कॅटेगरी - जलद कथालेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय - खरा गुन्हेगार
बघता बघता २ महिने होऊन गेले. निधी आणि मयंकची जवळीक या दरम्यान बरीच वाढली. सकाळी चहा नाश्ता आटोपून सारंग जे लिखाणासाठी खोलीत जायचा ते थेट संध्याकाळीच बाहेर यायचा. मधे दुपारी निधी किंवा मयंक त्याला जेवण द्यायला जायचे. या व्यक्तीरित मला डिस्टर्ब करू नये असे सारंगने त्यांना बजावले होते.
बस हेच कारण निधी आणि मयंकच्या एकत्र येण्याचे ठरले.
बस हेच कारण निधी आणि मयंकच्या एकत्र येण्याचे ठरले.
निधी मला अजूनही विश्वास नाही बसत . तू आणि माझ्या प्रेमात ? खरंतर पहिल्यादांच आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुझा तो दरारा पाहून मला वाटलं नव्हतं तू अशी सहज मला सोबत घ्यायला परवानगी देशील.
मयंकने निधीला आपल्या मिठीत घेत विचारले.
मयंकने निधीला आपल्या मिठीत घेत विचारले.
निधी - खरं सांगायचं तर पहिल्यांदाच मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हाच मी तुझ्याकडे आकर्षित झाले होते. म्हणूनच तुला सोबत यायची परवानगी दिली.
काहीही काय ? सारंग माझ्या तुलनेत बराच उजवा आहे. शिवाय त्याच्याकडे पैसा आहे - मयंक
निधी - अगदी बरोबर पैसा आहे म्हणून मी त्याच्यासोबत आहे. पण फक्त पैसाच पुरेसा नाही ना ?
तू मला जे सुख देऊ शकतोस ते सुख मला सारंग कडून कधीच मिळणार नाही. ही एकच कमतरता त्याच्यात आहे.
तू मला जे सुख देऊ शकतोस ते सुख मला सारंग कडून कधीच मिळणार नाही. ही एकच कमतरता त्याच्यात आहे.
यावर मयंकने अविश्र्वासाने निधीकडे पाहिले.
आणि तुझ्याकडे पैसा नाही म्हणून आता आपण एक मस्त प्लॅन करणार आहोत - निधी
मयंक - कसला प्लॅन ?
आपण सारंगला कायमचं संपवायचं आणि त्याच्या नावे जी प्रॉपर्टी आहे ती मला मिळेलच शिवाय पॉलिसीचे ७५ करोड देखील आपलेच असतील. आणि हा एवढा पैसा आयुष्यभर ऐश करायला पुरेसा आहे.
तू मूर्ख आहेस का निधी ? मयंक ओरडत म्हणाला, तुला आतापर्यंत मी सांगितलं नाही पण आता ऐकच,
खरंतर इथे कंपनीने मला तुमचा नोकर म्हणून नाही पाठवलं आहे. सारंगला कोणत्याही परिस्थितीत प्रोटेक्ट करायची जबाबदारी माझी आहे . आणि असं नाही केलं तर माझी वाट लागेल. इथे आल्यापासून रोज मी तुझ्या नकळत सारंगचे अपडेट्स शर्माला देतोय. एकही दिवसं माझा फोन नाही गेला तर माझी नोकरी धोक्यात येईल.

व्हॉट? त्या मूर्ख शर्माची एवढी हिंमत ? आमच्यावर हेरगिरी करायला माणूस पाठवतो. त्याला बघतेच आता ssss
निधीे रागात ओरडत शर्माचा नंबर डायल करणार इतक्यात मयंकने फोन हिसकावून घेतला.
निधीे रागात ओरडत शर्माचा नंबर डायल करणार इतक्यात मयंकने फोन हिसकावून घेतला.
हे बघ निधी माझं तुझ्यावर प्रेम आहे पण विचार कर, उद्या जर आपण त्याला संपवलं तर सगळ्यात पहिला संशय तुझ्यावरच येणार आहे . मयंक तिला समजावत म्हणाला.
हा सगळा विचार मी आधीच केला आहे म्हणून त्याला मारण्याकरिता माझ्याकडे एक प्लॅन आहे . सारंगला पोहता येत नाही आणि आपण येताना जे तळं पार करून आलो त्या तळ्याच्या आधारेच त्याचा नैसर्गिक मृत्यू दाखवायचा आहे. निधी
ठीक आहे आपण करू विचार अजून २-३ महिने आहेत . मयंक
पुढचे दोन दिवस शांततेत पार पडले आणि एके दिवशी सकाळीच निधी ओरडू लागली.
तिचा आरडाओरडा ऐकून मयंक त्यांच्या खोलीच्या दिशेने पळाला.
समोरचं दृश्य पाहून त्याचा स्वतःवर विश्वास बसेना.
तिचा आरडाओरडा ऐकून मयंक त्यांच्या खोलीच्या दिशेने पळाला.
समोरचं दृश्य पाहून त्याचा स्वतःवर विश्वास बसेना.
विस्तीर्ण अशा बेडवर सारंग उपडा पडलेला होता. त्याचे दोन्ही डोळे शेवटच्या क्षणी भयानक पाहिले आहे अशा अवस्थेत विस्फारले गेले होते.
जणुकाही त्याचे प्राणपाखरु या डोळ्यांमार्फतच उडून गेले होते.
आणि निधी ?
ती तर वेड्यासारखी त्याच्या निष्प्राण देहाला गदागदा हलवत उठवत होती.
जणुकाही त्याचे प्राणपाखरु या डोळ्यांमार्फतच उडून गेले होते.
आणि निधी ?
ती तर वेड्यासारखी त्याच्या निष्प्राण देहाला गदागदा हलवत उठवत होती.
शेवटी समोरच्या वास्तव्याचं भान ठेवत त्याने निधीला धीर दिला. बराच वेळ निघून गेला तशी निधी भानावर आली.
काय घाई होती त्याला मारायची ? तुला सांगितलं होत ना मी की पद्धतशीर प्लान करून त्याचा नैसर्गिक मृत्यू दाखवायचा. मी आताच्या आता पोलिसांना फोन करते.
निधी रागारागाने मयंकला म्हणाली.
निधी रागारागाने मयंकला म्हणाली.
मयंक - अगं मी गाढ झोपेत होतो. तुझा आरडाओरडा ऐकून धावत आलोय. मी कशाला मारू सारंगला? माझा काय संबंध? आणि जर मला घाईचं असती तर मी त्यादिवशीच तुझ्यासोबत मिळून प्लॅनिंग केले असते ना.
आणि दुसरी गोष्ट मला पैशांची हाव नाही.
तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुझ्यासोबत मी माझे आयुष्य काढेल न की मर्डर करून तुरुंगात बसेल.
उलट मीच तुला विचारणार होतो की रात्रभर बेडरूममध्ये तू होतीस ना? तुमच्या खोलीत कोणी आल्याचं तुला जाणवलं नाही का ? जरी नसेल तरी मरायच्या आधी सारंगने आरडाओरडा नक्कीच केला असेल तो ही तुला ऐकू नाही आला ?

निधी गोंधळलेल्या भावात म्हणाली , रात्रभर मला कसलाच आवाज किंवा कोणी आल्याचं नाही जाणवलं. इन्फॅक्ट मी सकाळी उठून रनिंगला गेले होते तेव्हा सारंग नॉर्मल अवस्थेत गाढ झोपेत होता.
मी रनिंगला जातेय असं ओरडून म्हणाले तेव्हा झोपेतच त्याने हुंकार भरला होता..१ तासाने मी आले आणि तेव्हा हा पाहिलं तर हे घडलं होतं.
मला वाटलं की हे तुझंच काम आहे.
मी रनिंगला जातेय असं ओरडून म्हणाले तेव्हा झोपेतच त्याने हुंकार भरला होता..१ तासाने मी आले आणि तेव्हा हा पाहिलं तर हे घडलं होतं.
मला वाटलं की हे तुझंच काम आहे.
म्हणजे निधी तुला समजतंय का ? आपण दोघांनी काही केलं नाही. हे तिसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीच काम आहे. - मयंक.
मयांकच्या बोलण्यावर निधी जाम घाबरली.
हे बघ घाबरू नकोस सर्वात आधी शांतपणे बसून आपण विचार करू .ज्याअर्थी त्याने फक्त सारंगला मारलं आहे त्याअर्थी त्याला आपल्या दोघांशी काहीही घेणेदेणे नाही. उलट सारंगला कोणाकडून धोका होऊ शकतो , अशी कोण व्यक्ती आहे ज्याला ही जागा माहित आहे
ह्याचा तू विचार कर . नाहीतर ह्या खुनाच्या आरोपाखाली आपण दोघे १००% अडकणार आहोत.
एकवेळ त्याची बायको म्हणून तू सुटशील पण मला आयुष्यभर तुरुंगात खडी फोडायला लागेल.
मयंक शांतपणे म्हणाला.

माझं डोकं काम करत नाही आहे . त्याची वैयक्तिक अशी कोणाशी दुश्मनी नव्हती.
लिखाणासंदर्भात कित्येक लोकांशी त्याच्या गाठीभेटी होत्या. शिवाय त्याचे हजारो चाहते होते. एवढ्या लोकांत नेमका संशयित म्हणून कोण हे ओळखणं कठीण आहे.
निधी जोर देत म्हणाली.
लिखाणासंदर्भात कित्येक लोकांशी त्याच्या गाठीभेटी होत्या. शिवाय त्याचे हजारो चाहते होते. एवढ्या लोकांत नेमका संशयित म्हणून कोण हे ओळखणं कठीण आहे.
निधी जोर देत म्हणाली.
ठीक आहे सर्वात आधी आपल्याला हे शोधावं लागेल. त्याचं बँक स्टेटमेंट, मोबाईल , त्याच्या डायरी सर्व तपासावं लागेल. न जाणो आपल्याला काही महत्वाची माहिती मिळाली तर. - मयंक.
आणि जर तसं काही मिळालं नाही तर ? - निधीने आपली शंका उपस्थित केली.
मयंक - आधी आपण शोध तर घेऊ. यासाठी सहज एक आठवडा जाईल. आता सगळ्यात आधी मी इथून जवळपासच्या गावात जाणार आहे .
निधी - गावात कशाला ?
मयंक - कशाला म्हणजे ? आता थोड्याच वेळात हे प्रेत कुजायला लागेल. वास पसरेल. निदान आपण माहिती काढेपर्यंत तरी हे प्रेत सडता कामा नये. मी एक साधारण मोठ्या आकाराचं डीप फ्रीजर आणायला जात आहे .
निधी - मला भीती वाटते मी नाही थांबणार इथे . प्लीज मी सोबत येते.

मयांकने आढेवेढे घेत तिला नकार दिला. तिचं थांबणं गरजेचं आहे हे समजावलं. पण निधी ऐकायलाच तयार नव्हती.
ठीक आहे मग लगेच निघू. प्रेत चादरीने व्यवस्थित झाकून घेत मयंक म्हणाला.
साधारण चार तासांनी तळ्याला मोठा वेढा घालून कच्च्या वाटेच्या रस्त्याने एक माणूस व्यवस्थित मावेल अशा मोठ्या आकारचं डीप फ्रीजर भाड्याच्या टेम्पोत टाकून मयंक आणि निधी परत आले.
दारातूनच टेम्पोवाल्याला पैसे देत त्यांनी फ्रीजर आत घेतलं.
दारातूनच टेम्पोवाल्याला पैसे देत त्यांनी फ्रीजर आत घेतलं.
प्रेत उचलून ठेवण्यासाठी दोघेही खोलीत गेले तेव्हा दुसरं आश्चर्य आ वासून समोर उभं होतं.
समोरचा बेड आता पूर्ण मोकळा होत.
जणू प्रेतरुपी सारंगच अस्तित्वच नाहीसं झालं होतं. ते दृश्य पाहून निधी जागीच कोसळली.
समोरचा बेड आता पूर्ण मोकळा होत.
जणू प्रेतरुपी सारंगच अस्तित्वच नाहीसं झालं होतं. ते दृश्य पाहून निधी जागीच कोसळली.
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने