“आता उशीर झाला…”
मंजुलिकाचा आवाज ऐकताच आण्णाच्या अंगातून थंड लहर गेली.
तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते.
चेहऱ्यावर विचित्र शांत हसू.
आणि समोर…
ती भयानक जळालेली आकृती हळूहळू पुढं येत होती.
तिच्या प्रत्येक पावलागणिक जमिनीवर काळे डाग पडत होते.
टक…
टक…
टक…
सुनंदा रडत आण्णाच्या मागं उभी राहिली.
“आपण इथून जाऊया…”
पण तळघराचा जिना आता गायब झाला होता.
जिथं जिना होता…
तिथं फक्त काळी भिंत उभी होती.
आण्णा हादरला.
“हे कसं शक्य आसा?”
रखवालदार गंभीर आवाजात म्हणाला, “ती जागी झाली की वाडा तिच्या ताब्यात जातो.”
महाशक्तीचं हसू घुमलं.
“शेकडो वर्षं आम्ही अंधारात तडफडलो…”
तिच्या आवाजात अनेक आत्मे बोलत होते.
“आता तुमची वेळ.”
अचानक तळघरातलं तापमान बदललं.
क्षणात प्रचंड उकाडा जाणवू लागला.
भिंती लालसर दिसू लागल्या.
जणू संपूर्ण वाडा जळत होता.
सुनंदा खोकू लागली.
“धूर…!”
काळा धूर हळूहळू सगळीकडे पसरत होता.
त्या धुरात चेहरे दिसत होते.
वेदनांनी ओरडणारे चेहरे.
आण्णा डोळे बंद करून मागं सरकला.
पण अचानक कुणीतरी त्याचा हात पकडला.
मंजुलिका.
यावेळी तिचा स्पर्श थंड नव्हता.
तो माणसासारखा होता.
ती हळू आवाजात म्हणाली, “मी हे थांबवू शकते…”
रखवालदार रागानं ओरडला, “तिच्यावर विश्वास ठेवू नकोस!”
मंजुलिकाच्या डोळ्यांत अश्रू आले.
“मला सूड नको होता… मला फक्त मुक्ती हवी होती…”
महाशक्ती अचानक थांबली.
तिने मंजुलिकेकडं पाहिलं.
“खोटं.”
“खोटं.”
क्षणात तिच्या शरीरातून काळे हात बाहेर आले.
डझनभर.
ते हात हवेत वेडेवाकडे हलत होते.
सुनंदा किंचाळली.
“देवा!”
ते हात सरळ मंजुलिकेकडं झेपावले.
मंजुलिका हवेत फेकली गेली.
धाड!
ती भिंतीवर आदळली.
आण्णा ओरडला, “मंजुलिका!”
महाशक्तीचा आवाज घुमला
“तू आम्हाला फसवलंस.”
“तू आम्हाला फसवलंस.”
मंजुलिका वेदनेनं तडफडत होती.
“मी… मी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला…”
रखवालदार गंभीर झाला.
“काय म्हणतीय ती?”
अचानक तळघराच्या भिंतींवर पुन्हा दृश्यं दिसू लागली.
यावेळी सत्य वेगळंच होतं.
त्या रात्री…
मंजुलिका लोकांना थांबवत होती.
“त्यांना कैद करू नका!” ती रडत ओरडत होती.
पण आण्णाचे आजोबा काळं पुस्तक घेऊन मंत्र म्हणत होते.
आत्मे जबरदस्तीने त्या लोखंडी खोलीत बंद केले जात होते.
मंजुलिका मध्ये आली.
आणि तेव्हाच
तिला जिवंत आत ढकलण्यात आलं.
तिला जिवंत आत ढकलण्यात आलं.
आण्णाचे डोळे मोठे झाले.
“म्हणजे… ती दोषी न्हवती?”
रखवालदार शांत झाला.
पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत होता.
महाशक्ती मात्र आणखी रागानं थरथरू लागली.
“सगळे दोषी आहेत!”
“सगळे दोषी आहेत!”
क्षणात तळघर हादरलं.
वरून मोठ्ठा दगड खाली कोसळला.
धाड!
सुनंदा थोडक्यात वाचली.
आण्णा धावत तिच्याकडं गेला.
तेवढ्यात…
महाशक्तीनं हात वर केला.
आणि काळा धूर सरळ सुनंदाकडं झेपावला.
सुनंदाचे डोळे अचानक पूर्ण काळे झाले.
ती हळूहळू वर पाहू लागली.
आणि तिच्या तोंडातून दुसऱ्याच कुणाचा आवाज बाहेर आला
“आता मला नवीन शरीर मिळालं…”
“आता मला नवीन शरीर मिळालं…”
क्रमशः…
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
