आण्णाच्या हातातून कंदील जवळजवळ निसटला.
तो थरथरत त्या रखवालदाराकडे पाहत राहिला.
तो चेहरा…
अगदी त्याच्यासारखा.
सुनंदा घाबरून मागं सरकली.
“आण्णा… हा… हा तुमच्यासारखा दिसतोय…”
तळघरात अचानक विचित्र शांतता पसरली.
फक्त लोखंडी दाराच्या आतून येणारा आवाज ऐकू येत होता.
ठक… ठक…
रखवालदार हळूहळू पुढं आला.
त्याच्या डोळ्यांत काळा धूर फिरत होता.
“कारण मी तुझ्याच रक्तातला आसा…”
आण्णाच्या अंगावर काटा आला.
“तू… कोण?”
रखवालदाराने काठी जमिनीवर टेकवली.
“या वाड्याचा पहिला वारस.”
आण्णा गोंधळला.
“पण ते कसं शक्य आसा?”
रखवालदाराचं हसू भयानक होतं.
“कारण मी मेलो नाय… मला बांधून ठेवलं गेलं.”
सुनंदा कुजबुजली, “देवा…”
अचानक तळघरात थंड वारा फिरला.
भिंतीवरच्या सावल्या हलू लागल्या.
रखवालदाराचा आवाज आता गंभीर झाला.
“तुझ्या घराण्यानं काळी विद्या केली होती.”
आण्णा हादरला.
“खोटं!”
“सत्य.”
रखवालदार पुढं म्हणाला, “या वाड्याखाली आत्मे कैद करून शक्ती मिळवली जात होती.”
सुनंदाच्या डोळ्यांत भीती भरली.
“म्हणजे हे सगळं…”
“पापाचं फळ.”
अचानक लोखंडी दार जोरात हादरलं.
धाड!
आतून मंजुलिकाचा आवाज आला
“मला बाहेर काढा!”
“मला बाहेर काढा!”
आण्णा दाराकडं धावला.
पण रखवालदाराने त्याचा हात पकडला.
त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड होता.
“दार उघडलंस तर सगळं संपेल.”
आण्णा ओरडला, “तिला त्यांनी जिवंत पुरलं होतं!”
रखवालदाराचे डोळे लाल झाले.
“ती एकटी न्हवती.”
क्षणात तळघराच्या भिंतींवर विचित्र दृश्यं दिसू लागली.
जणू भिंती जिवंत झाल्या.
अनेक लोक.
बंद खोली.
किंकाळ्या.
आग.
आणि त्या सगळ्यांच्या मध्ये उभा होता एक माणूस उभा होता
आण्णाच्या आजोबांसारखा.
त्याच्या हातात काळं पुस्तक होतं.
तो मंत्र म्हणत होता.
आणि एकामागोमाग एक आत्मे त्या लोखंडी खोलीत कैद होत होते.
सुनंदा रडू लागली.
“हे काय पाप होतं…”
“हे काय पाप होतं…”
रखवालदार हळू आवाजात म्हणाला, “मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला.”
“मग?”
“त्यांनी मलाही मारलं.”
आण्णा हादरला.
“म्हणजे तू…”
“या वाड्याचा पहिला बळी.”
क्षणात लोखंडी दारावर भेगा पडू लागल्या.
टक… टक… टक…
दाराच्या फटीतून काळा धूर बाहेर येऊ लागला.
मंजुलिकाचा आवाज आता बदलला होता.
तो एकट्या बाईचा आवाज नव्हता.
अनेक आवाज एकत्र बोलत होते
“आम्हाला मुक्त करा…”
“आम्हाला मुक्त करा…”
संपूर्ण तळघर हादरू लागलं.
वरून माती पडू लागली.
सुनंदा घाबरून ओरडली, “वाडा कोसळणार!”
रखवालदार रागानं गर्जला.
“ती बाहेर आली तर कुणीच जिवंत राहणार नाय!”
पण तेवढ्यात…
लोखंडी दाराच्या मधोमध मोठी भेग पडली.
खळक!
आणि त्या फटीतून एक डोळा दिसला.
पूर्ण काळा.
पण त्यात लाल अश्रू वाहत होते.
आण्णाचा श्वास थांबला.
कारण तो डोळा…
