मानसी-3

Mansi

बाबासाहेब मानसीच्या लग्नात तिच्या सासरकडच्यानी जे जे काही मागितलं, त्याला कशालाच नकार न देता, ते देण्याची तयारी करतात.

प्रताप पाटील त्यांची पत्नी विमल तर अगदी आनंदी होतात.
राणाला तर आकाशात ठेवून वाटू लागलं, एक तर त्याला मानसी सारखी एवढी सुंदर पत्नी  भेटली आणि त्यात सासुरवाडी सुद्धा गब्बर भेटली.

प्रताप पाटलांनी तर उद्या पंधरा दिवसातच लग्नाचा मुहूर्त काढला, आणि ते परत त्यांच्या गावी निघाले.
इकडे मानसीच्या घरी तर लग्नाची तयारी चालू झाली,
मानसी घाबरत तिच्या वडिलांसमोर येत, बाबा मला वाटतं का तुम्ही जरा जास्तीतच सामान देतायेत, (ती हात जोडत) बाबा खरं तर कायद्याने हुंडा देण आणि घेणे दोन्हीही बंद आहे, तरी तुम्ही...

एवढ्यात बाबासाहेब स्वतःच्या पत्नीला बघत,
"तिला सांग इथे एक बोलता येतं; पण सासरी तिला अजिबात बोलता येणार नाही.. त्यामुळे मर्यादित जगायला शिक आणि हो माणसाच्या व्यवहारात लुडबुड करू नये, हे सांगायला विसरलीस वाटतं?
बाबासाहेबांची पत्नी कावेरी, लगेच तिथून उठत मानसीला आत मध्ये घेऊन येते, "मानसी काय मूर्खपणा आहे? तुझ्या बाबाने सगळा विचार करून हा निर्णय घेतला आहे. आणि त्या लोकांना आपल्या पैशाची ही गरज नाही एवढी त्यांच्याकडे श्रीमंती आहे...
मानसी आईला बघत,"तर मग आपल्या पैशाची हाव कशासाठी होती?  मी चोरून सगळं ऐकलं आहे, पाच किलो सोना 50 लाख हुंडा आणि थाटामाटात लग्न..
आई, मुलाच शिक्षण तेवढ्या तोलामोलाचा आहे का?
कावेरी- ए बाई असं तुझ्या बाबासमोर काही बोलू नकोस... नाहीतर या वयात ते मला हाकलून देतील. आणि हे शिक्षणाचे उदाहरण ना तुझ्या सासरी गिरवायला शिक. येथे तुझं काही एक चालणार नाही. असं म्हणून कावेरी तिला दम देऊन निघून जाते.

इकडे प्रताप आणि विमल हॉलमध्ये बसतात.

प्रताप विमला बघत स्वतःच्या मिश्या अभिमानाने गोल फिरवत," तर मंडळी, तुम्ही मला मानलत का नाही?
मी तुम्हाला वचन दिल होत ना, का राणा करता असं शोध स्थळ शोधून आणेल का, आयुष्यभर ती कोंबडी आपल्याला सोन्याच अंड देईल.

एवढ्यात रवी तिथे येत, पण त्या कोंबडीला,  लगेचच कापू नका म्हणजे झालं...

प्रताप विमलला बघून, याला सांगा आमच्याशी कमीत कमी वाद घाला म्हणून, तरच आम्ही याचा आयुष्य स्थैरवुन देईल.

रवी- काही गरज नाही..
तो विमल आणि प्रतापच्या पाया पडत, "मी लंडनला निघालोय."
प्रताप त्याला रोखून बघत, "लंडनला निघालास असं कस निघालास? पंधरा दिवसांनी तुझ्या भावाचं लग्न आहे, तुला लग्न बघायचं नाही का?

रवी- कोणाचा जीवाची नाहक बळी जाताना  बघण्यात मला अजिबात इच्छा नाही.

****


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →