Login

मर्यादित चौकट (कोष)

मर्यादित चौकट भाग १


जलद लेखन
मर्यादित चौकट (कोष)
भाग १

सुहासिनी काय करतेस गं?
सुस्मिताने दारातूनच आवाज दिला.

स्वयंपाक करते गं.
सुहासिनीही किचनमधूनच बोलली.

आज रविवार नां आज तर कामाचा नुसता पूर. आठवडाभराची काम. शिवाय नवरोबा आणि मुलांची फर्माईश, आज हे बनव ते बनव.

बरं बरं. तू कर तुझी काम. निघते मी. सुहासिनी कामात असलेली बघून सुस्मिता म्हणाली.

अगं सुस्मिता आत तर ये. आताच तर आलीस. बस नां थोडा वेळ निवांत.

बरं बाबा.म्हणत सुस्मिता किचनमधे तिच्या जवळच खुर्ची घेऊन बसली.

सांग कसं काय येणं केलं? सुहासिनी म्हणाली.

अगं, आम्ही सर्व मैत्रिणी चार-पाच दिवसांसाठी टूरला जाण्याचा बेत करतोय. म्हटलं तुला पण विचारून घ्यावं.

कुठे जमते का माझं. सारखी कामं अगदी स्वतःभोवती रिंगण घालून बसलेली असतात. सुहासिनी तक्रारीचा सूर लावला.

निघू का मी?

नुसती सारखी रडत गाऱ्हाणं सांगत असतेस.सुस्मिता न राहवून म्हणाली.

नाही नाही बस. आलीच आहेस तर कॉफी घेऊन जा.

नाही, मी सर्व आटोपूनचं आली आहे.

तुझं बरं बाई. सुहासिनी.

पुन्हा झालीस का तू सुरू.?

सारखं सारखं तेच ते.

अगं थोडा वेळ तर स्वतःसाठी काढत चल.

तेवढ्यात सुहासने आवाज दिला, सुहासिनी झाला का गं स्वयंपाक?

हो हो झालाच आहे. वाढते.
माझी मैत्रीण आली आहे. तिच्याशी बोलते आहे.
ठीक आहे. सुहास म्हणाला.

बघ सुस्मिता, असतो का गं मला वेळ? उद्यापासून माझ्या मुलांची परीक्षा. यांचं ऑफिस. टिफिन आणि सकाळचा चहा तर यांना माझ्या हातचाचं लागतो बघ.

सुस्मिता थक्क होऊन ऐकत होती.

तिला एका क्षणी वाटलं की, घर, नवरा, मुलं सर्वस्वी हिच्यावरचं अवलंबून आहेत आणि ही जर कुठे बाहेर गेली तर ही सर्व मंडळी उपाशीच राहणार.

पण हे सर्व तिने स्वतःशीच ठरवलं असणार. या नादात ती स्वतःसाठी पण वेळ काढू शकत नाही.सुस्मिता मनातल्या मनात बोलत होती.

बघ सुस्मिता तू तर बघतेस आहेस नां अगं मी नसली तर मुलं नीट जेवत नाही. मॅगी, दाबेली, पिझ्झा या सारखं काही बोलावून खातात. शिवाय नवऱ्याला रात्रीला माझ्याचं हातच्या गरम गरम पोळ्या लागतात.

हे बघ सुहासिनी, थोडी बस माझ्याजवळ. किती स्वतःला दमून घेशील.

तू जे सांगते आहेस, नवऱ्याला गरम पोळ्या लागतात. ही काय फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे का?

तू हा कधी विचार केला आहेस का की, या सततच्या कामामुळे तुझं स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे.

नवऱ्याकडे लक्ष दे. मुलांची ही बघ. पण त्याचबरोबर थोडा वेळ स्वतःसाठी दे. स्वतःची आवड निवड, छंद जोपास.

पुढील भाग अवश्य वाचा.

क्रमशः

सौ. रेखा देशमुख
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →