पुस्तक : व्यसन प्रेमाचे
लेखिका : स्वामिनी (अस्मिता) चौगुले
प्रकाशन : वेलवेट कविशा पब्लिकेशन
परीक्षण : कामिनी खाने
लेखिका : स्वामिनी (अस्मिता) चौगुले
प्रकाशन : वेलवेट कविशा पब्लिकेशन
परीक्षण : कामिनी खाने
लेखिका स्वामिनी (अस्मिता) चौगुले या प्रामुख्याने ऑनलाईन व्यासपीठांवर लेखन करणाऱ्या एक वाचकप्रिय, प्रतिभासंपन्न मराठी लेखिका आहेत. सामाजिक, रहस्य, प्रेम,.. अशा विविधांगी शैलीत मुशाफिरी करणाऱ्या या लेखिकेचे बरेचसे विषय हटके, स्वतःचं खास अस्तित्व दाखवणारे असतात हे विशेष.
सदर पुस्तक हे वेलवेट कविशा पब्लिकेशनने केलेल्या जागतिक विक्रमात सहभागी पुस्तक आहे. सुरुवातीलाच असलेलं लेखिकेचं मनोगत लेखिकेच्या आतापर्यंतच्या आयुष्याची झटपट सफर करायला लावतं. अर्थात यात अजिबात कंटाळा येत नाही कारण एक लेखिका 'लेखिका' म्हणून घडण्याचा अन् समोर येण्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा वाचनीय आहे. प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांची प्रेमाच्या विविध संदर्भ आणि उपमांनी सजलेली प्रस्तावना या कादंबरीला चपखल शब्दांत व्यक्त करते. तर शुभेच्छापत्रांतून लेखिकेच्या लेखणीची धार लक्षात येते.
कादंबरीचं शीर्षक वाचून ही एखादी उत्कट प्रेम व्यक्त करणारी प्रेमकथा असावी असा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. मुखपृष्ठावरील दोन स्त्रिया अन् एक पुरुष या पद्धतीचं चित्र पाहूनही काहीसं असंच वाटतं. पण... हो, पण ही कादंबरी यापलीकडे काहीतरी आहे. एक आधुनिक प्रेमकहाणी; पण बरंच काही सांगणारी... यात 'प्रेमाचे व्यसन' तर आहेच; पण 'व्यसना'च्या कल्पनेपलीकडे जाणाऱ्या छटाही पुरेपूर आहेत.
एका स्वप्नापासून या कादंबरीची सुरुवात होते आणि युविका, युग भेटीस येतात. युविका एका बिझनेस कुटुंबातील, तर युग एक डॉक्टर. युविकाच्या उपचारांनंतर पाच वर्षं दोघं संपर्कात नसतात; पण त्यानंतर मात्र युविकाला त्याच्यासमोर जावंच लागतं. कारण स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येताच युग भेटीस येतो; पण आता तो डॉक्टर म्हणून नव्हे तर पेशंट म्हणून समोर येतो. तेही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये!
कारण? कारण असते ती! ती म्हणजे संजना. एक ड्रग्स ॲडिक्ट अन् सेक्स ॲडिक्टसुद्धा! जिने आत्महत्या केली म्हणून खरंतर युगचा छळ सुरू होता; पण खरंच ही आत्महत्या होती? संजना नावासोबत जोडलेलं गूढ नक्की काय होतं? हे तर कादंबरी वाचल्यावरच समजेल.

व्यसनाभोवती फिरणाऱ्या या कथेची वळणं विचार करायला लावतात. युविकाची व्यसनाधीन अवस्था वाचताना वास्तविक चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. युगचं रिहॅबिलिटेशन सेंटर आणि त्याचं एकंदरीत वर्णन वाचून फक्त युविकाच नाही तर आपल्यालाही थक्क व्हायला होतं. या रिहॅबिलिटेशन सेंटरच्या निमित्ताने युविकाच्या आयुष्यातला नवा अध्याय सुरू झालेला... सुरुवातीला उपचारासाठी टाळाटाळ करणारी युविका, तिला आलेले पॅनिक अटॅक, हट्टी युविका आणि आव्हान स्वीकारणारा युग,... सर्वच वातावरण हळूहळू आपल्याला त्यासोबत एकरूप व्हायला लावतं. हा व्यसनमुक्त होण्याचा, व्यसनमुक्त करण्याचा प्रवास वाचकांना कथानकासोबत खिळवून ठेवतो.
व्यसन विळख्यात सापडलेल्या युविकाला ज्या डॉ. युगने बाहेर काढलं, त्या डॉ. युगला एका भयंकर विळख्यातून बाहेर काढण्यासाठीची युविकाची धडपड माणुसकी आणि जिवंत असलेल्या भावनांवर विश्वास ठेवायला भाग पाडते. आरोप आणि नैराश्यामुळे व्यक्त होण्यास कचरणारा युग हळूहळू युविकाच्या प्रयत्नांमुळे चित्रांमधून आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू लागतो. युविकाचे प्रयत्न पाहून मधेच 'गुरूची विद्या गुरूला...' हे वाक्य आठवतं; पण इथे ही विद्या त्या गुरूच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी असते. त्यामुळे अर्थातच या ठिकाणी एक सकारात्मक छटा पाहायला मिळते. 'शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये.' हे का म्हणतात याचा प्रत्यय डॉ. युगची केस पाहताना येतो. एकंदरीत सकारात्मक प्रभाव बघून शेवटी डॉक्टरांनी युगवर केलेला धक्कातंत्राचा वापर काहीसा काळजी करायला लावणारा; पण तितकाच निर्णायकही ठरतो.
व्यसन प्रेमाचे या शीर्षकाचा उलगडा शेवटाकडे जाताना होतो. एकीकडे सूड भावना असतात, तर एकीकडे निःस्वार्थ भावना. व्यसन विळख्यात सापडलेल्या जीवांना अखेर 'प्रेमाचे व्यसन' आपलेसे करते असे म्हणायला हरकत नाही.
या कादंबरीच्या निमित्ताने एक गंभीर सामाजिक विषय आकर्षक लेखनशैलीत वाचायला मिळतो. व्यसन या शब्दासोबत समोर उभं राहणारं नेहमीचं चित्र वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळेपणाने आणि कदाचित कल्पनेपेक्षा तीव्र परिणामांची झलक दाखवून समोर आणलं आहे. शीर्षकाप्रमाणे यात प्रेम तर आहेच; पण प्रेमासोबत एक उत्कटता, एक वेड, एकप्रकारचा झपाटलेपणा, निरनिराळी व्यसनं,... असं बरंच काही आहे. कोणत्याही वळणावर कादंबरी भरकटलेली वाटली नाही.
भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची प्रसंगानुरूप घातलेली सांगड किचकट न वाटता सहजसोपी ठेवणं लेखिकेला छान जमलं आहे. कोर्ट ड्रामा, मानसिक व्यथा अन् उपचार, व्यसनमुक्ती केंद्र, न्याय मिळवून देण्याची धडपड, सूडबुद्धीने निर्माण झालेल्या भावना, व्यसन,... अशी प्रत्येक गोष्ट लेखिकेने उत्तमरीत्या रंगवली आहे. 'माणसाच्या भावनांचा निचरा व्हायला लागला की माणसाची मानसिक स्थिती सुधारतेच; पण त्याच भावना मनात गोठवून ठेवल्या तर माणूस बर्फासारखा गोठून जातो. त्या भावना पाण्यासारख्या वाहत्या झाल्या तर माणूसही पाण्याच्या खळखळाटासारखा प्रवाहित होतो.' यासारखी अनेक वाक्यं आपलीशी वाटून मनात घर करून जातात. खरंतर व्यसनात अडकलेल्या व्यक्तीने हे पुस्तक वाचलं तर त्यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव होऊ शकते. कारण मानसशास्त्रीय समुपदेशन एकप्रकारच्या रंजकतेने इथे अनुभवायला मिळते. हे चित्तवेधक लेखन अभ्यासपूर्ण आहे हे विशेष. सेक्स ॲडिक्शनवर लिहिणं हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण काही विषयांवर सहजासहजी बोललं जात नाही. त्यापैकीच हा सेक्स ॲडिक्शन विषय लेखिकेने कथेत असा काही गुंफला आहे की केवळ स्त्रीच्या लैंगिक शोषणाच्या घटनांऐवजी पुरुषाची बाजू मांडणारी स्थिती स्पष्ट होत जाते. जिथे स्त्री असण्याचा फायदा घेतलेली स्त्री आणि सूड, या दोन्ही गोष्टी अधोरेखित होतात. याही पलीकडे जाऊन विचार केला, तर सेक्स ॲडिक्शनसारख्या गंभीर विषयाला हात घालून एका 'मूक' विषयाला वाचा फोडण्याचं काम लेखिकेने केलं आहे आणि ते अतिशय संयमी शब्दांत; पण तितक्याच ताकदीने समोर आलं आहे. व्यसन आणि व्यसनमुक्ती हा विषय एका वेगळ्या पद्धतीने, अभ्यासपूर्ण, तसेच प्रभावीपणे सादर केला आहे. विषयाचा आवाका लक्षात घेता मोजक्या शब्दांत लेखिकेने मुद्देसूद, उद्बोधक, संवेदनशील, वेगळेपणा जपणारी उत्तम रचना केली आहे असं नक्कीच म्हणता येईल. तांत्रिक चुकासुद्धा दुर्लक्षित करण्यासारख्याच तुरळक आहेत. भाषाशैली, विषय, सखोल अभ्यासपूर्ण लेखन, मांडणी, इ. गोष्टी पाहता कादंबरीचा साहित्यिक दर्जा, छपाई दर्जा अतिशय उत्तम आहे असे म्हणता येईल. ही पहिलीच छापील स्वरूपातील कादंबरी असली, तरी लेखिकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीला साजेशी साहित्यकृती वाचायला मिळते.

प्रेम, व्यसन, दुर्लक्षित आणि मौन बाळगले जाणारे विषय, नानाविध भावनांचा कल्लोळ, गुन्हा, तपासाची धडपड, लपंडाव, आजार, उपचार आणि अशा अनेक छटा अनुभवण्यासाठी ही छोटेखानी पण खिळवून ठेवणारी कादंबरी नक्की वाचून पहा.
© कामिनी खाने (कलात्मक पान)
२२ एप्रिल २०२६
२२ एप्रिल २०२६
पुस्तकासाठी संपर्क : 7020395018
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने