मन लिहित राहिलं
आयुष्याच्या प्रवासात आपण खूप काही बोलतो,
पण सगळंच व्यक्त करतो असं नसतं..
काही भावना, काही प्रसंग, काही नाती मनातच राहून जातात.
पण सगळंच व्यक्त करतो असं नसतं..
काही भावना, काही प्रसंग, काही नाती मनातच राहून जातात.
बाहेरून सगळं सुरळीत दिसत असलं , तरी आत कुठेतरी शब्दांची गर्दी वाटते..
शब्द ओठांपर्यंत येतात, पण व्यक्त होत नाहीत आणि तेव्हाच मन आपला वेगळा मार्ग शोधतं....लिहिण्याचा.
शब्द ओठांपर्यंत येतात, पण व्यक्त होत नाहीत आणि तेव्हाच मन आपला वेगळा मार्ग शोधतं....लिहिण्याचा.
मन लिहित राहतं…
कधी कागदावर,
कधी डायरीत,
तर कधी फक्त आठवणींच्या पानांवर....
कधी कागदावर,
कधी डायरीत,
तर कधी फक्त आठवणींच्या पानांवर....
जे बोलता येत नाही, ते शब्द बनून उमटतं...
त्या शब्दांत कधी आनंद असतो, कधी वेदना,
कधी अपूर्ण स्वप्नं, तर कधी गोड आठवणी....
लिहिताना मन हळूहळू हलकं होत जातं.
जणू काही स्वतःशीच संवाद सुरू असतो ,
कोणत्याही दिखाव्याशिवाय, कोणत्याही भीतीशिवाय.
कधी कधी स्वतःलाच समजून घेण्यासाठी लिहिल जातं....
“मला नेमकं काय वाटतंय?” या प्रश्नाचं उत्तर शोधताना शब्द आपोआप वाहू लागतात.
त्या शब्दांतूनच स्वतः ची ओळख पुन्हा उलगडू लागते,
मनात साचलेला गोंधळ, अस्वस्थता, राग, प्रेम....
सगळं काही त्या शब्दांत उलगडत...
लिहिणं म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नाही,
तर ती एक शांत प्रक्रिया, जिथे मन स्वतःला मोकळं होतं..
त्या प्रत्येक ओळीत काहीतरी अर्थ दडलेला असतो,
एक अनुभव, एक जखम, एक स्वप्न.
म्हणूनच कधी कधी लिहिलेलं वाचताना
पुन्हा त्या क्षणात हरवलं जाते मन,
पुन्हा तोच अनुभव अनुभवते मन.
मन कधी थकत नाही… ते सतत काहीतरी अनुभवत राहतं,
साठवत राहतं आणि योग्य क्षणी ते सगळं शब्दांत उतरवत राहतं..
कधी हसत, कधी रडत, कधी शांतपणे… पण थांबत नाही.
शेवटी, मनातलं बोलायला कोणी मिळो किंवा न मिळो…
ते स्वतःसाठी तरी लिहितच राहतं...
कारण....मनाचं खरं बोलणं कधी शब्दांत,
तर कधी लेखनातच सापडतं…
बोलण्यापेक्षा शब्दांत व्यक्त होणं
कधी मनाला शांत करून जातं,
नको ते गैरसमज, बोलण्यातला कडूपणा,
शब्दांच्या दुनियेतला ओलावा हवा ....
जिथे कोणी काही विचारत नाही, जिथे फक्त मन बोलतं.
आणि शब्द शांतपणे ऐकत राहतात…
कधी कधी हे शब्दच आपले होऊन जातात..
आपल्याला समजून घेणारे, न सांगताही सगळं जाणणारे…
मनातलं सगळं जेव्हा हळूहळू कागदावर उतरायला लागतं,
तेव्हा कळतं किती काही आत साठलं होतं.
काही ओळी अपूर्णच , काही शब्द मध्येच थांबतात,
पण तरीही तेच सगळं मनात कुठेतरी जपलं जातं…
डायरीचं पानं म्हणजे फक्त कागद नसतो.
आपल्या भावनांचा तो साक्ष असतात…
शांत, पण सगळं सांगणाऱ्या… न बोलता मनातलं जपून ठेवणाऱ्या…
कधी सहज जुनं काही वाचलं, की हलकंसं हसू येतं…
“हे मीच लिहिलं होतं?” असं स्वतःलाच वाटतं…
आणि कधी काही शब्द पुन्हा डोळे पाणावून जातात…
कारण ते फक्त शब्द नसतात… ते त्या क्षणांचं जगलेलं सत्य असतं…
हळूहळू समजत मोकळं व्हायला नेहमी कोणीतरी लागत नाही…
कधी कधी शब्दच पुरेसे असतात…
शब्द काही बोलत नाहीत , पण सगळं ऐकून घेतात…आणि निःशब्दपणे सोबत राहतात…
म्हणूनच कदाचित मन थांबत नाही…
ते पुन्हा काहीतरी अनुभवतं…पुन्हा साठवतं…आणि पुन्हा… हळूच लिहितं…
कारण शेवटी मनाला एवढंच जमतं…
जाणवणं आणि लिहिणं म्हणूनच.
मन असंच… लिहित राहिलं… ✍️
