Login

तळघरातलं सत्य

Manjulika

ठक… ठक… ठक…

तो आवाज आता आणखी स्पष्ट येत होता.

जमिनीखालून.

जणू कुणीतरी बंद जागेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं.

सुनंदा थरथरत मागं सरकली.

“आण्णा… हा आवाज खालीतून येतोय…”

आण्णाचं हृदय जोरात धडधडत होतं.

मंजुलिकाचे शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते
“माझं प्रेत अजून या वाड्यातच पुरलंय…”

रखवालदार अचानक ओरडला, “कोणीही तळघर उघडणार नाय!”

त्याचा आवाज घुमताच भिंती हादरल्या.

पण त्याच क्षणी जमिनीवर पुन्हा जोरात आवाज झाला.

धाड!

कॉरिडॉरच्या मधली जुनी फरशी तडकली.

फटीतून थंड धूर बाहेर येऊ लागला.

आण्णा हळूहळू त्या फटीजवळ गेला.

त्याने कंदील उचलून खाली प्रकाश टाकला.

खाली अंधारात जुना जिना दिसत होता.

दगडी.

धुळीनं भरलेला.

सुनंदा घाबरून म्हणाली, “देवासाठी तिकडं जाऊ नका…”

पण आण्णाच्या मनात आता एकच गोष्ट होती

सत्य.

त्याने खोल श्वास घेतला.

“आज सगळं कळणार.”

तो खाली उतरू लागला.

चर्र…

जिना प्रत्येक पावलागणिक कुरकुरत होता.

सुनंदा रडत त्याच्या मागं गेली.

वर रखवालदार रागानं गर्जत होता.
“परत या!”

पण त्याचा आवाज आता दूर जात होता.

तळघरात प्रचंड थंडी होती.

भिंतींवर काळी बुरशी.

जाळ्या.

आणि हवेत विचित्र कुजका वास.

सुनंदा नाक झाकत म्हणाली, “इकडं काहीतरी मरलंय…”

तेवढ्यात आण्णाचा पाय कुठल्यातरी वस्तूला लागला.

टक!

त्याने कंदील खाली केला.

आणि दचकला.

जमिनीवर मानवी कवटी पडली होती.

सुनंदा किंचाळली.

“आऽऽ!”

आण्णा मागं सरकला.

पण तिथं फक्त एक कवटी नव्हती.

संपूर्ण तळघरात हाडं विखुरलेली होती.

जणू अनेक लोकांना इथं मारलं गेलं होतं.

भिंतीवर जुन्या रक्ताचे डाग होते.

आणि मध्ये…

मोठ्ठं लोखंडी दार.

त्या दारावर विचित्र चिन्हं कोरलेली.

कुंकू.

राख.

काळे हाताचे ठसे.

ठक… ठक… ठक…

आवाज त्या दाराच्या आतून येत होता.

सुनंदा रडू लागली.

“उघडू नका…”

पण आण्णाने दारावर हात ठेवला.

क्षणात त्याच्या अंगातून विजेसारखा झटका गेला.

त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा दृश्य चमकलं

मंजुलिका जिवंत होती.

ती रडत होती.

काही लोक तिला ओढत तळघरात आणत होते.

त्यात एक वृद्ध माणूस होता.

गळ्यात चांदीचं लॉकेट.

तोच लॉकेट.

आण्णा हादरला.

“हा… माझा आजोबा?”

त्या वृद्धाने रागानं ओरडलं

“ही मुलगी वाड्यावर शाप आसा!”

मंजुलिका रडत म्हणाली, “मी फक्त प्रेम केलं…”

पण कुणी ऐकलं नाय.

त्यांनी तिला त्या लोखंडी खोलीत ढकललं.

आणि जिवंत बंद केलं.

धाड!

आण्णा भानावर आला.

त्याच्या डोळ्यांत पाणी होतं.

“तिला… जिवंत पुरलं होतं…”

अचानक लोखंडी दाराच्या आतून आवाज आला.

कमजोर.

तुटका.

“आण्णा…”

सुनंदा थरथरली.

“आत… अजून कुणीतरी आसा…”

दारावरचे हाताचे ठसे हळूहळू ताज्या रक्तासारखे लाल होऊ लागले.

आण्णाचा श्वास अडखळला.

आणि तेवढ्यात…

त्याच्या मागून कुणीतरी कुजबुजलं
“दार उघडू नकोस…”

तो घाबरून मागं वळला.

आणि त्याचे डोळे मोठे झाले.

मागं…

रखवालदार उभा होता.

पण यावेळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता.
तो चेहरा…

आण्णासारखाच होता.

क्रमशः…
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →