Login

जागा घेतलेला आत्मा

Manjulika

सगळ्या सावल्या आण्णाकडं झेपावल्या.

सुनंदा भीतीनं किंचाळली.

“आऽऽण्णा!”

क्षणात खोलीत बर्फासारखी थंडी पसरली.

कंदील जोरात फडफडू लागला.

सावल्या आण्णाच्या अंगाभोवती फिरू लागल्या.

त्याला श्वास घेणं कठीण झालं.

जणू कुणीतरी त्याचा गळा दाबत होतं.
“माझा… आहे…”

तोच खरखरीत आवाज पुन्हा घुमला.

आण्णाचे डोळे लाल व्हायला लागले.

सुनंदा रडत त्याला हलवू लागली.

“आण्णा! डोळे उघडा!”

तेवढ्यात मंजुलिका धावत पुढं आली.

तिने हातातलं काळं मंगळसूत्र त्या काळ्या वर्तुळात फेकलं.

धाड!

क्षणात खोलीभर किंकाळ्या घुमल्या.

सावल्या मागं सरकल्या.

भिंतींवर विचित्र ओरखडे उमटू लागले.

टक… टक… टक…

जणू कुणीतरी नखांनी भिंती फाडत होतं.

आण्णा जमिनीवर कोसळला.

त्याचा श्वास धापा टाकत चालू होता.

सुनंदा त्याच्याजवळ बसली.
“देवा… वाचवा…”

मंजुलिका मात्र घाबरून मागं पाहत होती.

कॉरिडॉरच्या शेवटी काळोख दाटत चालला होता.

आणि त्या अंधारातून कुणीतरी हळूहळू बाहेर येत होतं.

उंच सावली.

डोक्यावर पागोटं.

हातात मोठी काठी.

त्याचे पाय जमिनीला टेकत नव्हते.

तो हवेत तरंगत होता.

सुनंदाच्या तोंडातून शब्दच फुटेना.
“हा… कोण?”

मंजुलिकाच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती.

ती कुजबुजली
“वाड्याचा रखवालदार…”

तो आत्मा जवळ येऊ लागला.

त्याचा चेहरा पूर्ण काळा.

फक्त डोळे पांढरे.

आण्णा कसाबसा उठला.

“हा काय आसा?”

मंजुलिका हळू आवाजात म्हणाली, “या वाड्यात ज्या आत्म्यांना कैद केलं गेलं… त्यांना सांभाळणारा.”

कॉरिडॉरमध्ये अचानक जोराचा वारा सुटला.

खिडक्या धाडधाड आपटू लागल्या.
आणि त्या रखवालदाराचा आवाज घुमला
“मंजुलिका…”

त्याचा आवाज ऐकताच संपूर्ण वाडा हादरला.

मंजुलिका मागं सरकली.

पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर असहाय्यता दिसत होती.

“मी परत जाणार नाय…” ती ओरडली.

रखवालदाराने काठी जमिनीवर आपटली.

धाड!

क्षणात जमिनीवर काळ्या रेषा उमटल्या.

त्या रेषा सरपटत मंजुलिकेकडं जाऊ लागल्या.

जणू जिवंत साप.

मंजुलिका किंचाळली.

तिचे केस हवेत उडू लागले.

“आण्णा! मला वाचवा!”

आण्णा गोंधळला.

हीच मंजुलिका काही वेळापूर्वी त्यांना घाबरवत होती.

आता ती मदत मागत होती.

सुनंदा ओरडली, “तिच्यावर विश्वास ठेवू नका!”

पण अचानक आण्णाच्या डोक्यात पुन्हा तीच दृश्यं चमकली
तरुण मंजुलिका.

डोळ्यांत प्रेम.

आणि वाड्यातले लोक तिला जिवंत जाळत होते…

आण्णा हादरला.

“तिला… जाळलं होतं?”

मंजुलिकाच्या डोळ्यांत अश्रू आले.

“मी प्रेम केलं होतं… पण त्यांनी मला पाप म्हटलं…”

रखवालदार रागाने गर्जला.

“ती अपवित्र होती!”

क्षणात संपूर्ण कॉरिडॉरमध्ये आग पसरू लागली.

भिंती लाल झाल्या.

धूर भरला.

सुनंदा खोकू लागली.

आण्णा दोघांकडं पाहत उभा होता.

एका बाजूला भयानक रखवालदार.

दुसऱ्या बाजूला रडणारी मंजुलिका.

आणि तेवढ्यात…

रखवालदाराने अचानक आण्णाकडं बोट दाखवलं.

“आता पुढचा तू…”

क्रमशः…
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →