Login

मास्टरमाईंड भाग एक

मास्टरमाईंड
कॅटेगरी - जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६.

विषय - खरा गुन्हेगार.


की sss ती sss १०० करोडची पॉलिसी? मिस्टर संदीप तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना ?
लोटस लाईफ इन्शुरन्सचे चीफ रिजनल ऑफिसर शर्मा जवळजवळ खुर्चीतून ओरडत उठले.
शांत व्हा शर्मा साहेब . आधी माझं म्हणणं सविस्तर ऐकून घ्या मग तुम्ही विचार करा. - संदीप.
त्यानंतर सुमारे १० मिनिटं युवा चॅनलचे हेड संदीप यांनी आपला पॉलिसीचा उद्देश शर्मा साहेबांना सांगितला आणि २ दिवसांतच निर्णय घ्यायची सूचना देत निघून गेले.

इकडे शर्मा साहेब विचारात पडले आणि इतर संबधित अधिकाऱ्यांची एक मीटिंग त्यांनी आयोजित केली.
त्यामध्ये त्यांनी युवा चॅनलहेड संदीपचा प्रस्ताव मांडला तो असा की ,
सध्याच्या काळात लेखन क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच सारंग जोशी. मग त्यांचं लिखाण हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर असो किंवा रोमँटिक . पहिली आवृत्ती प्रकाशित व्हायच्या आधीच कित्येक प्रति बुक होतं. त्यामुळे एक पुस्तक हाती पडण्यासाठी वाचकांना निदान २-३ महिने तरी सहज वाट पाहावी लागायची.
याच प्रसिद्धीचा फायदा घेत युवा चॅनलचे हेड संदीप यांनी सारंगला त्याच्या आगामी लेखनावर आधारित एक वेबसीरिज सुरू करण्याची ऑफर दिली शिवाय मानधन म्हणून एकूण कमाईच्या ५० टक्के रक्कम देण्याचे कबुल केले.
काही दिवसातच सारंगने आपल्या बायकोशी निधीशी चर्चा करून संदीपला होकार कळवला होता पण त्यात सारंगने २ अटी घातल्या होत्या त्या अशा की
१) वेब सीरिज ला अनुसरून लिखाण करता यावं म्हणून सहा महिने त्यांना आपल्या बायकोसोबत एखाद्या शांत ठिकाणी जाण्याची मुभा देण्यात यावी . त्या ठिकाणाची माहिती गुप्त राहील. या सहा महिन्यादरमान चॅनेलला वेब सिरीज ची जाहिरात करावी लागेल जेणेकरून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल आणि याचा फायदा प्रसिद्धीसाठी होईल.
२ ) या सहा महिन्यात जर सारंगचा मृत्यू हा अपघाती , खून, आजार, किंवा तत्सम काहीही कारणाने झाल्यास पॉलिसीची ७५ टक्के नॉमिनी निधी म्हणजेच सारंगची बायको असेल.

ही दुसरी अट कशी शक्य आहे ? नाही म्हणजे मिस्टर सारंग हे २९ वर्षाचे तरुण लेखक आहेत आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहेत. एका इंटरव्ह्यू मधे मी ऐकलं आहे की ते दारूच्या थेंबालाही स्पर्श नाही करत . हेल्दी लाईफ जगण्यावर भर देतात. मग नैसर्गिक किंवा आजाराने मृत्यू होण्याचा प्रश्न नाही. राहिला प्रश्न खून किंवा घातपाताचा तर हे होऊ शकतं. जर ते एकांत ठिकाणी जाणार आहेत तर निधी मॅडम शिवाय कोण असणार तिथे ?
सेल्स हेड मयंक ने आपला प्रश्न उपस्थित केला.

अगदी बरोबर मयंक अशी अट घालायचे कारणच काय ? चॅनेल आपल्या सुरक्षेसाठी पॉलिसी घेते हे पटतं पण ७५ टक्के नॉमिनी निधीला करायचं काय कारण ? म्हणून ही पॉलिसी मंजूर करायची की नाही यासाठी ही मीटिंग आयोजित केली आहे.

सुमारे तासभर ही चर्चा लांबली आणि शेवटी असा निष्कर्ष काढण्यात आला की पॉलिसी मंजूर केली जाईल पण सारंग यांना प्रोटेक्ट करायला किंबहुना त्यांच्यावर नजर ठेवायला ते जिथे जातील तिथे इन्शुरन्स कंपनीचा एक माणूस कम डिटेक्टिव पाठवण्यात यावा.

मिस्टर शर्मानी हे सर्व चॅनेल हेड संदीपच्या कानावर घातलं.
मला काही प्रॉब्लेम नाही उलट असं झालं तर बरंच आहे. पण त्या दोघा नवरा बायकोमध्ये आपण काय म्हणून तिसरा व्यक्ती पाठवणार आहोत .महत्वाचे म्हणजे
ते दोघं कुठे जाणार हेच सांगायला तयार नाहीत. तुम्ही प्रयत्न करून बघा पण निधी मॅडम खूपच कडक स्वभावाच्या आहेत. त्या तयार तिऱ्हाईत माणसाला न्यायला नाही तयार होणार.

तरीही एकदा प्रयत्न करून बघू म्हणत पॉलिसी हेड मिस्टर शर्मांनी डॉक्युमेंट्स तयार केले. चॅनेल हेड संदीपने सर्व फॉर्मलिटीस् पूर्ण केल्या आणि सारंगच्या सहीसाठी ते मयंक ला घेऊन साहित्य सहवास बंगल्यात आले.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →