मानसी-2

Mansi




इकडे रवी त्यांच्या शेतात येतो, शेतातला तो  थंडगार गारवा त्याच्या मनाला नेहमी भावायचा..

जमिनीने पांघरलेला तो हिरवा शालू त्याला खूप आवडायचा..
तो शेतातल्या जमलेल्या पक्षांना दाणे टाकत होता,

इतक्यात बंदुकीचा आवाज आला आणि क्षणात आकाशात मनसोक्त हिंदोळे घेत उडणार एक पक्षी, क्षणार्धात जमिनीवर लोळत पडलं,

रवी पळत त्या पक्षाजवळ गेला, त्याने त्या पक्षाला वाचवायचा हर्र तरेचा प्रयत्न केला..पण  त्या पक्षाने मान टेकवली...
रवीने त्याच्या तोंडात पाण्याचे दोन थेंब टाकले आणि तो त्याला पुरण्यासाठी जमीन खोदू लागला.
इतक्यात त्याचा मोठा भाऊ राणा तिथे आला.

राणा रवीला बघून हसू लागला..."अरे मुर्खा, तो मी केलेला शिकार आहे, त्याला असं पुरवू नकोस....आण तो पक्षी इकडे..

रवी राणाला उपेक्षित बघत,"अरे या पक्षाने तुझं काय बिघडवलं होतं का या बंदुकाची माज, त्या कमजोर पक्षावर काढलाच?


राणा आता रवीला बघून हसू लागला, अरे ही माज आपल्या सगळ्यांच आभूषण आहे..
घरदार, श्रीमंती, उत्तम शरीरयष्टी हे सगळं भेटल्यावरती माणसाला माज यायलाच हवी, अन जर ती माज आली नाही, तर थु आहे त्या जन्मावर.

रवी त्याला ओरडत...मला तर दया येते तुमच्यासारख्या हैवान लोकांची..
तो आता राणाचं न ऐकता त्या पक्षाला जमिनीत पुरतो..
त्यावर माती टाकताना रवीचे डोळेही पाणावले होते...
राणा घोड्यावरून त्याच्याभोवती गोल फिरत,
"अरे लेका, असंव टिपण्यासाठी माझी रुमाल फेकू का?
असं म्हणून तो राक्षसी हसून तिथून निघून गेला.
जाणाऱ्या राणा कडे रवी रागात बघत," जेव्हा तुमच्या जवळचा हा पैसा निघून जाईल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांची किंमत कळेल..."


रवी आता त्याच्या घरात येतो.
घरात आल्यावर ती तो बघतो का, घरात त्याच्या आईची आवरावर चालू होती..
रवी आईजवळ येत," तर मातोश्री काय चालू आहे?
रवीची आई त्याच्या हातात उशी देत," अरे ह्या अशा व्यवस्थित लाव.. तुला माहित आहे आज इचलकरंजीचे बडे गृहस्थ, त्यांच्या मुलीचा स्थळ आपल्या राणा करता घेऊन येणार आहे.

रवी क्षणभर हापकत," पण आई तुला माहित आहे ना, आपला राना कसा आहे.. म्हणजे मला वाटतं का, त्याचं लग्न करण्यापूर्वी त्याला समज द्यावी.
रवीचे आई विमल त्याला एकटक बघत,"अरे हे आजकालच्या जमानाची थेर आहेत,..आमची लग्न तर नकळत्या वयात व्हायची, आम्हाला कोणी समज देत नव्हतं.. जसं समोरचा साथीदार भेटला, तसं जगायचं.. एवढेच आम्हाला शिकवण भेटत होती..
एवढ्यात प्रताप पाटील तिथे येत,"आहो ऐकलंत का, आपल्या रणदीपचा तर अगोदरच लग्न जमलंय, एकदा या राणाच लग्न जमलं ना, तर आपण दोघांचे बार एकदाच उडवून देऊ.

विमल- अहो पण माझी एक अट आहे, मला मात्र दहा किलो दागिने घडवावे लागणार, तरच मी या लग्नात मिरवेल.

त्यावर प्रताप पाटील हसत आहो यात काय पाच किलो आपण इकडच्या व्याहीला सांगू आणि पाच कीलो तिकडच्या..झाले दहा किलो.

रवी त्या दोघांना बघत ,"आहो पण हूंडा देण घेण दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे..
  बाबा त्यात तर तुम्ही गृहमंत्री आहात ना?

प्रताप पाटील त्याला बघून हसत," विमल कधी कधी आम्हाला वाटतं का, हा चिरंजीव आपला नाही..
विमल प्रताप पाटीलांना बघत आहो तुम्हाला काय माझ्यावर संशय येतो का?
प्रताप पाटील हसत अग संशय नाही, मला वाटतं हा मुलगा हॉस्पिटलमध्येच बदलला असेल.

विमल रवीला बघत तुला किती वेळा सांगितलं आम्हाला उपद्देश देत जाऊ नको.
तुझे तीन भाऊ बघ बाबाच्या शब्दा बाहेरही नसतात..
तू मात्र प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करत असतो. रवी त्या सगळ्यांना बघत, मी उद्याच उच्चशिक्षणाकरता लंडनला निघणार आहे.

त्यावर राणा तिथे येत," का रे भावाच्या लग्नाला थांबायचं नाही का?
रवी- मला लग्न कार्यापेक्षा शिक्षण महत्त्वाचा आहे आणि इथेही कोणाचा बळी जाताना मला बघायचं नाही.
असं म्हणून रवी त्याच्या रूम मध्ये आला, तो मनाशी आपण या लोकांना बदलू शकत नाही आणि यांच्या  समोर आपले तत्वे पायदळी तुडवत जगू शकत नाही..
त्यापेक्षा आपापल्या मार्गी गेलेलं परवडतं.. इतक्यात त्याच्या मोबाईलचा मेसेज चा नोटिफिकेशन वाजलं..

रवी आनंदाने मोबाईल हातात घेतो, कारण त्याला माहीत होता का, हा मेसेज नक्कीच नीताचा असणार.

रवी तिला लगेच रिप्लाय देत, मी उद्याच निघतोय परिवा रात्री आपण नक्की भेटूया.
निता रवी ची कॉलेजमध्ये भेट झाली, दोघांचेही स्वभाव जवळपास सारखेच.. त्यामुळे दोघेही गेल्या तीन वर्षापासून प्रेम संबंधात अडकलेले.

रवीच्या शिक्षणाला आता दोनच वर्ष शिल्लक राहिले..
शिक्षण होताच रवी तिच्यासोबत लग्न करून लंडनला सेटल होणार होता.
नीताचे वडील लंडनलाच उद्योजक आहेत. आणि त्यांचा उद्योग बऱ्यापैकी फायदात आला होता. आणि त्यांनाही रवी जावई म्हणून आवडलेला होता.
रवी सुद्धा तिच्या घरच्यांसोबत अगदी एकरूप झाला..
कारण रवीच व्यक्तिमत्वच असलं प्रभावी होतं, तो ज्ञान वर्धक असल्यामुळे त्याला बिझनेस मधले बारकावे ही माहीत होते..
त्या सोबत तो सगळ्यांना आदबीने बोलायचं त्यामुळे सगळ्यांना तो हवाहवासा वाटायचा.

रवी आता त्यांच्या बगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर निवांत असलेली रूम तिथे स्वतःची बॅग भरत होता.
वर त्याच्या फॅमिली फोटोला बघतो. त्या फोटोवरून तो हात फिरवत," ईश्वरचरणी एकच मागण मागतो, का माणसांप्रमाणे जगायला शिका.
शेवटी माणूसकीच तुमच्या सोबत येणार.. तो त्याची फॅमिली फोटो स्वच्छ पुसत परत भिंतीला अडकवतो..

इतक्यात तिथे काम करणारे मजुर येते..
ती मजुर येताच रवी बेडवर बसत तिच्याशी गप्पा करत होता..

ती ही रवीला व्यवस्थित बोलत होती. घरातल्या नोकरचाकारांना रवी खूप आवडायचा..

कारण तो त्यांना नोकरचाकर कधीच समजत नव्हता...समजायचा तर माणूस आणि तो सगळ्यांनाच खूप रिस्पेक्ट द्यायचा..
  तर असा हा रवी भावाच्या लग्ना करता न थांबतात लंडनला रवाना होतो.

इकडे मानसी प्रताप पाटलांच्या घरच्यांसमोर चहा घेऊन येते,
सगळे मानसीवर नजर टाकतात,
राणा मानसीला बघत तिथेच उत्तर देत, मला मुलगी पसंद आहे..
तर मानसीला लाजेमुळे वर बघायची इच्छा सुद्धा झाली नाही.
तरीही ती संकोचत वरती बघते तेव्हा रानाच  दांडग शरीर तीला क्षणभरासाठी भावलं होतं. तिच्या वडिलांनी इशारा करताच मानसी आत मध्ये जाते.

पण मानसी हिरमोड होतो.. कारण प्रताप पाटलाने दुसऱ्या क्षणी 50 लाख रुपये आणि जवळपास 50 किलोचे सोनं बनवणं, एवढी आट टाकली.
तर मानसीच्या वडिलांनी कशाचही नकार दिला नाही त्यांनी लगेच होकार देत,"ठीक आहे आम्ही सगळे तयारी करू..

*****


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →