मानसी-1

तीचा संसार
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यातील बाबासाहेब धोडों पाटील, यांची एकुलती कन्या मानसी...बाबासाहेबांनी त्यांच्या मुलीला अगदी राजकन्येप्रमाणे ठेवलं होतं,
तिचे काम करण्यासाठी घरात नोकरचाकर यांची राबता ....
त्यामुळे तिला कामाची एवढी ही सवय नव्हती,

त्याच बरोबर खोटी आनबाणशान या करता बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलीवरती खूप बंधने लावली होती,
जसे की एकटी कुठे ही जायचं नाही, ज्या बाबासाहेबाचे स्वतःचे चार पाच सहकारी बॅंक होते...
स्वतःच्या मुलीला मात्र एकही बँक अकाउंट तिच्या नावावर काढू दिले नाही.
ती परक्याचं धन असल्यामुळे तिची केवळ हौस-मौज भागवण्या पुरताच पैसा मिळायचा..
त्यांनी तिच्या नावावर कोणती प्रॉपर्टी ही ठेवली नव्हती, ना कोणतं आर्थिक स्थैर्यता मिळेल असं काही सुविधा पण केली नव्हती..
फक्त नावलौका पूरता तिला शिक्षण दिलं गेलं, पण या शिक्षणातही त्यांनी त्यांचीच मक्तेदारी ठेवली...
घरात  तिला जी हवे ते सर्व प्रकारचे पुस्तके होते.   मानसी केवळ परीक्षा पुरताच कॉलेजला जायची. तेही चार-पाच व्यक्तीच्या देखरेखे खाली.
बघता बघता मानसीच शिक्षण ही संपलं, आता बाबासाहेबांना घाई होती तिला या पिंजऱ्यातून काढून दुसऱ्या पिंजऱ्यात पाठवायची...
आणि  त्यांनी त्यांच्या नावलौकिकाप्रमाणे स्थळे ही शोधल..
अन ते स्थळ होतं आमदाराच्या मुलाचं...
आमदार प्रताप पाटील यांचा मुलगा राणा पाटील, नावाप्रमाणेच दांडगा अस व्यक्तिमत्व...

प्रताप पाटलांना चार मुलं आणि 2 मुली असा मोठा परिवार होता.. आणि हा परिवार केवळ एका बाईमुळे नाहीतर त्यांचा 2 बायकांमुळे झाला आहे...
त्यांची एक बायकोला दोन्ही मुलीच त्यामुळे त्याने त्याचांच बायकोच्या बहिणी सोबत दुसऱ लग्न केलं आणि तिच्याकडून चार मुल होऊन मोठा कुटुंब वाढल्या गेलं.
या घरादारावरती प्रताप पाटलाची अंकुश होतं, घरातल्या स्त्रियांच जगण तर जनावराप्रमाणे असल्यासारख फक्त गळ्यात पट्टे नव्हते एवढाच काय तो फरक...

प्रताप पाटलाचे 2 मुले त्यांच्याच वळणावर गेली मात्र 2 लहान मुलं त्यांच्यावर शिक्षणाच्या प्रभावामुळे ते अगदी सभ्य आणि सु-संस्कृत झाली होती....

त्यांचा लहान मुलगा तर परदेशी शिकायचा त्यामुळे त्याच्या मनावरती तर लोकतंत्र, स्त्रियांविषयी आदर हे सगळे मूलतत्त्व रुजलेले आहेत,
पण नियती आता त्याच्यासोबत असा खेळ खेळणार होती का घर किंवा कर्तव्य यापैकी एकच निवडायच मार्ग शिल्लक होता.

तर इकडे मानसीला नियतीने असं खेळवलं पण तीला  नवऱ्याकडून मातृत्व सूख भेटलं नाही, त्यामुळे तिच्या सासू-सासर्‍यांनी
स्वतःच्या लहान मुलांसमोर तिला मातृत्व देण्यासाठी उभा केलं,

मानसी या सगळ्यातून धक्क्यातून सावरतेनं सावरते तेच तिच्या समोर वेगवेगळी संकटे उभी होत होती...
आता या मानसी आणि रवी या वळणावरती कसे टिकून राहतील, यावर आधारित ही कथा मालिका आहे.

ही कथा मालिका मी स्वतः रचलेली आहे,   त्याचे कायदेशीर अधिकार माझ्याकडे सुरक्षित आहे, जर कोणी कॉपी करायचा प्रयत्न केला तर कारले कायदेशीर कारवाई केली जाईल अन तसेही ही कथा मालिका काल्पनिक असून, याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही.


मानसी ही दिसायला नाजूक, गोरी...
चुकून झोपताना गालावर बोट जरी दाबल्या गेल, तरीही तीचे गाल अर्धा तास लाल भडक राहायचे,
तिचे घारे डोळे, चाफेकळी सारख नाक..
ऐका सुदंर सकाळी मानसी बेडवरून उठून पायात मखमली चप्पल घालते..

ती हळूहळू करत खिडकीजवळ येते, खिडकीतून स्वतःच्याच बंगल्यातील बाग बघत होती,

बागेत वेगवेगळे प्रकारचे पक्षी उडत होते, त्यांचा तो किलबिलाट तिच्या मनाला भावात होत...

नेमक सूर्योदय होऊ लागला, त्याचे गुलाबी किरणांनी तिच्या आयुष्यातील नव्या अशा जिवंत होत होत्या,

कारण कालच मानसीचे वडील तिच्या आईला  मानसीच्या लग्नाविषयी बोलू लागले होते.

बाबासाहेब म्हणत होते का, मानसीकरता जळगावच्या पाटलाच्या पोराचा स्थळ आलंय,
आपली मुलगी मोठी सून होईल चारी जावावर राज करेल राज.

हे मात्र ते अभिमानाने सांगू लागले, पण बिचाऱ्या मानसीला नवीन आशा याची होती का आता निदान नवर्याकडे गेल्यावर तरी तिला स्वातंत्र्य आयुष्य जगता येईल...
ती क्षणभरासाठी डोळे झाकताच तिला वाटत होत, का या पक्षांप्रमाणे ती सुद्धा आकाशात उडेल, तिला हवं तेव्हा, हवं तिथे ती जाऊ शकेल....

*****



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →