Login

वाड्याचा शाप

Manjulika

“आता पुढचा तू…”

रखवालदाराचा आवाज घुमताच संपूर्ण वाडा हादरला.

आण्णाच्या पायाखालची जमीन थरथरू लागली.

भिंतींवरच्या जुन्या चित्रांना तडे जाऊ लागले.

सुनंदा रडत आण्णाचा हात पकडून म्हणाली, “आपण इथून पळूया!”

पण आण्णा जागच्या जागी थिजला होता.

त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही तेच दृश्य फिरत होतं

जळणारी मंजुलिका…

लोकांच्या किंकाळ्या…

आणि त्या गर्दीत उभा असलेला एक माणूस.

त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

पण गळ्यातलं चांदीचं लॉकेट मात्र स्पष्ट होतं.

तेच लॉकेट…

आण्णाच्या गळ्यातही होतं.

आण्णाच्या छातीत धस्स झालं.

“नाय… हे शक्य नाय…”

मंजुलिका त्याच्याकडे पाहत कुजबुजली, “तुम्ही त्याच रक्ताचे आहात…”

सुनंदा गोंधळली.

“काय म्हणतीय ही?”

रखवालदार जोरात गर्जला.

“त्या घराण्यानं पाप केलं होतं!”

क्षणात कॉरिडॉरच्या भिंतींवर काळे डाग उमटू लागले.

ते डाग हळूहळू माणसांच्या चेहऱ्यांसारखे दिसू लागले.

रडणारे चेहरे.

ओरडणारे चेहरे.

जणू वाड्यात अडकलेले आत्मे.

ते सगळे एकाच आवाजात कुजबुजू लागले

“सूड… सूड…”

आण्णाचे कान बंद पडू लागले.

तो गुडघ्यावर बसला.

“माझा काही संबंध नाय…”

मंजुलिका रागाने ओरडली, “आसा! तुमच्या घराण्यानंच मला जिवंत जाळलं!”

अचानक तिचे डोळे लाल झाले.

तिचे केस हवेत वेडेवाकडे फिरू लागले.

संपूर्ण वाड्यात वादळ उठल्यासारखा आवाज घुमू लागला.

सुनंदा भीतीनं मागं सरकली.

“ती पुन्हा बदलतीय…”

मंजुलिकाचा चेहरा आता भयानक झाला होता.

“मी या वाड्यात परत आले… माझा हक्क घ्यायला!”

ती हवेत तरंगू लागली.

भिंतींवरच्या सगळ्या काचा फुटू लागल्या.

खळक! खळक!

रखवालदाराने पुन्हा काठी आपटली.
धाड!

क्षणात काळ्या साखळ्या हवेतून बाहेर आल्या.

त्या सरळ मंजुलिकेकडं झेपावल्या.

मंजुलिका किंचाळली.

“नाहीऽऽ!”

साखळ्यांनी तिचे हात पकडले.

ती हवेत तडफडू लागली.

आण्णाला तिच्या डोळ्यांत भीती दिसत होती.

खरी भीती.

ती राक्षसासारखी वाटत होती… पण तिच्या वेदना खऱ्या होत्या.

अचानक मंजुलिकाने आण्णाकडं पाहिलं.

“तळघर उघडा…”

आण्णा दचकला.

“कसलं तळघर?”

ती धापा टाकत म्हणाली, “या वाड्याखाली… सगळं सत्य लपवलंय…”

रखवालदार रागाने गर्जला.

“शांत राहा!”

त्याच्या डोळ्यांतून काळा धूर बाहेर पडू लागला.

साखळ्या अजून घट्ट झाल्या.

मंजुलिकाचा आवाज तुटू लागला.

“तळघरात… माझं शरीर…”

हे ऐकताच आण्णा हादरला.

“काय?”

मंजुलिका रडत ओरडली

“माझं प्रेत अजून या वाड्यातच पुरलंय!”

क्षणात सगळीकडे शांतता पसरली.

सुनंदाच्या तोंडातून शब्दच फुटेना.

आण्णाच्या हातातून कंदील खाली पडला.

फुस्स…

पुन्हा अंधार.

आणि त्या अंधारात…

खालून कुठूनतरी आवाज यायला लागला.

ठक… ठक… ठक…

जणू वाड्याच्या जमिनीखालून कुणीतरी दार वाजवत होतं…

क्रमशः…
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →