जलद लेखन
मर्यादित चौकट (कोष)
भाग २
अगं सुहासिनी आपण नां स्वतःचं स्वतःला दमवत असतो. भाजीची चवही छान हवी, टिफिन नेटका हवा, घर कायम नीट असायलाच हवं. एखादा पदार्थ कमी जास्त झाला की, आपली स्वतःचं स्वतःची चिडचिड सुरू होते.
मैत्रिणींनी कुठे जायचं ठरवलं तर काही जणींची, नाही गं आता नको पुढे पाहू आणि हे असंच चालू राहतं. मग आपण आपल्यासाठी केव्हा जगणार. जबाबदारीतून मुक्त झाल्यावर जरा निवांत वेळ मिळतो तेव्हा शारीरिक दुखणी मागे लागतात. म्हणून आज आता आणि या क्षणी जगून घ्याव. पटतंय का तुला? आज तुझ्या हाताने तयार केलेले जेवणच मुलं जेवणार आणि उद्या मुलं मोठी झाली की तीच तुला म्हणणार, आम्ही तुला थोडीच कुठे जायला मनाई केली होती. नवराही हेच म्हणणार. म्हणून आज वेळातला वेळ काढून आपल्याला ज्यात आनंद मिळतो ते करायचं.
विरघळणारी कुल्फी वाया न घालवता कशी खायची याचे प्रत्येकाला व्यवस्थित ज्ञान असते. मात्र प्रत्येक वाढदिवसाला एका वर्षाने कमी होणारे जीवन काहीच पदरात न पडता वाया जात आहे हे मात्र लक्षात येत नाही. त्यामुळे याचाही थोडा विचार करायला हवा. सुस्मिता सुहासिनीच्या गोष्टी कान देऊन ऐकत होती.
मात्र तिचे हात काम करतचं होते.
मात्र तिचे हात काम करतचं होते.
गोष्टी गोष्टी सुहासिनीचा स्वयंपाक झाला. सुस्मिता जे बोलते आहे ते अगदी खरं आहे. मी याचा कधी विचारच केला नाही. खरंच स्वतःचा आनंद स्वतः शोधायला पाहिजे. सकाळपासून मी नुसती राबते आहे. मुलं टीव्हीला चिकटून बसली आहेत. नवरा मोबाईल बघत आहे.
सकाळपासून मी आरशात सुद्धा बघितलं नाही. काम, काम आणि काम. हे झालं की ते,ते झालं की ते.
नाही, आता मी स्वतःसाठी वेळ काढणार. स्वतःच्या आवडीनिवडी जपणार.
सुहासिनी मी निघू का? सुस्मिताच्या बोलण्याने सुहासिनी भानावर आली. ठीक आहे. बाय .म्हणत सुस्मिता निघून गेली.
सुहासिनी मनातल्या मनात विचार करू लागली. हे विचार माझ्या डोक्यात कधीच का आले नाहीत? जबाबदारीच्या या कोषात मी स्वतःला जखडून घेतले आहे. नोकरी, मुलं, आल्या गेल्याचे करण्यातचं माझे आयुष्य चालले आहे. स्वतःसाठीही थोडा वेळ काढला पाहिजे, हा विचार कधी मनाला शिवला नाही.
आपण घरासाठीचं आहोत हा आदर्श प्रेरणादायी ठरण्यापेक्षा आता अधिक थकवणारा ठरत आहे. यामुळे स्वतःचे आरोग्य, मानसिक स्थिती, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करणे नक्कीच महत्त्वाचे आहे. सुहासिनी उठली. आरशासमोर जाऊन उभी राहिली.
पुढील भाग अवश्य वाचा.
