घ्यायची.
आज तिच्या मनात एक वेगळाच विचार आला होता. फक्त तो राकेशने ऐकून घेतला पाहिजे इतकीच तिची अपेक्षा. त्यातून ती स्वतः साठी काहीच करणार नव्हतीच.. फक्त घराला हातभार लावता यावा म्हणून हा सर्व खटाटोप.
चमचाभर डाळीचं पीठ होतं, ते ही कुणीतरी मंदीरात देवीला वाहिलेल होतं म्हणे. पिठा मिठाचा नैवैद्य वाहिलेला असायचा देवीला. त्यातलेच पिठ गोळा करून आणायच्या सासूबाई कधी कधी घरी. मग ते पीठ चाळून स्वच्छ करून सुनीता वापरायची.
ते एव्हढंस डाळीचं पीठ, त्याच्याकडे बघत सुनीता मनोमन विचार करत होती. कसं पुरणार हे सगळ्यांना? पण त्यातच तांब्याभर पाणी घालून तिने पिठलं बनवलं.
भाकरीच्या पिठाचा डबा हातात घेतला, जरा हलका लागला. डब्यात डोकावून पाहिलं तर पीठ तळाशी गेलं होतं. फार फार तर दोन तीन भाकऱ्या होतील, पण तरीही तिने त्यातच सगळ्यांसाठी बरोबर केलं. सासूबाईंना तिची चलबिचल दिसत होती,
"काय ग? आज काय विशेष? राकेश अजून यायचा आहे तरी पण तुझा सैपाक आज लवकर कसा झाला."
सुनीता भरभर हात चालवत होती; म्हणून त्यांना तिच्याबद्दल कुतूहल वाटले.
सुनीता भरभर हात चालवत होती; म्हणून त्यांना तिच्याबद्दल कुतूहल वाटले.
"काही नाही, असच. वैशू बाजूला खेळतं आहे म्हणून जरा लवकर आवरून घेतलं. नाहीतर ती काही कामं करू देत नाही मला."
काहीतरी उत्तरं देऊन त्यांना टाळायला बघत होती सुनीता.
काहीतरी उत्तरं देऊन त्यांना टाळायला बघत होती सुनीता.
"हम्म्म, येईलच आता राकेश घरी. त्याला जरा चांगल वाढत जा. कष्टाचं कामं करून येतो तो घरी, अर्धी भाकर जरा ज्यादाच वाढ त्याला."
सासूबाई असं म्हंटल्या खरं, पण डब्यात पीठ नव्हतं. सुनीताचा चेहरा लगेच पडला.
सासूबाई असं म्हंटल्या खरं, पण डब्यात पीठ नव्हतं. सुनीताचा चेहरा लगेच पडला.
"इथ मलाच खायला काही राहणार नाही मग कुठून ह्यांना अर्धी भाकर ज्यादा वाढू!"
मनात विचार करतच ती चुलीजवळ बसून होती.
मनात विचार करतच ती चुलीजवळ बसून होती.
राकेश गवंडी काम करायचा. जिथे मोठं मोठ्या बिल्डिंगचे काम सुरू असेल तिथे तो रोजाने काम करायचा. कधी कधी काम मिळायच, पण कधी कधी रिकाम्या हातीच घरी परताव लागायचं. काम मिळालं की तेव्हाच घरात पीठ मीठ आणायचा तो स्वतः च, नाहीतर इतर दिवशी काहीही करून भागवायच! असं म्हणणं असायचं त्याच. पण काहीही करायचं म्हणजे करायचं तरी काय? हा प्रश्न पडायचा सुनीताला.
काम झालं म्हणजे पगाराचे पैसे हातात आल्यावर भलताच खुश व्हायचा. पण त्यात कामगार मित्र कधी कधी दारू पाजून द्यायचे; त्यामुळे लडखळत घरी येताना त्याला कित्येकदा सांभाळलं असेल सुनीताने. त्याला बिडीचा नाद आहे, तो ही काही केल्या सुटत नव्हता. त्यात निम्मे पैसे खर्च होतात आणि राहिलेले घर खर्च भागवण्यात सुद्धा पूरत नाही.. आणि प्रश्न मात्र तसाच राहतो, महिना कसा घालवायचा? अशी बिकट अवस्था होऊन जाते सूनीताची.
थकून भागून राकेश घरी आला, त्याला बघताच सूनिताने पटकन ताट घेतले जेवायला वाढायला. त्याला गरम गरम पिठलं भाकरी वाढली ताटात. तो ही ताटाकडे बघून सुखावून गेला. सोबतीला कांदा होताच, त्याने तो एका बुक्कितच फोडला आणि त्याच्या पाकळ्या बाजूला केल्या.
भाकरीचा एक तुकडा तोडतच तो सुनीता सोबत बोलू लागला.
"आज काय एकदम गरमागरम जेवण!"
एक घास मोडून खाताच त्याने डोळे मिटले, कारण पिठलं भाकरी त्याची आवडती होती.
"आज काय एकदम गरमागरम जेवण!"
एक घास मोडून खाताच त्याने डोळे मिटले, कारण पिठलं भाकरी त्याची आवडती होती.
सुनीताने त्याच्याकडे फक्त हसून पाहिले, मनात तिची चुळबुळ सुरूच होती. कसं बोलावं? काय बोलावं? ह्याचा विचार करतच होती की सासूबाईंनी तिला आवाज दिला.
"अग अशी बघत काय बसलीस, ताट रिकामं झालं त्याच.. वाढ त्याला आणखी एक भाकर."
तशी ती भानावर आली, टोपल्यात असलेली तिच्या नावाची भाकर त्याला वाढत होती.
तशी ती भानावर आली, टोपल्यात असलेली तिच्या नावाची भाकर त्याला वाढत होती.
थकून भागून राकेश घरी आला, त्याच जेवण होईपर्यंत सुनीता त्याच्याशी काहीच बोलली नाही. उलट तिच्या वाटेची भाकर सुद्धा तिने त्यालाच वाढली. पोटभर जेवण झाल्यावर राकेश लगेच खाटेवर आडवा झाला.
"पाय चेपून दे ग माझे जरा, आज काम ज्यादा केलं मी."
राकेशने असे म्हणताच सुनीता उठली आणि त्याच्या पायाशी जाऊन बसली. सासूबाईंना जेवायला वाढायच होतं, पण त्यांनी हाताने घेतलं नाही. तिने पुन्हा उठून त्यांना जेवायला वाढलं. राहिलेली एक भाकर त्यांच्या ताटात वाढली. रिकाम्या झालेल्या टोपल्या कडे बघत तिने डोळे टिपले आणि पाण्यानेच आपलं पोट भरलं.

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने