Login

नवीन शरीर

Manjulika
“आता मला नवीन शरीर मिळालं…”

सुनंदाच्या तोंडातून तो आवाज बाहेर पडताच आण्णाच्या अंगावर काटा आला.

ती हळूहळू उभी राहिली.

पण ती सुनंदा वाटत नव्हती.

तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते.

ओठांवर विचित्र हसू.

आण्णा घाबरून मागं सरकला.

“सुनंदा…!”

ती हसली.

पण तो आवाज अनेक लोकांचा होता.

“सुनंदा आता आमची आसा…”

मंजुलिका किंचाळली, “नाय! तिच्या शरीरात जाऊ नका!”

महाशक्तीचा काळा धूर अजूनही सुनंदाभोवती फिरत होता.

तिचे केस हवेत उडत होते.

संपूर्ण तळघर हादरत होतं.

रखवालदाराने काठी उचलली.

“तिला थांबवायला लागेल!”

तो मंत्र म्हणू लागला.

क्षणात काठीच्या टोकातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला.

तो प्रकाश सुनंदाकडं गेला.
पण अचानक

सुनंदाने जोरात किंकाळी फोडली.

“आऽऽऽ!”

आण्णा हादरला.

“तिला त्रास होतोय!”

रखवालदार ओरडला, “महाशक्ती तिच्या आत शिरतीय!”

सुनंदा जमिनीवर तडफडू लागली.

तिचे हातपाय विचित्र वाकडे होत होते.

भिंतींवरच्या सावल्या वेड्यासारख्या नाचत होत्या.

आण्णाच्या डोळ्यांत पाणी आलं.

“तिला वाचवा!”

मंजुलिका अचानक पुढं आली.

ती सुनंदाजवळ बसली.

तिच्या कपाळावर हात ठेवला.

क्षणात तळघरात थंड वारा फिरला.

सुनंदाची तडफड थोडी थांबली.

महाशक्ती रागानं गर्जली.

“तू पुन्हा आमच्या आड येतीयस!”

मंजुलिकाच्या डोळ्यांत अश्रू होते.

“निर्दोषांना सोडा…”

महाशक्ती हसली.

“निर्दोष?”

क्षणात तळघराच्या भिंतींवर नवीन दृश्य दिसू लागलं.

आण्णा आणि सुनंदा थक्क झाले.

त्या दृश्यात…

लहानपणीचा आण्णा दिसत होता.

वाड्यात खेळताना.

आणि त्याच्या मागं उभी होती एक सावली.

ती सावली त्याच्याकडे पाहत कुजबुजत होती

“हा पुढचा वारस…”

आण्णा घाबरला.

“हे काय आसा?”

रखवालदार गंभीर झाला.

“तुला निवडलं गेलं होतं.”

“कशासाठी?”

रखवालदाराने डोळे बंद केले.

“या वाड्याचा पुढचा रक्षक बनण्यासाठी.”

आण्णा हादरला.

“म्हणजे… माझं इथं येणं योगायोग न्हवतं?”

मंजुलिका हळू आवाजात म्हणाली, “वाडा तुला परत बोलवत होता…”

तेवढ्यात सुनंदा अचानक हवेत तरंगू लागली.

तिच्या तोंडातून काळा धूर बाहेर येत होता.

ती डोळे उघडून सरळ आण्णाकडं पाहू लागली.

आणि तिच्या तोंडातून महाशक्तीचा आवाज घुमला
“जर तिला वाचवायचं असेल… तर एक आत्मा कायमचा या वाड्यात बांधला जाईल.”

तळघरात शांतता पसरली.

आण्णाचा श्वास अडखळला.

“कोणाचा आत्मा?”

महाशक्ती हळूहळू हसली.

आणि म्हणाली

“तुझा…”

अण्णा हादरून गेले

क्रमशः…
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →